दर्शन कुलकर्णी
आज,
भारतीय सौर : 26 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 16 जून 2025
वार : सोमवार
तिथि : पंचमी 15:31
नक्षत्र : धनिष्ठा 25:13
योग : वैद्रुती 11:06
करण : गरज 27:12
सूर्य : मिथुन
चंद्र : मकर 13:09
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:17
पक्ष : कृष्ण
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कार्यालयात वरिष्ठांच्या दबावामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र कोणाकडूनही पैसे उधार घेण्याचे टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. लेखन आणि वाचनासाठी दिवस चांगला असेल.
वृषभ – अनेक समस्यांवर तोडगा मिळेल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या सावध रहा, कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका.
मिथुन – आरोग्याची काळजी घेणे, हे पहिले प्राधान्य असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळा. अनपेक्षित जबाबदाऱ्या तुमच्या दैनंदिन नियोजनात व्यत्यय आणू शकतात. काही जातकांना व्यावसायिक यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्क – मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
सिंह – आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात प्रचंड नफा बघायला मिळेल. व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता. घरगुती जीवन आनंददायी राहील.
कन्या – तुमच्या उर्जेचा आणि आत्मविश्वासाचा पूर्ण फायदा मिळेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक बचतीची कल्पना पूर्ण होऊ शकते. मोकळा वेळ एखाद्या छंदासाठी किंवा शांत ठिकाणी घालवायला आवडेल.
तुळ – स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक स्तरावर तोटा होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूक करणे टाळा. कोणतीही खरेदी उत्स्फूर्तपणे करू नका. कुटुंबातील सदस्यांचा खरेदीसाठी पाठिंबा मिळवा आणि मग निर्णय अमलात आणा.
वृश्चिक – कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत. व्यावसायिकदृष्ट्या परिस्थिती चांगली राहील. गुंतवणूक अनेकदा खूप फायदेशीर ठरते, हे प्रकर्षाने जाणवेल.
धनु – डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, म्हणून सावध रहा. प्रवासात असाल तर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. कोणाला काही रक्कम उधारीवर दिली असेल तर, ती परत मिळेल. त्यामुळे काही आर्थिक समस्या दूर होतील.
मकर – आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस असेल. घराच्या नूतनीकरणासाठी पैसे खर्च होऊ शकतात. व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कुंभ – अतिशय उत्साही असाल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण पूर्वी दिलेले पैसे लगेच परत केले जातील. इतरांशी चांगले वागा, कामाच्या ठिकाणी कार्यालयीन राजकारणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मीन – काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थितीमुळे काही महत्त्वाची कामे थांबतील. मात्र ऐनवेळी मित्र मदतीला उभे राहतील. मोकळा वेळ एखाद्या निरुपयोगी गोष्टीवर वाया घालवू शकता. जोडीदाराला आज तुमच्या आरोग्याची काळजी वाटू शकते.
दिनविशेष
मराठी रंगभूमीवरील गायक नट श्रीपाद नेवरेकर
बालंगधर्व यांच्या काळातील मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म 3 जुलै 1912 रोजी झाला. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश करण्यापूर्वी श्रीपाद नेवरेकर यांनी इनायत हुसेन खाँ तसेच खादिम हुसेन खाँ यांच्याकडे सहा-सात वर्षे शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेतले. बालगंधर्व आणि गणपतराव बोडस यासारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्याने ते लोकप्रिय झाले. कालांतराने गंधर्व नाटक मंडळी बंद झाली. पण तरीही, ठेकेदारांनी आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगात ते त्यांच्या लोकप्रिय भूमिका वारंवार सादर करीत असत. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे नाट्यव्यवसायातून निवृत्त झाल्यावर 1973मध्ये गोव्याच्या संगीत अकादमीत सुगम संगीताचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. श्रीपाद नेवरेकर यांचे 16 जून 1977 रोजी निधन झाले.