Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, March 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेMarch 21, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, निरामय शारीरिक आरोग्य, प्राणायाम प्रकार, योगाभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायाम अभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायामाचे लाभ, प्राणायामाचे आरोग्य लाभ, अनुलोम विलोम प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायामाचे लाभ, प्राणायामाचे आरोग्य लाभ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.

    अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणजे काय?

    चंद्रभेदन प्राणायामास जोडून लगेचच सूर्यभेदन प्राणायाम केल्यास अनुलोम-विलोम प्राणायाम होतो.

    चंद्रभेदन प्राणायाम + सूर्यभेदन प्राणायाम यांची चक्रावर्तन क्रिया = अनुलोम-विलोम प्राणायाम

    अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा?

    मागील लेखातील प्राणायामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यास करावा. यासाठी ध्यानोपयोगी आसनात अथवा सहजासन घेऊन बसावे. जमिनीवर बसण्यास अवघड वाटत असेल तर खुर्चीवर बसावे.

    अनुलोम-विलोम प्राणायाम करताना डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करावी, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करावी आणि अभ्यासाला सुरुवात करावी.

    प्रणवमुद्रा घेऊन उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा आणि नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने प्रदीर्घ श्वास सोडावा. यानंतर लगेचच डावी नाकपुडी बंद असताना उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा, तद्नंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने प्रदीर्घ श्वास सोडावा. हे झाले एक आवर्तन. पूरक आणि रेचक यांचे प्रमाण 1:2 असावे. अशा रितीने क्षमतेनुसार अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यास करावा.

    हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    हा प्राणायाम करताना कुंभक केला नाही तर त्यास अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणतात. या प्राणायामात कुंभक केला तर त्यास नाडीशोधन प्राणायाम असे म्हणतात.

    अनुलोम-विलोम प्राणायामाचे आरोग्य लाभ

    अनुलोम-विलोम प्राणायामाने संपूर्ण नाडीशुद्धी होत असल्याने शारीरिक स्वाथ्याबरोबर मानसिक आरोग्य देखील लाभते.

    • मानसिक ताणतणाव दूर होतात.
    • मन शांत, स्वस्थ आणि प्रसन्न होते.
    • दिवसभर आनंदी आणि उत्साही वाटते.
    • मनाची एकाग्रता वाढते.
    • शांत झोप लागते.
    • मानसिक विकार कमी होतात.
    • मानसिक थकवा दूर होतो.

    दैनंदिन योग साधना करताना कपालभाती अभ्यास झाल्यावर अनुलोम-विलोम प्राणायामाचा अभ्यास   यथाशक्ती क्षमतेनुसार करावा.

    योगाभ्यासातील विविध प्राणायाम प्रकार, कृती आणि फायदे तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभ, याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    आपण पुढील लेखात योगाभ्यासातील भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्याबाबत जाणून घेणार आहोत.

    हेही वाचा – योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर  🙏/👌/👍 /  👏 / तत्सम चिन्हाने व्हाटसॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा.

    Related Posts

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026 आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    By डॉ. श्रीकांत राजेMarch 21, 2026

    आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक आहे का? सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट…

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 243
    • अवांतर 172
    • आरोग्य 91
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 183
    • मैत्रीण 16
    • ललित 505
    • वास्तू आणि वेध 356
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn