Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 16, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 16 फेब्रुवारी 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 27 माघ शके 1947; तिथि : चतुर्दशी 17:33; नक्षत्र : श्रवण 20:47
    • योग : वरियन 25:49; करण : चतुष्पाद 29:36
    • सूर्य : कुंभ; चंद्र : मकर; सूर्योदय : 07:07; सूर्यास्त : 18:38
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    सोमवती अमावस्या (प्रारंभ सायंकाळ 05:33)

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला काही आरोग्यविषयक चिंता जाणवू शकतात. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुमचे विरोधक सक्रिय असतील, त्यामुळे सावध रहा. कौटुंबिक मतभेद वाढू शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल.

    वृषभ – एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. त्यामुळे कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा. याशिवाय मोठा धोका पत्करणे टाळा. नोकरीत कामाचा ताण थोडा वाढेल. आज जोडीदाराशी एखाद्या विषयावरून मतभेद होईल किंवा भावाशी, पुतण्याशी वाद होऊ शकतो. डोके शांत ठेवा. वाद मिटविण्याचा प्रयत्न करा.

    मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल. व्यवसायात आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. एखादा एक नवीन प्रकल्प सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकता. कुटुंबात एखादी शुभ घटना ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक खरेदी करणे टाळा.

    कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. धार्मिक तीर्थयात्रेला किंवा इतर पर्यटनस्थळी जाऊ शकता. आज एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल, ज्यांच्यामुळे भविष्यात फायदा होईल. नवीन व्यवसायाच्या संकल्पनेच्या दिशेने काम सुरू करू शकता. याशिवाय एखादा मोठा करार किंवा भागीदारी याला अंतिम रूप मिळेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.

    सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरी करत असाल तर आज तुम्हाला तिथे यश मिळेल. व्यवसायात असाल तर तुम्हाला नवीन ऑफर देखील मिळू शकते. तुमची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होईल. आज कुटुंबातील सर्वांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांकडून देखील तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील.

    कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नियोजित कामे पूर्ण होतील. आरोग्यात सुधारणा होईल. आज जवळच्या व्यक्तीची भेट होईल. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळू शकते. रखडलेली व्यावसायिक कामे पूर्ण होऊ शकतात. एक नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू कराल.

    तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नोकरी शोधत असाल तर आज तुम्हाला यश मिळेल. आरोग्याबद्दल थोडी सावधगिरी बाळगा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज एखादा खास प्रकल्पाचे नियोजन करू शकता. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असलेले मतभेद दूर होतील.

    हेही वाचा – आरूबरोबर दागिन्यांची खरेदी करताना सियाचं लक्ष दरवाजाकडे होते…

    वृश्चिक – आज आरोग्यात होणाऱ्या चढ उतारांमुळे काळजी वाटू शकते. म्हणून खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायात तुमचे नुकसान होऊ शकते. कामाचे ठिकाण बदलणे तुमच्या हिताचे ठरणार नाही. कुटुंबात वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा.

    धनु – आज  मानसिक आरोग्य बिघडू शकते. व्यवसायात सावधगिरीने व्यवहार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचे असेल तर आजचा दिवस त्यासाठी योग्य नाही. कुटुंबात मालमत्तेबाबत वाद निर्माण होतील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा कमी होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. वाहने चालवताना सावधगिरी बाळगा.

    मकर – मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना बढती मिळेल. घरातील वातावरण उत्तम असेल. आज कुटुंबासह बाहेर देखील जाऊ शकता.

    कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. संततीला एखादी नोकरी मिळू शकते. याशिवाय एखादी चांगली बातमी कानावर पडेल. तुमचे आरोग्य काहीसे नरमगरम असेल. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आज मित्र आणि कुटुंबाकडून आर्थिक मदत देखील मिळू शकते.

    मीन – आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. संततीशी संबंधित एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते. कुटुंबातील वातावरण अनुकूल असेल. आज एक नवीन व्यवसायाची योजना आखली जाऊ शकते. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात तुमचा विजय होईल. पैसा जपून वापरा, अनावश्यक खर्च टाळा.


    दिनविशेष

    शिक्षणतज्ज्ञ रँग्लर र. पु. परांजपे

    टीम अवांतर

    उदारमतवादी समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1876 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी येथे झाला. 1896 मध्ये रघुनाथ परांजपे पहिल्या वर्गात बी. एस्सी. उत्तीर्ण झाले. पुढे भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. तेथील मॅथेमॅटिकल ट्रायपॉस परीक्षेत जॉर्ज बर्थव्हिसल यांच्याबरोबर सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘सीनियर रँग्लर’ हा बहुमान संपादन केला. त्यामुळे पाश्चात्त्यांमध्ये बौद्धिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेला पहिला धक्का बसला तर भारतीयांच्या बौद्धिक कार्यक्षमतेवर जगातील प्रगत राष्ट्रांचा विश्वास बसला. 1899 ते 1901 या कालावधीत पॅरिस तसेच गटिंगेन विद्यापीठांत त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. 1901 साली ते भारतात परतले आणि आयसीएसचा (इंडियन सिव्हिल सर्व्हिस) मोह टाळून ते फर्ग्युसन कॉलेजात प्राचार्य आणि गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

    प्राचार्यपदाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळताना परांजपे यांनी फर्ग्युसन कॉलेजला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. तत्कालीन राजकीय, सामाजिक चळवळीतही त्यांनी भाग घेतला. ते स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेत. धार्मिक कर्मकांड, ईश्वर, परलोक, पुनर्जन्म यांसारख्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. नॅशनल लिबरल फेडरेशनच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा होता. न्यायमूर्ती रानडे आणि  गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेमस्त राजकारणाचा त्यांनी पुरस्कार केला. प्रसंगविशेषी त्यांनी टिळकांच्या जहाल मतप्रणालीस विरोधही केला. उदारमतवादी नेमस्त पुढारी तसेच बुद्धिवादी समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याती होती.

    हेही वाचा – पाण्याशी आपले अतूट नाते!

    परांजपे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यात  मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री, अबकारी खात्याचे मंत्री, इंडियन कौन्सिलचे सभासद, लखनऊ आणि  पुणे विद्यापीठांचे कुलगुरू, याशिवाय ऑस्ट्रेलियातील भारताचे हाय कमिशनर  यासारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने 1916 मध्ये कैसर-इ-हिंद सुवर्णपदक तर 1942 साली नाइटहूड पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

    परांजपे यांच्या निवडक लेखन–भाषणांचा संग्रह बी. एम्. गोरे यांनी संपादित केला आहे. ‘एटीफोर नॉट आऊट’ हे त्यांचे छोटेसे इंग्रजी आत्मचरित्र नॅशनल बुक ट्रस्टतर्फे 1961 साली प्रसिद्ध झाले. याशिवाय द क्रक्स ऑफ द इंडियन प्रॉब्लेम हे त्यांचे पुस्तक उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेले स्फुट लेखनही विपुल आहे. परांजपे यांचे बहुतेक सर्व लेखन इंग्रजीतच आहे. 6 मे 1966 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    By प्राजक्ता काथेApril 12, 2026

    मेष रागावर नियंत्रण ठेवा या आठवड्यात 15 तारखेला रवी मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 265
    • अवांतर 180
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 382
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 193
    • मैत्रीण 18
    • ललित 549
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.