Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, March 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेMarch 29, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात मनःशांती मिळेल. कामाच्या बाबतीत नोकरदारांची धावपळ होईल. जे काम ‘नंतर बघू’ म्हणून बाजूला ठेवलं आहे, तेच अर्जंट करून द्यावे लागू शकेल. व्यावसायिक वर्गाला दुसऱ्याकडे थकलेले पैसे परत मिळतील. व्यवसाय वाढविण्याची योजना आखाल. महिलांना घरासाठी शोभेच्या वस्तू किंवा नवीन रोप विकत घेता येतील. विद्यार्थ्यांना जीवाला जीव देणारा मित्र मिळेल. सुसंगत फायद्याची ठरेल.

    वृषभ

    या आठवड्यात मुलांशी वाद होतील. नोकरदारांना नवीन जॉबमध्ये रुळायला वेळ लागेल. कामाचा ताण नसेल, पण नवीन काम करताना वेगळीच हुरहूर लागेल. व्यावसायिक वर्गाला नवीन योजना राबवल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल; त्याची व्यवसायवाढीला मदत होईल. तथापि, कच्चा माल कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धावपळ होऊ शकते. घरात शांतता ठेवण्यावर महिलांना भर द्यावा लागेल. मुलांना समजून घ्या. विद्यार्थ्यांनी बाहेरील पदार्थ खाऊ नये, तब्येत सांभाळावी

    मिथुन

    या आठवड्यात कामाचा ताण फार जाणवेल. नोकरदारांना मार्चअखेरीची कामे खूप असतील. टार्गेट पूर्ण करण्यास धावपळ होऊ शकते.  यावरून वरिष्ठांचा रोष पत्करावा लागेल; पण शांत राहून प्रश्न हाताळा. थंड पडलेल्या व्यवसायाला उभारी देण्याचे आव्हान व्यावसायिक वर्गासमोर असेल. तो पहिल्यासारखा करण्यासाठी कष्ट करावे लागतील. तसेच, नवीन गोष्टीही आत्मसात कराव्या लागतील. महिलांच्या बाबतीत घरात आनंदी वातावरण असेल, नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतील. आवडीच्या क्षेत्रात प्रगती करू शकाल.

    कर्क

    हा आठवडा आनंद मिळवून देणारा असेल. नोकरदारांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मनात योजलेले काम पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन भागीदार मिळेल. टेंडर पास होतील, नवीन करार होतील, व्यापारात चांगली प्रगती करू शकाल. महिलांना माहेरची मंडळी भेटायला येतील. मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचे शिक्षक कौतुक करतील.

    सिंह

    हा आठवडा भाग्यदायक आहे. खूप दिवस रखडलेली कामे नोकरदार पूर्ण करू शकतील. वरिष्ठ खूश असतील. कोर्ट-कचेरीची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक वर्गाला भागीदारावर बारीक लक्ष ठेवावे लागेल. तुमच्या स्पर्धकाला माहिती (तुमचे व्यवसाय गुपित) पुरवण्याचे काम कोण करते, ते शोधून काढावे लागेल. महिलांना घरात जास्त काम करावे लागेल. मदतनीस आयत्या वेळी दांडी मारतील. मेहनती शिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

    हेही वाचा – भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    कन्या

    या आठवड्यात उदास वाटेल. काम करण्याचा कंटाळा येईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. टार्गेट पूर्ण करण्याचे दडपण असेल. वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. स्पर्धक शांत राहिल्याने व्यावसायिक वर्गाला दिलासा मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती कराल, नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना जुन्या मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांचा मित्रांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही आपल्या मतावर ठाम रहा.

    तुळ

    या आठवड्यात चांगली आनंदाची बातमी मिळेल. नवीन जॉब शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. मनासारख्या गोष्टी घडतील, तुम्हीही सकारात्मक रहा. चांगले कर्म करा. व्यावसायिक वर्गाला अडकलेली कामे पूर्ण करता येतील. वेळेचे आणि पैशाचे योग्य नियोजन करा. कच्चा माल साठवून ठेवा. आध्यात्मिक कार्यात महिला रमतील. त्यानिमित्त घरी पाहुणे येतील. विद्यार्थ्यांनी मित्रांपासून सावध रहावे, पैसे उधार देऊ नका.

    वृश्चिक

    या आठवड्यात भांडणे होण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी सहकारी आणि वरिष्ठांबरोबर सांभाळून संवाद साधावा. तुम्हाला शब्दांत अडकवले जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला व्यवसायासाठी घरातून मदत आणि सहकार्य मिळेल. घरातून पैसे घेतले तरी वेळेत परत करा. स्वतःचा नवीन स्टार्टअप सुरू करण्याची महिलांची इच्छा असेल तर, हा योग्य कालावधी आहे. विद्यार्थ्यांना छोटी खासगी नोकरी लागण्याची शक्यता आहे.

    धनु

    या आठवड्यात अडचणी येतील. नोकरदारांच्या कामात अडथळे येतील. अशा स्थितीत वेळेचे व्यवस्थित नियोजन करून काम पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाचा भागीदारीत वाद होण्याची शक्यता आहे, त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ देऊ नका. मतभेद तुमच्यातच ठेवा, प्रतिस्पर्ध्यांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्या. अन्यथा, मोठे नुकसान होऊ शकते. माहेरील दागिने किंवा प्रॉपर्टीवरून महिलांचा भावंडांशी वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी घरातील गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

    मकर

    या आठवड्यात आनंददायी असेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांची कामे पटापट होतील. ऑफिसमध्ये छोटे कार्यक्रम होतील, त्यात सहभागी व्हाल. नवीन गुंतवणूक करू शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रॉडक्ट लोकांसमोर आणता येईल. त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळेल. महिलांना मुलांकडून खुशखबर मिळेल, त्यामुळे त्या आनंदी राहतील. अभ्यासात चांगली प्रगती झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.

    कुंभ

    या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या, पथ्य पाळा. नोकरदारांना कामाचा कंटाळा येईल, तेच तेच रुटीन कंटाळवाणे होण्याची शक्यता आहे. जुनी पाठदुखी सुरू होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने रागावर नियंत्रण ठेवावे. उगाच कोणावर चिडू नका, चुकलेल्या व्यक्तीला चूक समजावून सांगा. घरात दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने महिलांना धुळीचा त्रास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षकांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल.

    हेही वाचा – कृष्ण होणे एवढेही कठीण नाही

    मीन

    या आठवड्यात मुलांकडून आनंदाची वार्ता समजतील. नोकरदारांवर वरिष्ठ खूश राहतील. तुमच्या योग्य मागण्या पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. व्यावसायिकांना स्वत:साठी नवीन वाहन खरेदी करता येईल. व्यवसाय वाढीसाठी सोशल मीडियाचा वापर करा; त्यातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. महिलांच्या बाबतीत घरात आनंदी वातावरण राहील, नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल, त्याचा फायदा घ्या.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026

    March 28, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मार्च 2026

    March 27, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 29, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 मार्च 2026; वार : रविवार भारतीय सौर : 08…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026

    March 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मार्च 2026

    March 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026

    Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…

    March 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 251
    • अवांतर 178
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 366
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 518
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn