Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधसाप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 जून 2025

साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 जून 2025

धनंजय जोशी

(‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

संपर्क – 8850453833


 

मेष

मेष राशीच्या जातकांना येत्या आठवड्यात अचानक धनलाभ संभवतो. ‘उत्तम राहावे, उत्तम खावे आणि उत्तम उपभोगावे’ अशा विचारांचे प्राबल्य या आठवड्यात राहणार आहे. नवीन गाडी अथवा घर घ्यावे, असे विचार मनात येतील; तथापि, योग्य तो विचार करून कृती करावी.

वृषभ

तब्येतीची चिंता घेऊन आठवडा सुरू होईल आणि जसजसा आठवडा पुढे सरकेल तशी चिंता कमी होत जाईल. घरातून व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती अनुभवायला मिळेल. वृषभ राशीच्या स्त्रियांनी घरात, व्यवसायात अथवा नोकरीच्या ठिकाणी द्विधा मनस्थिती झाली असल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

मिथुन

मिथुन राशीसाठी हा आठवडा विशेष लाभदायी ठरणार आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर मार्ग काढत पुढे जाल. अध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन घेण्याचे मनसुबे असतील तर मार्गदर्शन करणारी व्यक्ती काळजीपूर्वक निवडावा. ढोंगी बाबा-बुवांपासून सावधान रहावे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रात नोकरी, व्यवसायाची संधी चालून येऊ शकते.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा कामाच्या ठिकाणी उत्तम प्रगती साधण्यास सहाय्यक ठरणार आहे. आठवडा जसजसा पुढे सरकेल तसतशा काही चांगल्या तर, काही वाईट गोष्टी कानावर पडतील. वाईट गोष्टींचा ताण न घेता पुढे चालत राहावे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात देवीच्या उपासनेतून उत्तम लाभ संभवतो. लाभ अथवा फायदा होण्याचे या आठवड्यात अनेक अनुभव येतील. रागावर नियंत्रण ठेवा, यातून सगळ्यात जास्त फायदा हा तुम्हाला होणार आहे. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चमकण्याची उत्तम संधी चालून येईल.

हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा

कन्या

कन्या राशीच्या लोकांच्या मनावर आठवड्याच्या सुरुवातीला चिंता अथवा भीतीचा पगडा असणार आहे. आठवडा जसजसा पुढे सरकेल तसतशी परिस्थिती आटोक्यात येऊन मन चिंतामुक्त होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसाय अथवा नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कष्टाचे चीज होताना दिसेल आणि वरिष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. कन्या राशीच्या स्त्रियांनी भावंडांशी संपर्क साधायचे मनात असल्यास ते कृतीत आणावे.

तुळ

तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला स्त्री प्रतिस्पर्ध्यांकडून अथवा भागीदारांकडून चांगली साथ मिळू शकते. आठवडा जसा पुढे सरकेल, तशा काही चिंतेच्या बाबी समोर येतील. आठवड्याचा उत्तरार्ध हा विद्यार्थ्यांना विशेष लाभदायी ठरणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या संदर्भाने काही नवीन गोष्टी समोर येतील.

वृश्चिक

नोकरीत पदोन्नती घेऊन येणारा हा आठवडा ठरू शकतो. तब्येतीविषयक तक्रारींच्या चिंतेने आठवडा सुरू होईल आणि जसजसा पुढे सरकेल तसतशा काही चिंता कमी होतील आणि काही नव्याने समोर येतील. वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात वाहन चालवताना थोडा संयम बाळगावा.

धनु

कला अथवा कलेच्या क्षेत्रात मन गुंतून राहून स्वतःकडे दुर्लक्ष होण्याचे क्षण या आठवड्यात अनुभवास येतील. हॉटेल व्यवसायात असलेल्या लोकांनी आपल्या ज्येष्ठ गिऱ्हाईकांची विशेष काळजी घ्यावी. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायातील भागीदारांकडून काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. धनु राशीच्या स्त्रियांना या आठवड्यात घरातील लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे लागेल.

मकर

‘मातृदेवो भव’ हे या आठवड्याचे सूत्र असणार आहे. आईची उत्तम काळजी घ्या, आईजवळ नसल्यास तिची खुशाली विचारा. आईच्या आशीर्वादाने या आठवड्यात अडकलेली कामे मार्गी लागतील. मकर राशीच्या स्त्रियांनी इतरांसाठी खपताना स्वतःकडे दुर्लक्ष होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेज अथवा शिकवणी याबरोबरच स्व-अध्ययनावर योग्य तो भर द्यायला हवा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा काही चांगल्या वार्ता घेऊन येणारा असणार आहे. नवीन घर अथवा वाहन घेण्याचे मनसुबे असतील तर, या आठवड्यात त्यावर प्रकर्षाने काम होईल. कुंभ राशीच्या स्त्रियांनी घरात शिस्त पाळली जात आहे की, नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. नोकरदार वर्गातील कुंभ राशीचे लोक येत्या आठवड्यात नोकरी संदर्भाने काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात.

मीन

मीन राशीच्या लोकांना येता आठवडा हा आपल्या मुळांपाशी घेऊन जाणारा दिसत आहे. या आठवड्यात घरातील वरिष्ठांकडून उत्तम मार्गदर्शन प्राप्त होईल. घर परिवार आणि त्याच्याशी निगडित अशा गोष्टींसंदर्भात कार्य करायला लावणारा, असा आठवडा असेल. मीन राशीच्या स्त्रियांनी हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याकडे विशेष लक्ष ठेवावे.

हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!