Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥118॥

    मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।  कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥9॥

    चित्तें मीचि जाहाले । मियांचि प्राणें धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ॥119॥ मग तया बोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥120॥ जैशीं जवळिकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें । मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥121॥ तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणीं । बोधेंचि मिरवी ॥122॥ जैसें सूर्ये सूर्यातें वोवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें । नातरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोघ ॥123॥ तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥124॥ तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ॥125॥ पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ ॥126॥ जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें । दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥127॥ तैसेनि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ॥128॥ ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ॥129॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें

    अर्थ

    जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे, असे निश्चित समज. ॥118॥

    माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे (म्हणून जे मद्रूप झाले) आणि माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत (म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत) असे (ते ज्ञानी) परस्परांना (माझ्याविषयी) ज्ञान देत आणि नित्य माझे (माझ्या गुणांचे) वर्णन करीत समाधान पावतात आणि आनंदात मग्न होतात. ॥9॥

    अंत:करणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभावाने तृप्त झालेले असतात आणि अशा स्थितीत बोधाच्या भुलीमुळे जन्ममरणाला विसरतात. ॥119॥ मग त्या ज्ञानाच्या मदाने, प्रश्नोत्तररूप चर्चेच्या आनंदात प्रेमाने नाचतात. आता ते एकमेकांस ज्ञानच देतात आणि घेतात ॥120॥ ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसळली असता, त्यांचे पाणी उसळून एकमेकांत मिसळते, अशा स्थितीत लाटांत लाटांचीच घरे होतात ॥121॥ त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता, आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते, अशा स्थितीत बोध बोधानेच बोधांचे अलंकार मिरवतो. ॥122॥ ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे, किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिळावेत ॥123॥ (प्रयागास जसा गंगा आणि यमुना यांचा संगम होतो) तसा तेथे (म्हणजे भक्ताला भक्त जेव्हा भेटतात तेव्हा) ऐक्यरसाचा संगम होतो आणि त्या ऐक्यरसाच्या पुरावर अष्टसात्विक भावांचे पुराड तरते. ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. ॥124॥ तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर धावत येऊन (देहतादात्म्य टाकून) माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. ॥125॥ गुरु आणि शिष्य हे उपदेशाकरिता एकांत स्थळी जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा (ॐ संज्ञक ब्रह्माचा) उपदेश करतात, तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करून सांगतात. ॥126॥ ज्याप्रमाणे पूर्ण उमलेली कमळाची कळी, ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही, तर ती राजास अथवा गरीबास सुवासाची (सारखीच) मेजवानी देते ॥127॥ त्याप्रमाणेच (हे भक्त) सर्व जगात माझे वर्णन करीत असतात आणि त्या वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात आणि त्या विसरामध्ये अंगाने आणि जीवाने विरतात. ॥128॥ याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे, त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस अथवा रात्र याचे भान राहिलेले नसते. ॥129॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन…

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 247
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 361
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 510
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn