Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 नोव्हेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 नोव्हेंबर 2025

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेNovember 16, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात शुभग्रहाची साथ मिळणार आहे. रवी वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. तुम्ही आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकाल. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. एजंट किंवा सेल्समन असणाऱ्यांना त्यांचे ध्येय गाठता येईल. प्रयत्न करा, यशस्वी व्हाल. हा आठवडा समाधानाचा असेल. कुटुंबातील सर्वजण एकमेकांची काळजी घेतील, एकोप्याने राहतील. त्यामुळे महिलांसाठी हा आठवडा समाधानाचा असेल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    वृषभ

    या आठवड्यात बुध-गुरू शुभयोगातून मोठ्यांच्या ओळखीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तरुणाचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल, नियोजन आवश्यक आहे. व्यावसायिक लोक व्यवसाय वाढवू शकतील. कुटुंबातील मुलांची प्रगती होईल आणि त्याचे श्रेय महिलांना मिळेल. उच्च शिक्षणासाठी (परदेशी जाण्यासाठी) विद्यार्थी प्रयत्न करत असतील तर, हा अनुकूल कालावधी आहे.

    मिथुन

    या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरदारांना बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. पण नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. कामानिमित्त परदेशी प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक लोकांनी आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. कुटुंबात मंगलकार्य होण्याची शक्यता असल्याने महिलांसाठी उत्साहाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या बातम्या मिळतील.

    कर्क

    या आठवड्यात व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. जुन्या ओळखीतून नवीन व्यवसाय सुरू करता येईल. जमीन-जुमल्याची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद संपून मार्ग निघेल. सकारात्मक विचार ठेवा. महिलांनी घरातील ज्येष्ठ आणि मुलांची काळजी घ्यावी, घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना साध्य मिळेल.

    सिंह

    या आठवड्यात ओळखीची व्यक्ती आणि मध्यस्थाकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना कर्ज मिळू शकेल. नवीन कल्पना साकार होतील. व्यावसायिक जोडीदाराच्या मताचा आदर करा. नोकरदारांना बढतीचा योग आहे. महिलांना भाऊबंदकीचा त्रास होऊ शकतो, वाद घालू नका. विद्यार्थ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे आणि शिकण्यासंबंधी प्रश्न सुटू शकतात.

    हेही वाचा – Homeopathy : हिवाळ्यातील ॲलर्जी आणि होमिओपॅथीची ऊब 

    कन्या

    या आठवड्यात नोकरीत अनुकूल वातावरण राहील. नवीन घर, वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला ग्रहयोग आहे. नवीन वास्तू घेता येईल. आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तथापि, बोलण्यावर नियंत्रण ठेवा, चेष्टा-मस्करी करू नका. महिलांना भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते.

    तुळ

    या आठवड्यात शुभग्रहाची साथ मिळेल. नोकरदारांकडील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. कष्टाचे चीज होईल. व्यावसायिक परिस्थिती ठीक राहील. भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. वैयक्तिक प्रगती होईल. सर्वांशी मिळून-मिसळून रहा. कुटुंबात मंगलकार्य ठरेल  आणि त्यानिमित्त महिलांना नातेवाईक भेटतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते, सकारात्मक विचार ठेवा.

    वृश्चिक

    या आठवडा नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी चांगला आहे. त्याचबरोबर खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाला प्राधान्य द्या. सरकारी कामे विलंबाने पूर्ण होतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महिलांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू सांभाळून ठेवावीत, गहाळ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू सकारात्मक होईल. कलाकारांना मान-सन्मान मिळू शकेल.

    धनु

    या आठवड्यात शुभग्रहाची साथ मिळेल. वाटचाल चांगली राहील. बुद्धिजीवी लोकांचे उपक्रम यशस्वी होतील. नोकरदारांना नोकरीतील बदल अनुकूल ठरतील. व्यावसायिकांना नवीन पर्याय चांगले यश देतील. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. महिलांना सहकुटुंब धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

    मकर

    या आठवड्यात नोकरदारांसाठी सर्वसाधारण आठवडा आहे. कामे वेळेत पूर्ण करू शकाल. नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांच्या नवीन ओळखी होतील, त्या फायदेशीर ठरतील. व्यवसायाची जागा बदलू शकते. महिलांच्या बाबतीत सहली आणि करमणुकीचे कार्यक्रम ठरतील. विद्यार्थ्यांना विशिष्ट स्पर्धात्मक परीक्षा उत्तमरीत्या पास होता येईल.

    कुंभ

    या आठवड्यात सावधतेने कामे पूर्ण करा. सर्व नियम आणि अटींचे पालन करा. शेअर मार्केटमध्ये किंवा अन्यत्र नवीन गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नोकरीत राजकारणाचा त्रास होऊ शकतो. गटबाजीपासून दूर रहा. मन शांत ठेवा. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. विद्यार्थ्यांचे नैराश्य दूर होईल, सकारात्मक गोष्टी घडतील.

    हेही वाचा – Ayurveda : हेमंत ऋतुचर्या आणि ऋतू संधी काळ 

    मीन

    या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. व्यावसायिक नवीन संकल्पना राबवू शकतील. व्यवसाय विस्तारता येईल. नोकरीत नवीन धोरणे आणि बदल करता येतील, त्याचा फायदा मालकाला होईल. मित्रमंडळींमध्ये विसंवाद आणि वाद टाळा. महिलांनी नात्याला महत्व द्यावे, गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, प्रामाणिक प्रयत्न करा.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    By प्राजक्ता काथेMay 10, 2026

    मेष यश मिळवून देणारा हा कालावधी आहे. या आठवड्यात कमी श्रमात कामे सहज पूर्ण करू…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    प्रसादची हीच ती ‘सखी’!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 293
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 414
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 205
    • मैत्रीण 18
    • ललित 613
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.