Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद
    ललित

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारMarch 24, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, भुताचा जन्म, द मा मिरासदार, विनोदी कथालेखक मिरासदार, भुताचा जन्म कथासंग्रह, विनोदी कथासंग्रह, 11 कथांचा संग्रह, अकरा कथांचा संग्रह, मिरासदार कथा संग्रह, ग्रामीण कथा, ग्रामीण कथासंग्रह
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    द. मा. मिरासदारांनी अनेक विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांनी ललित लेखन, वगनाट्य, नाटिका, चित्रपटाचे संवाद या सर्व साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं आहे. व्यंकूची शिकवणी ही त्यांची गाजलेली कथा. माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म आणि हुबेहूब हे विनोदी कथासंग्रह मला आवडतात. त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. माणसाच्या रूपाचे वर्णन करताना ते गमतीदार शब्द वापरतात. उदा. नानाचे नाक नम्रपणे खाली वाकलेले असून टोकाशी फुगा आला होता. ते नम्रपणे हा शब्द असा वापरतात की, वाचताना प्रत्येक वेळी हसू येते. समाजातल्या कुरीती, अंधविश्वास आणि माणसाच्या स्वभावातले दोष यावर मार्मिक टिप्पणी करत ते कथा लिहितात. कोणीतरी आपली चूक दाखवून टपली मारावी तसेच!

    ‘भुताचा जन्म’ या कथासंग्रहात अकरा कथा आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या कथा आहेत. त्यांची विशिष्ट अशी मिश्किल शैली आहे. ते गांभीर्याने बोलत आहेत, असं वाटतं आणि मग त्यातला विनोद लक्षात येतो. उदा. भुताचा जन्म या कथेची सुरुवात करताना ते लिहितात, ‘गुंडगळ्याचा माळ भुताचा जन्म होण्याच्या दृष्टीने अजिबात सोयीचे ठिकाण नव्हते. कुठे जन्म घ्यावा हे कुणाच्याच हातात नसते. कुठल्याही शहाण्या भुताने अशा ठिकाणी जन्म घेतला नसता’ आणि इथून कथा रंगायला सुरुवात होते. उत्सुकता वाटत राहते आणि हसूही येत राहतं. माणसाच्या स्वभावातल्या विसंगती त्यांनी बरोबर टिपल्या आहेत. पहलवान माणूस आणि काळीज सशाचे अशीही विसंगती, ते दाखवून देतात. ‘नदीकाठचा प्रकार’ कथेतून माणसे सगळीकडे सारखीच स्वार्थी असतात, हे दाखवून देताना आपल्याला हसायला लावतात. ‘भवानीचा पक्षकार’ ही एका नव्या वकिलाची कथा. पहिली वहिली केस मिळाल्यावरचा त्याचा उत्साह दाखवताना शेवट धक्कादायक होतो आणि हसू फुटते. ‘भिमूच्या कोंबड्या’ ही विलक्षण कथा आहे. कोंबड्यांचा धंदा कोणी असा करू शकेल, असं मनातही येणार नाही. ‘कंटाळा’ या कथेत कंटाळा करणाऱ्या आळशी माणसाचे वर्णन करताना ते लिहितात, ‘तसा तो हुशार होता. मनात आणले तर एखाद्याला ज्या कामाला दिवस लागेल तो ते दोन तासांत करून दाखवेल; पण तो मनात आणतच नसे.’

    हेही वाचा – बोल माधवी…; मनात चाललेले महाभारत!

    ‘पंचाक्षरी’ कथेत तात्याला मांत्रिक व्हायचे असते. त्याला विंचवाचे विष उतरवायची सिद्धी मिळालेली असते. तो आपले स्वप्न कसे पूर्ण करतो, ते या खुमासदार कथेत लिहिले आहे. ’आमच्या स्वयंपाकीण बाईंचा नवरा’या कथेत तर स्वयंपाकीण बाईची चतुराई सांगताना गांभीर्याचा आव आणला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता राहते. ‘ऊब’ ही एका न्हाव्याची कथा आहे. न्हाव्याला ग्राहकाच्या कानाला लागून बातम्या सांगायची सवय असते, या सवयीवर ही कथा आहे. ‘सोळा आण्याचा वतनदार’ या कथेत पैसा नसल्यामुळे मुलांचे लग्न करू न शकणारा गावचा कुलकर्णी काय शक्कल लढवतो, ते दाखवले आहे. ‘उपद्व्याप’ कथेत उपद्व्याप करून शाळेत सर्वांच्या नाकी दम आणणाऱ्या मुलाचे एक दिवस मुख्याध्यापक कौतुक करतात. त्यासाठी कारणच तसे घडते! ‘निरोप’ कथेत पाटील बायकोच्या बाळंतपणासाठी तालुक्याहून डॉक्टर बाई आणायला गड्याला पाठवतो आणि गडी कंटाळा करत उशीर करतो… कथेचा शेवट अनपेक्षित आहे.

    हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

    मुखपृष्ठावर भुताचा नख वाढलेला, लांबलचक बोटे असलेला पंजा आणि घाबरून पळणारा माणूस आहे. या आधीच्या आवृत्तीत धोतर नेसलेला हात पाठी करून काठी धरून चालणारा खेडूत दाखवला होता. शि. द. फडणीसांची शैली ओळखू येते…

    त्यांच्या कथांत गावातली माणसे प्रामुख्याने दिसतात. कथेतल्या वर्णनामुळे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मोकळा माळ, देऊळ, वडाचे झाड, त्याभोवतीचा कट्टा, जमलेले गावकरी वगैरेची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे कथेत रमून जातो. कुठेही अपशब्द न वापरता मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद. गालातल्या गालात हसवणारा, प्रसन्न करणारा…

    हे पुस्तक कधीही कपाटातून बाहेर काढावे आणि वाचावे असे आहे.


     

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 509
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn