Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 21 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 21 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 21 डिसेंबर 2025; वार : रविवार
  • भारतीय सौर : 30 अग्रहायण शके 1947; तिथि : प्रतिपदा 09:10; नक्षत्र : पूर्वाषाढा 27:35
  • योग : वृद्धी 16:35; करण : बालव 22:03
  • सूर्य : धनु; चंद्र : धनु; सूर्योदय : 07:05; सूर्यास्त : 18:04
  • पक्ष : शुक्ल; मास : पौष; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास


दिनविशेष

मराठी संतसाहित्याचे चिकित्सक न. र. फाटक

टीम अवांतर

नामवंत पत्रकार, प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म 15 एप्रिल 1883 भोर येथील जांभळी गावात झाला. 1917 साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बीए झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदूप्रकाश, नवाकाळ या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘सत्यान्वेषी’ आणि ‘फरिश्ता’ या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीयलेखन केले. 1935 ते 1937 या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक होते. 1957 साली ते याच कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्यापासून प्रेरणा घेत फाटक इतिहाससंशोधनाकडे ओढले गेले. संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषांमधील साहित्याचा त्यांनी रसिक आणि आस्थेवाईक दृष्टिकोणातून परिचय करून घेतलेला होता. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी, श्री एकनाथ वाङ्‍मय आणि कार्य, ज्ञानेश्वर : वाङ्‍मय आणि कार्य, रामदास : वाङ्‍मय आणि कार्य या़सारखे संतांच्या साहित्यावर आधारित ग्रंथरचना असो वा मराठेशाहीचा अभ्यास आणि अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी हे त्यांचे दोन प्रसिद्ध इतिहासग्रंथ असोत, त्यांची संशोधनवृत्ती कायम जाणवते.

हेही वाचा – Homeopathy : आतड्यांचे आरोग्य… असंतुलनाची मुळं खोल, पण उपाय तुमच्या पोटातच!

1857 चे बंड हे स्वातंत्र्ययुद्ध नसून एक ‘शिपाईगर्दी’ होती हे फाटकांचे मत अत्यंत वादग्रस्त ठरले, त्याबद्दल त्यांना कठोर टीकाही सहन करावी लागली होती. आदर्श भारत सेवक या नावाने त्यांनी लिहिलेल्या गोपाळकृष्ण गोखले यांच्या चरित्राला 1970 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता.

भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ अशा विविध संस्थांशी ते सदस्य किंवा पदाधिकारी या नात्याने जोडले गेले होते. 1947 साली हैदराबाद येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 21 डिसेंबर 1979 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!