Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, भविष्य आणि दिनविशेष; 08 ऑगस्ट 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, भविष्य आणि दिनविशेष; 08 ऑगस्ट 2025

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 8, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार

    भारतीय सौर : 17 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 14:12; नक्षत्र : उत्तराषाढा 14:27

    योग : आयुष्मान 28:08; करण : विष्टी 25:51

    सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10

    पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    नारळी पौर्णिमा
    (पौर्णिमा प्रारंभ – दुपारी 02:12)

    जिवंतिका पूजन


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्याच्या मदतीने महत्त्वाचे कामही पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदात असाल. व्यवसायासाठी नवीन योजना कराव्या लागू शकतात. त्याचवेळी काही अडथळ्यांनाही तोंड द्यावे लागू शकते, ज्यामुळे लाभ मिळण्यास विलंब होईल.

    वृषभ – कोणत्याही कामात अतिउत्साह आणि अतिघाई करणे टाळा. असे केल्याने, जे काम सुरू आहे, ते देखील बिघडू शकते. काही आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे त्रास वाढू शकतो. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आर्थिक बाबतीत अनपेक्षित फायदे मिळू शकतात, समाजात आदरही वाढेल. यामुळे मन आनंदी राहील. परंतु व्यवहार करताना काळजी घ्या, अन्यथा एखादे काम बिघडू शकते. कुटुंबातील समस्या एकत्र बसून सोडवणे योग्य होईल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

    कर्क – कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फायदे मिळू शकतात. कामाच्या निमित्ताने दूरचा प्रवास करावा लागेल. काही महत्त्वाची कामे प्रलंबित असतील तर ती वेळेत पूर्ण करा अन्यथा नुकसान होऊ शकते. शहाणपणाने निर्णय घेतले तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

    सिंह – व्यवसायातील सर्व कामे हळूहळू पूर्ण होतील, ज्यामुळे मानसिक ताणतणाव देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. व्यवसायात नफा मिळविण्याच्या संधी उपलब्ध होतील. चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. परंतु खर्च वाढू शकतो. अशा परिस्थितीत, बजेट बनवून पैसे खर्च करणे चांगले.

    कन्या – कामाशी संबंधित अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे मन आनंदी राहील आणि बिघडलेले कामही हळूहळू पूर्ण होऊ लागेल. जे काम वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे असेल, त्या कामाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.

    हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव

    तुळ – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला असेल. मन लावून काम कराल आणि त्याचा सहकाऱ्यांवरही योग्य परिणाम होईल. समस्या असतील तर त्या आता दूर होतील. काळवेळ याचा अंदाज घेऊन निर्णय घेतल्यास प्रगती कराल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डोळ्यांशी किंवा पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात.

    वृश्चिक – कामाच्या ठिकाणी कठीण कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतात. त्यातून नफा कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. नोकरदार जातकांचा दिवस चांगला जाईल. काही कारणांमुळे डोकेदुखी किंवा मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो.

    धनु – वाहन किंवा घराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे उत्साह वाढेल. मित्रांच्या सहकार्याचाही फायदा होईल. आर्थिक स्तरावर परिस्थितीत सुधारणा होईल. मात्र कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या त्रास देऊ शकते.

    मकर – कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना राबवू शकता, ज्याला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. यामुळे नियोजित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. विरोधकही माघार घेतील. कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्याची देखील आवश्यकता असू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस सामान्य राहील.

    कुंभ – आज सगळ्याच प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. योजना यशस्वी देखील होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मामाकडूनही काही फायदा होऊ शकतो. जुने मित्र घरी भेटायला येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विनाकारण कोणावरही संशय घेणे टाळावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते.

    मीन – दिवस फायदेशीर ठरणार आहे. गोड बोलण्याने आणि वागण्याने कामाच्या ठिकाणी परिस्थिती सकारात्मक ठेवाल. कामात काही समस्या असल्यास ती आता सोडवता येईल. तसेच, काम उरकण्याच्या झपाट्याने विरोधकांना आश्चर्य वाटेल. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत हुशारीने निर्णय घ्यावे लागतील.

    हेही वाचा – Emotional scene : खरे अश्रू अन् खोटे अश्रू!

    दिनविशेष

    कथालेखिका सुमती क्षेत्रमाडे

    टीम अवांतर

    मराठी कथालेखिका, कादंबरीकार आणि प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका अशी ओळख असणाऱ्या सुमती क्षेत्रमाडे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी 27 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. मॅट्रिकच्या परीक्षेत नासिक केंद्रात त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्या होत्या. पुढे पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची एल्. सी. पी. एस्. ही वैद्यक-शास्त्रातील पदवी मिळविली. 1948 साली त्या वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या. तिथल्या रोटंडा विद्यापीठाची बालरोग आणि प्रसूतिशास्त्रातील एल्. एम्. ही पदवी घेऊन त्या 1950 मध्ये भारतात परतल्या आणि कोल्हापूर येथे खासगी दवाखाना सुरू केला. वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. ‘वादळ’ ही पहिलीच कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री आणि माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. कथालेखनानंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. या साहित्यिक प्रवासात वीस कथासंग्रह, 15 कादंबऱ्या, कुमार वाङ्मय आणि दोन नाटके प्रसिद्ध झाली. प्रीतिस्वप्न, बीजेची कोर हे कथासंग्रह; महाश्वेता, मैथिली, श्रावणधारा, मेघमल्हार, अनुहार, युगंधरा, वादळवीज, पांचाली, तपस्या इत्यादी कादंबऱ्या तसेच भैरवी तसेच मीच जाहले माझी मृगया ही नाटके, या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत. युगंधरा या कादंबरीवर दूरदर्शन मालिका प्रसारित झाली आणि ती लोकप्रियही झाली. त्यांच्या महाश्वेता आणि मेघमल्हार या कादंबऱ्यांचे गुजरातीत, तर श्रावणधारा आणि मेघमल्हार यांचे हिंदीत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या स्वप्न अधुरा या गुजरातीत अनुवाद केलेल्या नाटकाला 1973 साली  केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला. 8 ऑगस्ट 1998 रोजी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.