Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 27 मे 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 27 मे 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 6 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 27 मे 2025

वार : मंगळवार

तिथि : अमावस्या 08:32

नक्षत्र : रोहिणी 26:50

योग : सुकर्मा 22:54

करण : किंस्तुघ्न 18:46

सूर्य : वृषभ

चंद्र : वृषभ

सूर्योदय : 06:01

सूर्यास्त : 19:10

पक्ष : कृष्ण पक्ष

मास : वैशाख

ऋतू : वसंत

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127

गंगा दशहरा प्रारंभ

ज्येष्ठ मास आरंभ 08.32


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

पंडित जवाहरलाल नेहरू

स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते आणि स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचे निर्माते पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला, अलाहबाद येथील नामवंत वकील आणि स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल नेहरू यांचे ते सुपुत्र. भारतातील वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक अशी त्यांची ओळख होती. 1947मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी 16 वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविले. नेहरू यांनी 1950च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र असा भारताचा ठसा उमटवला. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ यासह ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ आणि ‘आत्मचरित्र’ यासारख्या त्यांच्या ग्रंथांना अफाट वाचकप्रियता लाभली. 27 मे 1964 रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

थोर विचारवंत, संस्कृत पंडित आणि मराठी विश्वकोषाचे प्रमुख संपादक लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म 27 जानेवारी 1901 रोजी धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर येथे झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी लक्ष्मणशास्त्री यांनी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत प्रवेश केला. तेथे केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. 1923 मध्ये कोलकात्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदू धर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले. 1930 व 1932 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्रत्येक वेळी 6-6 महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. वाईच्या महाविद्यालयाचेही ते संस्थापक-सदस्य होते. प्राज्ञ पाठशाळेतर्फे धर्मकोषाच्या संपादनाचे कार्य हाती घेऊन त्यांनी त्याचे 11 खंड प्रसिद्ध केले. भारतीय संविधान संहितेचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले. अशा या थोर विचारवंताचे 27  मे 1994 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!