Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधसाप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 मे 2025

साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 मे 2025

धनंजय जोशी

(‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

संपर्क – 8850453833


मेष

मेष राशीच्या लोकांना हा आठवडा छान जाणार आहे. गाडी, घर, जमीन खरेदी असे काही मनात असेल तर, त्या दिशेने पुढे सरकाल. स्वतःकडे लक्ष देत मौजमजा करा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छोट्या प्रवासाचे योग येतील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याची सुरुवात थोडी काळजी करायला लावणारी असू शकते. आठवडा पुढे सरकला की, चिंता कमी होईल. स्वतःकडे लक्ष द्याल. व्यायाम, वजन कमी करणे अशा सगळ्या गोष्टींचा मुहूर्त कराल. महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात.

मिथुन

मिथुन राशीच्या सर्वांसाठी हा आठवडा शुभवार्ता घेऊन येऊ शकतो. परदेशात जायचे तुमचे बेत असतील तर, या आठवड्यात त्याला गती येईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भावा-बहिणींच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रसंगात खऱ्याची साथ सोडू नये.

कर्क

व्यवसाय, नोकरी अथवा कर्म या सर्व गोष्टींचा दबदबा या आठवड्यात राहणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात धनलाभाचे योग दिसत आहेत. चांदीचा काही दागिना करायचा असल्यास अथवा चांदीचा काही व्यवहार करायचा असल्यास कर्क राशीच्या महिलांनी या आठवड्यात त्याचा विचार करावा.

सिंह

कर्तृत्व गाजवण्याची संधी हा आठवडा घेऊन येईल. धार्मिक कार्य, सत्कर्म या गोष्टीत आठवड्याच्या सुरुवातीला मन रमेल. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसे कर्म मार्गात मन रमेल. स्त्रियांनी या आठवड्यात खर्चाकडे थोडे लक्ष द्यावे. कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून अर्थार्जनाचा योग येऊ शकतो.

कन्या

कन्या राशीसाठी हा आठवडा चिंता घेऊन येऊ शकतो. त्यातून आठवडा जसा पुढे सरकेल तशी नशिबाची, दैवाची साथ लाभेल आणि गोष्टी सुकर होत जातील. शेअर बाजारातून मिळकत असलेल्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मित्र अथवा भावाबरोबर वाद टाळा. व्यवस्थापन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात उत्तम प्रगती होण्याची संधी चालून येईल, त्याचा फायदा करून घ्यावा.

तूळ

प्रतिस्पर्ध्याकडून आठवड्याच्या सुरुवातीला थोडा त्रास संभवतो. आपली कुशाग्र बुद्धी वापरून आलेल्या प्रसंगांना सामोरे जा. नफा-नुकसान सुरूच असते, त्यातून आपले मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नका. स्त्रियांनी घरात आपली मते ठामपणे, पण कोणाला न दुखवता मांडावीत. भविष्यात घडणाऱ्या शुभ गोष्टींचा पाया भरण्याची क्रिया सुरू होईल.

वृश्चिक

उत्तम आरोग्य हाच खरा दागिना, हे लक्षात ठेवा. प्रवासात छोटे अडथळे येऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी निगडित बाबींमध्ये दिरंगाई नको. व्यवहार आणि कागदपत्रे या बाबतीत सावधान रहा. या आठवड्यात कोणती पूजा मनात असेल तर महिलांनी त्याचे नियोजन सुरू करावे.

धनु

संततीशी निगडित विचारांनी आठवड्याची सुरुवात होईल. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे हाताखाली काम करणाऱ्या अथवा घरकाम करणाऱ्या माणसांच्या चिंता वाढतील. आईशी बोलून घरातील अनेक समस्या मार्गी लागतील. बऱ्याच दिवसांत बोलणे झाले नसेल तर जरूर बोलून घ्या.

मकर

मोठ्या बहिणीला भेटायचे योग येऊ शकतात. घरातील बाबीत मन उत्तम रमेल. आत्मशक्ती वाढवण्याकडे या आठवड्यात विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी आशा सोडून देऊ नये. एखादा मार्ग बंद झाला तर, दुसरा नक्की सापडतो. सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

कुंभ

छोट्या प्रवासाची काही योजना असेल तर, ती या आठवड्यात वास्तवात येऊ शकते. वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची नोंद ठेवा. जितकी शिस्त, तितकेच आयुष्य सुकर होणार. नोकरीच्या ठिकाणी आपली बुद्धिमत्ता वापरून आल्या प्रसंगांना सामोरे जा. कला क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांनी काही खर्च समोर आले तर, ती गुंतवणूक आहे, असा विचार करून त्याच्याकडे पहावे.

मीन

नवीन कपडे, नवीन वस्तू घेण्याचे योग या आठवड्यात दिसत आहेत. स्वतःवर खर्च करून त्यातून आनंद प्राप्ती कराल. व्यायाम, उत्तम आहार याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. कलाकारांनी नवीन प्रयोग करताना सावधानता बाळगावी. स्त्रियांनी सौंदर्य प्रसाधने घेताना हात थोडा आखडता घेतलेलाच उत्तम. पैसा योग्य ठिकाणी खर्च होतोय का, याचा त्रयस्थ म्हणून विचार करावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!