Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, March 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मूर्तीकला असो की नाणी… मोरालाच प्राधान्य
    ललित

    मूर्तीकला असो की नाणी… मोरालाच प्राधान्य

    Team AvaantarBy Team AvaantarApril 30, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, मोर, स्कंद, कार्तिकस्वामी, मूर्तीकलामोर,
    मौर्य आणि गुप्त कालीन नाणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यश:श्री

    प्राचीन काळापासून कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही भारताच्या प्राचीन संस्कृतीचे ते अभिन्न अंग आहे. त्याचा विशेष हा आहे की, दगड, कास्य आणि मातीच्या मूर्तीमध्ये मोर तयार करणे हा कलाकरांचा आवडता विषय असल्याचे पाहायला मिळते. मनुष्याच्या जीवन आणि कलेमध्ये मोर हे अभिन्न अंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हस्तीदंत, लाकूड, काच आणि विविध धातूंमध्ये केलेल्या कलाकुसरीत बहुतांशी मोराची प्रतिमा बनविली जाते. बंगालमध्ये मयुरपंखी नौकांच्या अनेक कहाण्या आहे. तेजावूर तसेच दक्षिणमधील धातूच्या वस्तू बनविणाऱ्या केंद्रांमध्येही मोराचा वापर केला जातो. तेथे दिव्यामध्ये मोर बसविण्यात येतो. हा पवित्र पक्षी असल्याने मंदिरातील या दिव्यांमध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे, असे सांगितले जाते.

    त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, काठियावाड, सौराष्ट्र तसेच दक्षिण भारत आदी सर्व ठिकाणच्या प्राचीन वस्त्रांमध्ये मोराचे चित्र पाहायला मिळते. बनारसी साड्यांमध्येही मोराचे आकर्षक डिझाइन बघायला मिळते. पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीतील लोकांनी आपल्या मातीच्या भांड्यांवर मोराची शेकडो ‘चित्रे’ बनवली होती. ही चित्रे सुंदर, अभिरुचीपूर्ण तर आहेतच, त्याशिवाय त्या लोकांच्या परिपक्व कलेची द्योतक आहेत.

    एवढेच नव्हे तर, नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट कलेला सुवर्णमयूर, रजतमयूर आणि कास्य मयूर पुरस्कार दिले जातात. यामध्ये पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराची प्रतिमा आहे. ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांच्या एका लेखामध्ये याबद्दल सुंदर ऊहापोह करण्यात आला आहे.

    भारतीय चित्रकला तसेच मूर्तीकलांमध्ये मोराचा प्रयोग अलंकारिक स्वरुपात वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे, असे सांगतानाच दुर्गा भागवत यांनी काही उदाहरणेही दिली आहेत. इसवीपूर्व सहाव्या शतकातील अनेक नाण्यांवर मोराचे चित्र आहे. एका नाण्यावर पाच शिखरांच्या डोंगरांवर मोर बसलेला दाखविण्यात आला आहे.

    हेही वाचा – राजवैभवी मोर… तख्त-ए-ताऊस

    सम्राट अशोकच्या काळात शिलालेखांवर मोरांचा उल्लेख आहे. बिहारमधील रामपुरवा येथील लौरिया नंदनगड येथे सम्राट अशोक काळातला एक स्तंभ सापडला आहे. त्याचा जमिनीवरील भाग 11 मीटर 86 सें.मी. (39 फूट साडेसात इंच) आहे. तर, जमिनीच्या खाली तो तीन मीटर (दहा फूट) आतमध्ये होता. तो भाग खोदल्यानंतर समजले की, स्तंभाखाली मोराची दहा सें. मी. लांब मूर्ती बनविण्यात आली आहे. ही मौर्य साम्राज्याच्या चिन्हाच्या स्वरुपात बनविली आहे, असे डॉ. राधाकुमुद मुखर्जी (‘अशोक’ 1955, पृष्ठ 91) यांचे मत आहे.

