Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 09 जून 2025
    वास्तू आणि वेध

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 09 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 9, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 19 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 09 जून 2025

    वार : सोमवार

    तिथि : त्रयोदशी 09:35

    नक्षत्र : विशाखा 15:30

    योग : शिव 13:07

    करण : गरज 22:38

    सूर्य : वृषभ

    चंद्र : तुला 08:49

    सूर्योदय : 06:00

    सूर्यास्त : 19:15

    पक्ष : शुक्ल

    मास : ज्येष्ठ

    ऋतू : ग्रीष्म

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू

    शालिवाहन शक : 1947

    विक्रम संवत : 2081

    युगाब्द : 5127

    शिवराय शके 352 प्रारंभ


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – लोन घेणार असाल आणि बरेच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी हे काम होऊ शकते. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. कुटुंबीयांसमवेत वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी जोडीदाराशी पुन्हा सूर जुळतील.

    वृषभ – काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे अस्वस्थ व्हाल. परंतु भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. पैशांशी निगडीत काही समस्या येऊ शकते, त्यातून मार्ग काढण्यासाठी पिता किंवा पितृतुल्य व्यक्तीकडून सल्ला घेऊ शकतात. वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

    मिथुन – प्रदीर्घ काळापासूनचे तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

    कर्क – आवश्यक काम पूर्ण करून स्वत:साठी वेळ नक्कीच काढाल परंतु, यावेळेचा उपयोग आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. अनेक गोष्टी करण्याचे ठरवाल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते.

    सिंह – मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. तुमच्या कामाला दाद मिळेल. स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल.

    कन्या – आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, त्यामुळे बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

    तुळ – अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल मिळेल. सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा.

    वृश्चिक – धर्मादाय आणि सामाजिक कामाचे आकर्षण वाटू शकते. गरजूला आर्थिक मदत देऊन आनंदाचा अनुभव कराल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही, यामुळे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकतात. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा.

    धनु – कार्यालय तसेच घरातील तणावांमुळे किंचित चिडचिडे बनाल. व्यापाराशी संबंधित बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकतो. नातेवाईक आणि मित्रमंडळी अचानक संध्याकाळी घरी अवतरतील आणि मौज-मजा करतील.

    मकर – जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून ज्येष्ठांनी त्याचा लाभ घ्यावा. कुणाच्या मदतीविना धन कमावण्यात सक्षम आहात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता. पैसे कमावण्याची ताकद किती आहे, याची कल्पना येईल.

    कुंभ – नोकरी करणाऱ्यांना धनाची आवश्यकता भासेल. कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक आपले प्रश्न घेऊन आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडेल.

    मीन – चित्त शांत ठेवा. उद्ध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. धनलाभ होऊ शकतो. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना, भावनांवर नियंत्रण राखा. लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.


    दिनविशेष

    क्रांतिकारक बिरसा मुंडा

    बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडच्या उलीहातू येथे झाला. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींकडून इंग्रज सरकारविरुद्ध जनआंदोलने करण्यात आली, त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. इंग्रजांच्या काळ्या धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरूद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्वीकारत नाही आणि कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. जो इंग्रज आमच्याविरुद्ध उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू, असे त्यांनी जाहीर केले. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने बिरसा मुंडा यास पकडण्याचे फर्मान काढले. इंग्रज सरकारने 460 आदिवासी युवकांसह बिरसा मुंडा यांना अटक केली. या थोर क्रांतिकारकाचे 9 जून 1900 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn