Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आगाऊपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली…
    ललित

    आगाऊपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 8, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    चांगलीच
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

     

    दिप्ती चौधरी

    नवीन घर मला खूप आवडले! इथे उड्या मारायला उंचावरच्या खिडक्या आणि सज्जे आहेत. वरच्या मजल्याच्या कार्पेट वरून लोळत, सरपटत जायला खूप मजा येते. इथे खालच्या मजल्यावरून आम्हाला वरती जायला भिंतींवर cat highway करून घेतला आहे. सुरुवातीला मी जरा घाबरत होतो, एकदोन वेळा वाटेतच अडकलो आणि दिदीने मला उतरवले, पण नंतर मी जिद्दीने रस्ता शोधला. कंटाळा आला की, त्यावर उड्या मारून जायला मजा येते.

    अजूनही मी कधी कधी दनूबरोबर जोरदार भांडण करतो, पण आता ते कसे सोडवायचे ते घरचे बघून घेतात. इकडच्या जिन्यावर इतर तटबंदी करायची गरज नाही. आमचा जाळीचा दरवाजा लावला की, मी त्या दिशेला आजकाल फिरकत नाही… म्हणजे भौतिकशास्त्राचे नियम मी आजही तोडू शकतो; पण त्याचे झाले असे की… एकदा उडी मारून जायच्या प्रयत्नात असा पडलो की, माझी शेपूट जेमतेम वाचली! तेव्हापासून कानाला खडा लावला.

    पण पलायनाचे काही प्रयत्न मी इथेही केले…

    आमचा मुख्य दरवाजा कडी लावली नाही तर, जोराच्या वाऱ्याने उघडतो. नवीनच असताना तो नुसता बंद केल्याने कुलूप लागत नाही, हे थोडे अंगवळणी पडायचे होते. चुकून उघड्या राहिलेल्या दरवाजातून मी गुपचूप पोबारा केला. घरी कामात असलेल्या लोकांना तीन तास त्याचा पत्ताच नव्हता! आता तीन तास म्हणजे मला दूरवर जाण्यासाठी खूप वेळ होता, पण आमच्या बाजूच्या अंगणात गवत कापायचे मशीन घेऊन कामगार काम करत होते. त्यांचा वावर आणि त्या मशीनचा जोरदार आवाज, यामुळे मी गुपचूप घराच्या आसपास परत आलो. उन्हाचा कडाका आणि आवाज यामुळे घरी परत गेलेलं उत्तम असा विचार केला तर, दरवाजा बंद! बराचवेळ वाट बघितली तरी दरवाजा कोणी उघडेना. आता काय करायचे, हा मोठा प्रश्न पडला. दूर पळून जाण्यापेक्षा मुख्य दाराशेजारी पप्पांचे ऑफिस असलेल्या खोलीच्या खिडक्या आहेत, तिथे बघावे असे ठरवले. तेव्हा नियमित ऑफिस सुरू झाले नसल्याने पप्पा तिथेच काम करत बसायचे. त्या खिडकीतून त्यांना सांगण्यासाठी मी खिडकीवर उड्या मारायला सुरुवात केली. खिडकी जाळीने नेहमीच बंद असते, पण आता काच पण बंद असल्याने माझा आवाजही पोहचू शकत नव्हता.

    हेही वाचा – …मग आईने एक अत्यंत अनोखा उपाय शोधून काढला

    पप्पा खूप महत्त्वाच्या चर्चेत गुंतले होते, त्यामुळे त्यांचे लक्ष नव्हते. सुरुवातीला त्यांना नजरेच्या कोपऱ्यातून फक्त खिडकीत काही हालचाल जाणवली तरी, त्यांनी लक्ष दिले नाही. ते इतके चर्चेत गुंतले होते तरी, त्यांना काही सेकंदात लक्षात आले…

    अरे खिडकीत काही तरी हालचाल आहे… ठीक आहे..

    कोणी मांजर उडी मारत आहे… ठीक आहे..

    अरे, हा तर पिदू आहे, बहुतेक नेहमीप्रमाणे खिडकीत बसायला खोलीत शिरला असेल… ठीक आहे…

    पिदू खिडकीच्या बाहेरच्या बाजूला आहे…

    अरे, बापरे…!

    महत्त्वाच्या चर्चेत गुंतलेले असल्याने त्यांना उठताच येत नव्हते. कसे तरी त्यांनी आईला फोन लावला आणि फक्त चार शब्द जेमतेम बोलून फोन बंद केला.

    इकडे पप्पा घरातल्या घरात कशाला फोन करत असतील म्हणून आईने गोंधळून फोन उचलला तर फक्त “अगं हा बाहेर आहे…” इतके बोलून फोन बंद केला!

    पण माझ्या अफाट कर्तृत्वावर माझ्या आईचा इतका विश्वास आहे की ‘हा’ म्हणजे कोण आणि ‘बाहेर’ म्हणजे नक्की कुठे, हे आईच्या लगेच लक्षात आले आणि ती बाहेर धावली.

    दरवाजा उघडून आई बाहेर आली, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. तिने हाक मारताच मी लगेच घरात धूम ठोकली आणि जमिनीवर कोसळलो. मी परत आलो, तेव्हा दनूला वाटले की, मी बाहेर खूपच मजा करून आलो आहे. तो सरळ दरवाजासमोर बसून आता माझी पाळी बाहेर भटकायची म्हणून आईशी भांडण करायला लागला! आधीच मी बाहेर पळालो होतो आणि इतकावेळ आपल्याला पत्ताच नव्हता या विचाराने ती हादरली होती. तिने आम्हा दोघांना चांगलेच फैलावर घेतले. “बाहेर जाऊन काय खाणार? उंदीर की चिमण्या? इथे मासे सुद्धा साफ करून कापून द्यावे लागतात, ते पण दोघांना दोन आकारात! Cat food पण दोघांना वेगवेगळ्या चवीचं लागते… कधी मासे कधी कोंबडी, ते पण दरवेळी नवीन, वाटीत उरलेलं आपण खात नाही… पाणी पण दर वेळी ताजं लागतं. बाहेर हे नखरे कोण पुरे करणार? चालले मार्को पोलो आणि कोलंबस सफरीला!” माझा आता प्रश्नच नव्हता दरवाजा सताड उघडा असला तरी, मी तिथे ढुंकून बघितलं नसतं, इतकी माझी खोड मोडली होती. मी आईने आणून दिलेले पाणी गपगुमान ढसा-ढसा प्यायलो आणि झोपायला चालता झालो. दनू मात्र पुढचे दोन-तीन दिवस आईशी अधूनमधून वाद घालत होता.

    हेही वाचा – भौतिकशास्त्राचे नियम एकाच उडीत लोळवले

    मला त्या आगाऊपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली होती. त्यामुळे त्यानंतर जेव्हा जेव्हा मी दाराबाहेर सटकतो तेव्हा तेव्हा आईने दम मारला की, मी लगेच शिस्तीत घरात परत जातो.

    पण आम्हाला बाहेर आवडते म्हणून आमच्यासाठी आमच्या घराला एक catio बनवून घेतला आहे. आमची खास पिंजरेवजा खोली. घरच्या लगत असल्याने, खिडकीतून उडी मारून आम्ही त्यात जाऊन मस्तपैकी वारा आणि ऊन खात पडतो. मी तर तिथे जाऊन बर्फसुद्धा पाहून आलो आहे.

    त्यात आम्ही बाहेरची मोकळी हवा अनुभवतो, पण सुरक्षित राहून!

    क्रमशः

    (पिदू या बोक्याची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Most Popular

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.