Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधसाप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 जून 2025

साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 जून 2025

धनंजय जोशी

(‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)

संपर्क – 8850453833


मेष

मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी शिस्त अथवा वक्तशीरपणा यावरून थोडी चिंता उद्भवू शकते. जसजसा आठवडा पुढे सरकेल, तसतसा तणाव कमी होऊन उत्तम अनुभव येतील. मुलांनी येत्या आठवड्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. रागातून बोलले गेलेले शब्द हानिकारक ठरतात.

वृषभ

कौटुंबिक समस्या अथवा व्यावसायिक समस्यांनी भरलेला आठवडा जाऊ शकतो. उष्णतेमुळे होणारे पोटाचे विकार या आठवड्यात आपल्याला सतावू शकतात. महिलांनी या आठवड्यात घरातील शिस्त कशी टिकेल, याकडे विशेष लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात ताण-तणाव कमी होतील आणि काही आनंदवार्ता ऐकायला येतील.

मिथुन

अहंकार अथवा अहंभाव हा या आठवड्यात डोकं वर काढत नाही ना, याची विशेष काळजी घ्यावी. मित्र-मैत्रिणींशी अथवा भावा-बहिणीशी क्षुल्लक कारणावरून वाद टाळावेत. ‘तुटे वाद संवाद तो हितकारी’ हे या आठवड्याचे सूत्र असणार आहे. महिला आणि लहान मुलांनी छोट्या प्रवासात स्वतःची काळजी घ्यावी.

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात खाण्याच्या बाबतीत जिभेवर ताबा ठेवणे हितकारक ठरेल. मसालेदार, जळजळीत, तिखट पदार्थ जितके कमी खाल तेवढे चांगले. मूळच्या हळव्या असलेल्या या राशीच्या लोकांना या आठवड्यात नातेसंबंधांमधील चढ-उतार अनुभवायला मिळतील. उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात हाती घेतलेले काम आधी पूर्ण करून मग पुढील मनसुबे बनवावेत.

सिंह

मानसिक ताण-तणावातून उद्भवणारे आजार या आठवड्यात डोकं वर काढतील. आपण आपला संयम आणि मनशांती ढळू न देणे, यावर लक्ष केंद्रित करावे. व्यापार करणाऱ्या लोकांनी फसवणुकीमुळे आपले नुकसान तर होत नाही ना, याची खात्री करावी. सिंह राशीच्या महिलांनी या आठवड्यात आपल्या जोडीदाराला जितका जास्त वेळ देता येईल तितका चांगला, याची खूणगाठ मनाशी बांधावी.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या अंगी असलेल्या एखाद्या कलेचा विचार करून त्या कलेला कसा वाव मिळेल, याकडे लक्ष द्यावे. कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना जसे अपयश पचवावे लागते, तसेच यश पचवावेही लागते, हे लक्षात ठेवून वावरणे उत्तम. नोकरदार वर्गाला हा आठवडा कामाच्या ठिकाणी आपली बुद्धी आणि वक्तृत्वाची चुणूक दाखवायची संधी घेऊन येईल.

तुळ

तुळ राशीच्या लोकांना आठवडा सुख, उल्हास, आनंद देणारा ठरणार आहे. मातापित्यापासून आपण दूर राहत असल्यास त्यांना भेटून उत्तम काळ घालवण्याची संधी आपल्याला मिळेल. स्त्रियांनी या आठवड्यात आनंदाच्या भरात खर्च जास्त तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे. नोकरीमध्ये मोठी कामगिरी पार पाडण्याची संधी मिळाल्यास तिचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात छोट्या प्रवासाचे योग येतील. कागदपत्रांशी निगडित कोणती कामे शिल्लक असल्यास ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न या आठवड्यात जरूर करावा. जसजसा आठवडा पुढे जाईल, तसतसे घरातील सकारात्मक ऊर्जा कशी टिकून राहील, याचा विचार करून कृती करावी. विद्यार्थ्यांनी या आठवड्यात आपल्या वर्तवणुकीकडे विशेष लक्ष द्यावे.

धनु

येत्या आठवड्यात धनु राशीच्या जातकांनी खोटे बोलून वेळ मारून नेऊ, हा विचार कटाक्षाने टाळावा. सुख-दुःखाच्या चढउतारांनी भरलेला आठवडा असणार आहे. वाहन चालवताना आपल्याकडून एखाद्या नियमाचे उल्लंघन होत नाही ना, याची काळजी घ्यावी अथवा दंडाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

मकर

अंतर्मुख करायला लावणारा हा आठवडा असणार आहे. मोठ्या भावंडांकडून कानउघाडणी झाली तर, ती आपल्या भल्यासाठीच आहे, याचे स्मरण असावे. ‘पेराल ते उगवते’ आणि ‘दिले ते घ्यावे लागते’ याचा अनुभव या आठवड्यात येईल. महिलांना आपल्या शाळा कॉलेजातील जुन्या मैत्रिणींना भेटण्याचे योग येतील.

कुंभ

थोडी चिंता आणि काळजी घेऊन आठवडा सुरू होईल, म्हणजेच तसा आठवडा पुढे जाईल तसतसे तणाव कमी होतील. परिस्थिती प्रतिकूल झाली तरीही, आपण आपल्या कर्मनिष्ठतेवर लक्ष केंद्रित ठेवावे. कुंभ राशीच्या स्त्रियांनी या आठवड्यात आपल्या जोडीदाराबरोबर बोलता-वागताना त्यांचे मन दुखावणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम प्रगती अनुभवायला मिळू शकते. अनेक दिवस भेडसावत असलेले प्रश्न या आठवड्यात अचानक मार्गी लागतील.

मीन

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी एखादी सुंदर मेजवानी मिळू शकते. मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात धन लाभाचे योग येतील. आपली आई हा आपला पहिला गुरू आहे हे ध्यानात असू द्या. आईने सांगितलेल्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, कानाडोळा केल्यास आपलेच नुकसान आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!