Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    July 9, 2026

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 10, 2026Updated:July 10, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 10 जुलै 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 19 आषाढ शके 1948; तिथि : दशमी 08:16, एकादशी 29:22; नक्षत्र : भरणी 13:15;
    • योग : धृति 07:14, शूल 27:50; करण : बव 18:53;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : मेष 18:44; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:20;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    योगिनी स्मार्त एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ‘लिटील मास्टर’ सुनील मनोहर गावसकर

    टीम अवांतर

    क्रिकेटच्या इतिहासात विक्रमादित्य हे बिरूद सार्थ ठरवणाऱ्या लिटील मास्टर सुनील गावसकर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला. 1971 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गावसकर यांनी कसोटीत 10 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारे ते पहिले खेळाडू ठरले.

    वेस्ट इंडिजमधील पदार्पण कसोटी मालिकेत त्यांनी 774 धावा काढून मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यानंतर त्यांची बॅट ‍निवृत्तीपर्यंत तळपत राहिली. 1983 मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (29 शतके) विक्रम मोडला. गावसकर यांनी कारकिर्दीत 35 कसोटी शतके ठोकली. त्यांचा हा विक्रम 2005 पर्यंत अबाधित होता. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन ‍तेंडुलकरने हा विक्रम मोडला. सलग तीन डावात शतक काढण्याचा विक्रमही गावसकर यांच्या नावावर आहे. (2006 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग याने या विक्रमाशी बरोबरी केली.)

    हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    1970 ते 1980 या दशकात गावसकर यांनी बराच काळ भारतीय संघाचे कर्णधार पदही भूषवले होते. याशिवाय,, 1983 साली भारताला विश्वकरंडक जिंकून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. फलंदाजीबरोबर गावसकर उत्तम क्षेत्ररक्षकही होते. यष्टीरक्षकाव्यतिरिक्त कसोटीत 100 हून जास्त झेल टिपणारा पहिला भारतीय होण्याचा मानही त्यांच्याच नावे आहे.

    गावसकर आक्रमक फलंदाज नसले तरी, त्यांचे फटके मारण्याचे तंत्र विशेष होते. लेट फ्लिकचे ते बादशहा होते. खर्‍या अर्थाने ते कसोटी क्रिकेटचे खेळाडू होते. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात त्यांना पहिले शतक काढण्यासाठी 1987 पर्यंत वाट बघावी  लागली. कसोटीतील त्यांच्या अव्दितीय कामगिरीमुळे 1980 मध्ये त्यांना व्हिस्डेन या क्रिकेटमधील प्रसिद्ध मासिकातर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले.

    निवृत्तीनंतर त्यांनी सनी डेज, आयडल्स, रन्स अन रूइन्स आणि वन डे वंडर ही चार पुस्तकेही लिहिली आहेत. सुनील गावस्कर यांनी मराठी चित्रपट ‘सावली प्रेमाची’ मध्ये मुख्य भूमिका देखील साकारली. शिवाय, 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘मालामाल’ सिनेमात देखील ते एका लहान भूमिकेत दिसले होते.

    क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने 1975 मध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार, 1980 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 2009 मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. 2012 मध्ये बीसीसीआय सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव केला गेला. मुंबईचे मानद शेरीफ म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ असे नाव देऊन त्यांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे. सध्या ते एक प्रसिद्ध समालोचक आणि स्तंभलेखक म्हणून कार्यरत आहेत.


    आजचे राशिभविष्य

    मेष – काहीतरी नवीन आणि मोठे काम करण्याची आज इच्छा जागृत होईल, त्याचबरोबर तुम्हाला जुनी, अपूर्ण कामे हातावेगळी करण्याची संधीही मिळेल. आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा सोबती असेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांनाही मानसिक तणावातून दिलासा मिळेल. त्यांना अभ्यासाबद्दल अधिक आत्मीयता वाटेल.