    दुर्गाबाई भागवत यांनी आपल्या या लेखात मौर्य काळाबाबतही उल्लेख केला आहे. काही जण मौर्य शब्दाची उत्पत्ती ‘मयूर’ याच्यापासून करतात. असे म्हणतात की, मौर्यवंशातील प्रथम राजा चंद्रगुप्त नंद राजांच्या मयूरपोषकांच्या कोणत्यातरी गावाच्या प्रमुखाचा मुलगा होता. जेव्हा तो पाटलीपुत्राच्या सिंहासनावर विराजमान झाला, तेव्हा काही क्षत्रिय त्याला मयूरपोषकांचा पुत्र समजून त्याची निंदा करीत असत. यावर चाणक्याने क्रोधित होऊन क्षत्रियांच्या गावामध्ये आग लावण्याचे आदेश दिले होते. मौर्यांनी निर्माण केलेल्या भवनांवर मोरांच्या मानेसारखा निळ्या रंगाचे दगड लावण्यात येत असत.

    उत्तर प्रदेशातील मथुरा संग्रहालयात असलेल्या एका मूर्तीमध्ये स्वामी कार्तिकेयची पत्नी मोरावर विराजमान आहे. तसेच, नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात इसवीसनानंतर 12व्या शतकातील एका मूर्तीमध्ये कार्तिकेय आपल्या उजव्या हाताने मोराला भरवित आहेत. दक्षिण भारतात मिळालेल्या एका चोल शैलीतील मूर्तीमध्ये सहा मुख असलेला स्कन्द मोरावर विराजमान आहे. 12व्या किंवा 13व्या शतकात तयार केलेल्या या सुंदर मूर्तीमध्ये मोराची वाकलेली मान आणि पिसारा सुंदर आहे. मोराची चोच स्कन्दाच्या उजव्या गुडघ्याला स्पर्श करीत आहे. मोराने आपला शत्रू तसेच आवडता आहार असलेल्या सापाला चोचीमध्ये पकडले आहे, असे दुर्गाबाईंनी या लेखात म्हटले आहे.

    हेही वाचा – दी ब्युटिफुल ट्री

    यौधेय नाण्यांच्या एका श्रेणीवर जिथे स्कन्द दाखविण्यात आला आहे, त्याच्या मागे मोर जात आहेत, असे दर्शविले आहे. तर, रोहतकच्या एका खेड्यात (खोकरा कोट) तांब्याची काही नाणी सापडली आहेत. या नाण्यांच्या एका बाजूला कार्तिकेयाची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला मोराची मूर्ती आहे. त्यावेळी रोहतकमध्ये क्षत्रियांचे (यौधेय) राज्य होते आणि त्यांचे सरकारी चिन्ह मोर होते.

    गुप्त काळात मोर राष्ट्रीय पक्षी असल्यासारखाच होता. कुमार गुप्तने (413-35 इसवीसनानंतर) सोन्याचे एक नाणे सुरू केले होते. त्यामध्ये एका बाजूला स्वतः मोराला द्राक्ष भरवत आहे, असे दर्शविले होते, तर दुसऱ्या बाजूला मोरावर बसलेला कार्तिकेय दाखविला होता. तसेच, चांदीच्या काही नाण्यांवर मध्यभागी पिसारा फुलविलेला मोर आहे. हे चित्र स्कन्द गुप्त आणि बुद्ध गुप्त काळातील चांदीच्या वेगवेगळ्या नाण्यांवरही आहे.

    नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात स्कन्दकुमाराची एक कांस्याची प्रतिमा आहे. ही बहुतेक करून हिमाचल प्रदेशमधील चम्बा येथे मिळाली होती. ही प्रतिमा 11.1 सें. मी. उंच आणि 5.7 से. मी. रुंद आहे. यामध्ये स्कन्द आपले वाहन मयूराजवळ उभा आहे. त्याने मयूराची मान पकडली आहे. तसेच, स्कन्दाच्या झेंड्यावरही मोराचेच चित्र असे. त्यामुळे त्याला ‘वर्हिकेतू’ म्हणत असत. या शब्दाचा अर्थ ‘मोरपिसाचा (वर्हि) झेंडा (केतू) असलेला’ असा असल्याचे दुर्गा भागवत यांनी नमूद केले आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026 ललित

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026 ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    By प्रदीप केळुस्करMarch 19, 2026

    मी नंदा… माझ्या मुलाने मला दिलेला धक्का तुम्हाला सांगणार आहे… याला धक्का म्हणू की, चटका…

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 89
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 501
    • वास्तू आणि वेध 355
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn