Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 14 जून 2025
    वास्तू आणि वेध

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 14 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 14, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 24 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 14 जून 2025

    वार : शनिवार

    तिथि : तृतीया 15:46

    नक्षत्र : उत्तराषाढा 24:21

    योग : ब्रह्मा 13:12

    करण : बव 27:51

    सूर्य : वृषभ

    चंद्र : मकर

    सूर्योदय : 06:00

    सूर्यास्त : 19:16

    पक्ष : कृष्ण

    मास : ज्येष्ठ

    ऋतू : ग्रीष्म

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू

    शालिवाहन शक : 1947

    विक्रम संवत : 2081

    युगाब्द : 5127

    संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 10:02


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – मेष राशीच्या जातकांना कामामध्ये मोठे यश मिळेल. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. एखाद्या नव्या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात येईल. व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी शोधा.

    वृषभ – रोलर कोस्टरप्रमाणे दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कार्यालयीन राजकारणापासून लांबच रहा. आर्थिक बाबींसंबंधी कोणतीही जोखीम घेऊ नका.

    मिथुन – आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. सहलीचे नियोजन करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम असेल.

    कर्क – कौटुंबिक आघाडीवरील वातावरण आनंदाचे राहील. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे कुटुंबाचा सल्ला अवश्य घ्या. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. काही जातकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल.

    सिंह – मालमत्तेशी संबंधित वाद सोडवले जातील. खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. कार्यालयातील सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. त्याऐवजी कारकिर्दीतील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा.

    कन्या – जीवनात आनंद आणि समृद्धी आणणारा दिवस असेल. नवीन ठिकाणी व्यवसाय वाढविण्याच्या अनेक संधी व्यावसायिकांना मिळतील. कार्यालयातील सर्व कामे सर्जनशीलतेने पूर्ण करा. विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करतील.

    तुळ – वृषभ राशीच्या जातकांना जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी कार्यालयात जास्त वेळ बसावे लागेल, त्यामुळे आळशीपणा टाळा.

    वृश्चिक – अतिशय शुभ दिवस आहे. व्यवसायात नफा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांची बदली होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. कार्यालयातील जबाबदाऱ्या वेळेआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

    धनु – विद्यार्थ्यांसाठी अतिशय भाग्यवान दिवस असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कार्यालयातील आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी तयार रहा. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी नवीन रणनीती तयार करा. करिअरच्या नवीन संधींकडे लक्ष ठेवा.

    मकर – व्यवसायात वाढ करण्याच्या अनेक संधी मिळतील. सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने खूप प्रगती होईल. व्यावसायिक जीवनात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. मात्र आर्थिक बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या. आहाराकडे आज विशेष लक्ष द्या.

    कुंभ – आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायात चढ-उतार बघायला मिळतील. व्यवसायात थोडी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल. फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा.

    मीन – नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या नवीन संधी मिळतील. मात्र, आळसापासून दूर रहा.


    दिनविशेष

    आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल

    मराठीतील आद्य नाटककार अशी ओळख असणाऱ्या गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1855 साली तत्कालीन सांगली संस्थानातील हरिपूर येथे झाला. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ अशी अनेक नाटके देवल यांनी लिहिली. त्यापैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संगीत संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत विशेष स्थान आहे. ‘सं. संशयकल्लोळ’नं मराठी रंगभूमीवर भरजरी इतिहास घडवला आहे. अनेक दर्जेदार नटसंचांत विविध नाटक कंपन्यांनी त्याचे आजवर हजारो प्रयोग सादर केले असून 1916मध्ये लिहिल्या गेलेल्या या नाटकाचे अजूनही प्रयोग होतच आहेत. बेळगाव येथे देवल हे प्रख्यात नाटककार आणि अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. त्यांच्यामुळेच पुढे देवलांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरुवात केली. किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना देवल नाटकांमध्ये लहान-लहान भूमिका साकारू लागले. 1885 साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करत होते. पुढे पुण्यात आल्यावर देवलांनी ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर 1913 साली त्यांनी गंधर्व नाटक मंडळीबरोबर काम करायला सुरूवात केली. मधुमेह बळावल्याने त्यांचे 14 जून 1916 साली निधन झाले. त्यांच्या पश्चात संगीत संशयकल्लोळ नाटक गंधर्व नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn