Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, March 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 28, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    तूं या कालयंत्रासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाहधात्री । हें कळलें फुडें ॥152॥

    आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।  असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥13॥

    पैं आणिकही एके परी । इयेचि प्रतीतीची येतसे थोरी । जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ॥153॥ परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥154॥ एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनें गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ॥155॥ हां गा आंधळ्यांचां गांवीं । आपणपें प्रगटलें रवी । तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ॥156 ॥ येरवीं देवर्षिही अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता ।  तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं ॥157॥ पैं असितादेवलाचेनिहि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें । परि तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती ॥158॥ विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू । विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥159॥ आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे ॥160॥ परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणोनि ॥161॥ तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्‍नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥162॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड…

    अर्थ

    तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस! तू जीवितास आश्रयस्थान आहेस. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस, हे मला निश्चित समजले. ॥152॥

    (वरीलप्रमाणे) सर्व ऋषी, देवर्षी नारद, तसेच असित, देवल आणि व्यास म्हणतात आणि तू स्वत: देखील असेच सांगतोस. ॥13॥

    आणखीही एक प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो. कारण की, मागे मोठ्यामोठ्या ऋषींनी याप्रमाणे तुझे वर्णन केले होते. ॥153॥ परंतु त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा (माझ्या) मनाला हा आता पटत आहे. कारण देवा, आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. ॥154॥ एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहेमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत; परंतु त्याचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही (नुसत्या) गाण्याचा आनंद अनुभवीत होतो. ॥155॥ हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वत: प्रगट झाला, तर त्यांना त्याच्या (फक्त) उष्णतेचाच अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कोठचा? ॥156॥ एरवी देवर्षी नारदही अध्यात्मपर गाणी गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागांत असणारी वरवरची मधुरता, तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती. त्यावाचून चित्ताला त्या गाण्यांपैकी दुसरे काही कळत नव्हते. ॥157॥ त्याचप्रमाणे असित आणि देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप ‘असे आहे’ म्हणून मी ऐकले. परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. ॥158॥ विषयरूप बिषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की, वस्तुत: गोड असलेला जो परमार्थ, तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो आणि स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक जे विषय, ते प्राण्यांना गोड वाटतात. ॥159॥ आणखी दुसर्‍याचे हे कशाला सांगू? व्यासदेवांनी आपण स्वत: आमच्या राजवाड्यात येऊन नेहेमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे ॥160॥ परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होय. परंतु तो चिंतामणी नाही, अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास व्हावे आणि मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे, म्हणून ओळख पटावी, ॥161॥ त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे या माझ्यापाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या; परंतु कृष्णा, तू जो सूर्य, त्या तुझा उदय न झाल्यामुळे, त्यांचा अनादर केला जात होता. ॥162॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…

    March 27, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…

    By Team AvaantarMarch 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥11॥ म्हणोनि मज आत्मयाचा भावो…

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    March 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 250
    • अवांतर 177
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 365
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 187
    • मैत्रीण 17
    • ललित 517
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn