Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 14 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 14 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 14, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 नोव्हेंबर 2025; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 23 कार्तिक शके 1947; तिथि : दशमी 24:48; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 21:19
    • योग : वैधृति 30:24; करण : वणिज 12:06
    • सूर्य : तुळ; चंद्र : सिंह 27:50; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:01
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – अनावश्यक धावपळ टाळणे चांगले. अनपेक्षितपणे स्वप्ने सत्यात उतरतील. परस्पर सहकार्याने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. कामात प्रगती होईल. तुम्हाला एखादी आवडती वस्तू भेट म्हणून मिळेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील.

    वृषभ – प्रगतीच्या संधी फळास येतील. उत्पन्न आणि खर्च संतुलित राहतील. आज मिष्टान्नाचा योग आहे. मेळावे आणि चर्चासत्रांमध्ये तुमच्या भाषणामुळे आदर आणि सन्मान वाढेल. फायदेशीर कामासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

    मिथुन – गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळे घाई करू नका. कामात व्यग्र राहाल, पण आजच महत्त्वाची कामे पूर्ण करा; नंतर ती वेळखाऊ ठरतील. दुपारपासून नशीबाची मोठी साथ मिळेल. भावंडांकडून एखाद्या निर्णयावरून विरोध होण्याची शक्यता आहे. व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल.

    कर्क – व्यावसायिक समृद्धी स्पष्ट होईल, आज व्यवसायात  नफा मिळू शकेल. त्यामुळे आनंद वाढेल. तथापि, व्यावसायिक उपक्रमांमध्ये काही उलथापालथ होऊ शकते. वाढत्या कामाचा ताण आरोग्यावर आणि विश्रांतीवर परिणाम करेल. आज ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींची सहानुभूती मिळेल.

    सिंह – सरकारी कामातून फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल. संभाषणात संयम ठेवा, नैतिक मर्यादा पाळा. भूतकाळातील चुकांबद्दल पश्चात्ताप होईल. गाडी चालवताना सावध राहा. खाण्याच्या सवयींबद्दल अधिक काळजी घ्या. पाहुणे येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

    हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    कन्या – कुटुंबात परस्परांबद्दल स्नेह वाढेल. कुटुंबासह एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्याचे बेत कराल. मानसिक अस्वस्थता वाढवणाऱ्या वातावरणापासून मुक्त व्हाल. भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. तुम्ही स्वतःला अधिक सक्रियपणे काम करताना बघाल. रिअल इस्टेट किंवा शेतीविषयक उपक्रमात रस निर्माण होईल.

    तुळ – ज्यांना हितचिंतक समजता तेच तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. सध्या व्यवसायाच्या निमित्ताने होणारे प्रवास पुढे ढकलू नका. सहकाऱ्यांकडून कमी पाठिंबा मिळेल, त्यामुळे बाहेरच्या मदतीची अपेक्षा कराल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचार ठेवा, चांगले परिणाम पाहायला मिळतील. हा काळ नकारात्मक परिणामांचा आहे.

    वृश्चिक – आशा आणि उत्साह यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये वाढ होईल. पत आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काही सामाजिक कार्य हाती घ्याल. कुटुंबातील सदस्य मदत करतील, त्यामुळे आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.

    धनु – संसाराच्या इतर बाबींमध्ये अडकणे टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कालच्या मेहनतीचे आज फायदे होतील. कामातील अडथळे दूर होतील. आज कुटुंबातील सदस्य आणि सहकारी यांचा पाठिंबा मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च कराल.

    मकर – तुमच्या कामांचा पुनर्विचार करा. वैचारिक संघर्ष आणि असंतोष कायम राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या. आनंद आणि सकारात्मकता याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. वायफळ खर्च होणार नाही, याकडे लक्ष ज्या, जेणेकरून उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राहील. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे.

    कुंभ – व्यावसायिक समृद्धी शक्य होईल त्यामुळे आनंद वाढेल. तुम्हाला मान्यवरांचा मोठा पाठिंबा मिळेल. व्यवसायात नफा मिळू शकतो. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. शुभ कार्यांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. काम भरपूर होईल. नफा होईल, जुन्या मित्रांची भेट होईल.

    हेही वाचा – भैरवी… केतनचा वाढदिवस!

    मीन – दिवस आनंदाचा आणि व्यावसायिक प्रगतीचा असेल. तुम्हाला प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्य आणि जीवनमानात सुधारणा होईल. ज्ञान आणि विज्ञान या विषयांमध्ये गोडी निर्माण होईल. प्रतिष्ठित लोकांच्या सहवासाचा आनंद मिळेल. अनावश्यक दगदग टाळणे चांगले.


    दिनविशेष

    रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर

    टीम अवांतर

    मनस्वी चित्रकार, रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगांवकर यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1918 रोजी गोव्यातील अस्नोडा या गावी झाला. त्यांचे वडील शंकरराव हे नामांकित चित्रकार होते. वडील बंधूही चित्रकार होते. त्यामुळे लहानग्या रघुवीरमध्येही हा वारसा आलाच! लहानपणी वडिलांकडून चित्रकलेचे धडे घेत असताना, शेजारी राहणाऱ्या प्रसिद्ध चित्रकार त्रिंदाद यांचेही रघुनाथ सतत निरीक्षण करत असे. त्रिंदादनीही रघुवीरमधील कलागुण ओळखले आणि वडिलांच्या मागे लागून रघुवीर यांना मुंबईला पाठवले. येथे आल्यावर त्याकाळचे ख्यातनाम चित्रकार एस. एम. पंडित यांच्याकडे काही काळ ते राहिले. अर्थात, या सगळ्यात मुळगांवकरांनी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मात्र घेतलेच नाही. त्यांना ती ईश्वरी देणगी होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या चित्राला पोर्तुगीज सरकारचे बक्षीस मिळाले होते. मुंबईत विविध प्रकाशकांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ तयार करून देण्याचे काम मुळगांवकरांना मिळाले आणि इथूनच हळूहळू त्यांचे नाव प्रसिद्ध होऊ लागले. देवदेवता हा विषय मुळगांवकरांनी आपल्या कुंचल्याने घराघरांमध्ये पोहोचवला. विविध देवांना त्यांनीच चेहरे दिले. याशिवाय बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा तसेच त्यांचे कथानायक धनंजय-छोटू, झुंजार-विजया, काळा पहाड, सुदर्शन खूपच लोकप्रिय झाले होते. मुळगांवकरांनी या सर्व कथानायकांना चेहरे देऊन त्यांना अमर केले. पुढे चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी मुळगांवकरांना राजकमलचे कला-दिग्दर्शक म्हणून घेतले आणि  त्यांच्या अनेक चित्रपटांची पोस्टर्स मुळगांकरांनी रेखाटली, त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. कलाविश्वात रममाण असतानाच अचानकपणे 30 मार्च 1976 रोजी वयाच्या केवळ 58 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn