दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 02 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 23 जून 2025, वार : सोमवार, तिथि : त्रयोदशी 22:10, नक्षत्र : कृत्तिका 15:17
योग : धृती 13:17, करण : गरज 11:46
सूर्य : मिथुन, चंद्र : वृषभ, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
शिवरात्री
सोम प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस सामान्य राहील. आरोग्य चांगले असेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. मात्र, वाहन जपून चालवा. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात नफा कमवाल. कुटुंबाशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
वृषभ – अत्यंत धावपळीचा दिवस असेल. त्यामुळे मन अस्वस्थ राहील आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून विशेष काळजी घ्या. व्यावसायिक निर्णय हुशारीने घ्याल. मात्र गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत याकडे लक्ष द्या.
मिथुन – दिवस चांगला जाईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबासमवेत धार्मिक यात्रेच्या निमित्ताने प्रवासाचा योग आहे.
कर्क – अतिशय उत्तम दिवस असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. भागीदारीत एखादा मोठा व्यवसाय सुरू करू शकता. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. एखादा नातेवाईक घरी येईल.
सिंह – आनंदाची बातमी मिळेल. जे लोक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मतभेद दूर होतील. व्यवसायात एखादा मोठा करार होऊ शकतो.
कन्या – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आरोग्य बिघडू शकते. न्यायालयीन खटल्यात प्रतिकूल स्थितीला सामोरे जावे लागू शकते. विरोधकांपासून सावध रहा. व्यवसायात मोठी जोखीम घेऊ नका. दुखापत होण्याचा धोका आहे. कुटुंबात काही वाद असल्यास शांत रहा.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
तुळ – एखाद्या विशेष कामासाठी बाहेर जावे लागू शकते. त्या कामात यशही मिळेल. मात्र एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.
वृश्चिक – दिवस लाभदायक आहे. ठरवलेली सगळी कामे पूर्ण होतील. कार्यालयात काही नवीन जबाबदारी मिळेल. बॉसकडून प्रशंसा होईल. व्यवसायात नफा मिळेल. एखाद्या मित्रासोबत फिरायला बाहेर जाण्याचा योग आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
धनु – दिवस शुभ आहे. एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. या कामात यश मिळेल. भविष्यात मोठा नफा होईल. अडकलेले पैसे मिळतील. आरोग्य चांगले राहील.
मकर – अत्यंत धावपळीचा दिवस असेल. एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकांच्या कारस्थानांना बळी पडणार नाही, याची खबरदारी घ्या. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतो.
कुंभ – अनेक समस्या आ वासून उभ्या रहातील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रतिकूल निकाल लागू शकतो. व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. प्रतिस्पर्धी एखादे षडयंत्र रचून त्यात गोवण्याचा प्रयत्न करू शकतो. कुटुंबात जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा.
मीन – दिवस चांगला जाईल. एखाद्या मोठ्या समस्येतून सुटका होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळेल. व्यवसायात उत्तम नफा कमवाल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत किंवा अडकलेले पैसे परत मिळतील.
दिनविशेष
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल
राजकीय सारीपाटावर आधारित ‘सामना’ या मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या डॉ. जब्बार पटेल यांचा आज जन्मदिवस. 23 जून 1942 या दिवशी पंढरीच्या पवित्र भूमीत जन्माला आलेले जब्बार यांना वयाच्या दहाव्या वर्षी शालेय नाटकात काम करण्याची आणि नाट्य-दिग्दर्शनाची संधी मिळाली. नंतर श्रीराम पुजारी यांच्या सहवासात खऱ्या अर्थाने पटेल यांची प्रतिभा बहरू लागली. पुढे पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये पटेल यांनी प्रवेश घेतला. तिथेच नाटककार विजय तेंडुलकर यांची पडलेली गाठ ही पटेल यांचे संपूर्ण आयुष्य बदलायला कारणीभूत ठरली. बालशल्य चिकित्सक म्हणून शिक्षण घेत असताना तेंडुलकर यांची ‘अशी पाखरे येती’ ही एकांकिका आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर घाशीराम कोतवाल हे नाटक पटेल यांनी दिग्दर्शित केले. त्यानंतर सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता, एक होता विदूषक असे सरस चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!