    वृषभ –  निर्णय घेताना आज गांभीर्य राखणे महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक वेळी खेळकर वातावरणातच काम होईल याची शाश्वती नाही. कुटुंबासोबतची सहल केवळ अविस्मरणीयच ठरणार नाही, तर तुमचे नातेसंबंधही अधिक दृढ करणारी असेल. जोडीदारासाठीचे एखादे छोटेसे सरप्राईज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. संततीला मिळालेली एखादी संधी किंवा सन्मान तुमच्या अभिमानाचा विषय ठरेल.

    मिथुन – आजचा दिवस सामान्य वाटला तरी त्यात अनेक महत्त्वाच्या संधी दडलेल्या आहेत. व्यावसायिकांना एका प्रभावशाली व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यातील यशाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगा. घाईने घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सावधगिरीने पावले उचलणे आवश्यक आहे.

    कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी संधी आणि यश घेऊन येत आहे. एखादा प्रलंबित व्यावसायिक करार अखेर मार्गी लागू शकतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सृजनशील आणि डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्यांना एखादी सुवर्णसंधी मिळू शकते. व्यवसायाला नवी दिशा देण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

    सिंह – तुमची नेतृत्व कौशल्ये आज अनेकांना प्रभावित करणारी असतील. तुमचा प्रभाव पूर्वीपेक्षा अधिक जास्त दिसून येईल. कामातील तुमची मेहनत आणि समर्पण तुम्हाला आदर, प्रशंसा किंवा एखादे विशेष यश मिळवून देऊ शकते. विद्यार्थ्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ते यशाच्या जवळ पोहोचतील. जुन्या व्यवहारांमधून नफा मिळण्याचीही शक्यता आहे.

    कन्या – आजचा दिवस व्यस्त असेल, पण योग्य दिशेने केलेल्या कठोर परिश्रमाचे उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. आपल्या मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. काही जुन्या कौटुंबिक समस्या पुन्हा उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    तुळ – आज सकाळची सुरुवात थोडी संथ होऊ शकते. कौटुंबिक वाद चर्चेतून मिटू शकतो. आज तुमच्या शब्दांना विशेष महत्त्व असेल, म्हणून विचारपूर्वक बोला. पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमधील तुमची आवड वाढू शकते. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची गरज आहे.

    वृश्चिक – आजचा दिवस तुम्हाला संयम आणि समजूतदारपणाचे महत्त्व शिकवेल. क्षुल्लक गोष्टींवरून रागावणे टाळा.  प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकते. आज प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. घाई करणे हानिकारक ठरू शकते.

    हेही वाचा – बनाना डिलाइटची गोष्ट…

    धनु – आज तुम्हाला काहीतरी मोठे आणि नवीन करण्याची प्रेरणा मिळू शकते. नवीन काम शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक शिस्त पाळण्याची गरज भासेल. कोणाकडून पैसे येण्याची शक्यता असेल, तर ते परत मिळतील. कायदेशीर प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो.

    मकर –  खर्च नियंत्रणात ठेवणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल. घाईने घेतलेला निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. रखडलेले एखादे काम आज पूर्ण होऊ शकते. नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवा. एखाद्या कामासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते मिळण्याची दाट शक्यता आहे. संततीच्या शिक्षणाबद्दलची तुमची चिंता हळूहळू कमी होऊ शकते.

    कुंभ – आज मनात नवीन कल्पना येतील, ज्या भविष्यात यशाकडे नेऊ शकतात. व्यवसाय किंवा कामातील सर्जनशील विचारसरणी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. आरोग्याच्या कोणत्याही किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे कौतुक केले जाईल. तुमच्या पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्यांविषयीच्या चर्चा अधिक तीव्र होऊ शकतात.

    मीन – नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस आशादायक ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सांघिक कार्य तुम्हाला महत्त्वपूर्ण ध्येये साध्य करण्यास मदत करू शकते. काही विरोधक तुम्हाला तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुमची बुद्धिमत्ता आणि सतर्कता त्यांचे प्रयत्न हाणून पाडतील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    July 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    July 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 18…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    July 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    July 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जुलै 2026

    July 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    July 9, 2026

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 354
    • अवांतर 194
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 483
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 232
    • मैत्रीण 24
    • ललित 769
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    July 9, 2026

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.