दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार
भारतीय सौर : 16 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 14:27; नक्षत्र : पूर्वाषाढा 14:00
योग : विष्कंभ 06:41, प्रीति 29:38; करण : गरज 26:24
सूर्य : कर्क; चंद्र : धनु 20:10; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
बृहस्पती पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस अपेक्षित लाभ मिळवून देणारा असेल. व्यवसायाच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार जातकांना एखादी चांगली संधी मिळेल. तथापि, कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. संततीच्या करिअरबद्दल एखाद्या चांगल्या समुपदेशकाचा सल्ला घ्या.
वृषभ – आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. वरिष्ठांच्या मदतीने एखाद्या चांगल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. मात्र काही शारीरिक समस्या चिंतेत टाकतील. भावनांमध्ये वाहून जात कोणत्याही कामाला होकार देऊ नये. सासरच्या मंडळींपैकी कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळू शकतील.
मिथुन – आजचा दिवस आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. प्रतिष्ठेत वाढ झाल्याने खूप आनंदी असाल. मात्र आनंदाच्या भरात घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे समस्या निर्माण होतील. दुसऱ्याच्या बाबतीत अनावश्यक हस्तक्षेप करू नका. लहान प्रवासाचे योग आहेत, ज्यातून फायदा होईल.
कर्क – कामाच्या प्रचंड दबावामुळे त्रासलेले असाल. तरी अशा प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहील. घाईघाईने कोणतेही काम केल्यास नुकसान होईल. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन गुंतवणूक करणे टाळा. कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करण्याचा आज सर्वतोपरी प्रयत्न कराल. नोकरीची चिंता असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल.
सिंह – आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कोणत्याही कामाबद्दल गोंधळ असेल तर तो दूर होईल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या विरोधकांपासून सावध राहावे, अन्यथा ते प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक समस्येमुळे चिंता वाढेल. मात्र प्रगतीचा मार्ग सोडून नका.
कन्या – आजचा दिवस सुखसोयींमध्ये वाढ करणारा आहे. छंदांवर आणि सुखसोयींवर आज बऱ्यापैकी खर्च कराल. आतापर्यंत पैसे कुठे अडकले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. पालकांकडून भक्कम पाठिंबा मिळेल. सहकाऱ्याशी एखाद्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते. भूतकाळात केलेल्या एखाद्या कामाचा चांगला मोबदला मिळेल.
हेही वाचा – Nakshatra : श्रवण, धनिष्ठा आणि शततारका
तुळ – आजचा दिवस जबाबदारीने काम करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे एखाद्या नातेवाईकाचा पाठिंबा मिळेल. पैशाशी संबंधित व्यवहार करणाऱ्या जातकांना कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. आज जर कोणाला पैसे उधार दिलेत तर ते परत मिळण्याची शक्यता खूप कमी असेल.
वृश्चिक – आजचा दिवस सुखसोयींमध्ये वाढ करणारा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल. तुमच्या निर्णयांनी लोक आश्चर्यचकित होतील. पालकांच्या आशीर्वादाने प्रलंबित काम पूर्ण होईल. व्यवहाराशी संबंधित कोणतेही प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करा. निर्णयक्षमता चांगली होईल.
धनु – आजचा दिवस अतिशय उत्तम जाणार आहे. जे काही काम हाती घ्याल त्यात चांगले यश मिळेल, मात्र आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. काही महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. कामात कोणतेही धोकादायक निर्णय घेऊ नका. अत्यंत संयमा़ने सगळी कामे पूर्ण करा. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मकर – उत्पन्नात वाढ होणार आहे. दुसऱ्या चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. कौटुंबिक बाबींमुळे काही तणाव असेल तर, तोही दूर होईल. मिष्टान्नाचा योग आहे. इच्छित वस्तूंच्या खरेदीसाठी सहज खर्च करू शकाल. बजेट प्लॅनचे पालन करणे चांगले होईल, जेणेकरून खर्च नियंत्रणात राहतील.
कुंभ – काही नवीन ओळखींमुळे फायदा होईल. काही समस्या असतील तर त्यावर उपाय मिळण्याची शक्यता आहे. कोणाशीही बोलताना खूप काळजी घ्या, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्राधान्याने प्रयत्न कराल. मामाच्या बाजूने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
मीन – व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. महत्त्वाच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असेल तर संयम बाळगा. काही नवीन प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल. संततीबद्दल काही काळजी वाटत असेल तर ती समस्या देखील दूर होईल. नवीन मालमत्ता खरेदीचा योग आहे, जी तुमच्यासाठी फलदायी ठरेल.
हेही वाचा – Nakshatra : पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती
दिनविशेष
डॉ. आनंद दिनकर कर्वे
टीम अवांतर
भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ आणि ग्रीन ऑस्कर समजला जाणारा ॲश्डेन पुरस्कार 2002 आणि 2006 असा दोनवेळा मिळविणाऱ्या पुण्यातील ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (ARTI) या संस्थेचे प्रवर्तक असणाऱ्या डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1936 रोजी पुण्यात झाला. वडील दिनकर धोंडो कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर आई डॉ. इरावती कर्वे या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ होत्या. पुणे विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी आनंद कर्वे यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. नंतर उच्च शिक्षणासाठी ते जर्मनीच्या ट्यूबिंगन विद्यापीठात गेले आणि 1960मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर चार वर्षे ते भारतामध्ये पंजाब विद्यापीठात व्याख्याते होते. 1964-66 या काळात ते शिवाजी विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर 1982 सालापर्यंत ते फलटण येथील निंबकर सीड्स संशोधन संस्थेचे संचालक होते. म्यानमार येथे युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने भुईमूगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पहिले होते. करडई तेलबियावरील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या सेंटर फॉर ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंट (केस्टफोर्ड) या प्रकल्पात 1988 मध्ये ते सहभागी झाले. 1992 मध्ये कर्वे हे त्या प्रकल्पाचे उपसंचालक आणि नंतर संचालक झाले. पारंपरिक जैवइंधन वापरून घरी स्वयंपाक कसा करता येईल, यावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या संयंत्रामधून फक्त एक किलो जैवखाद्यापासून 500 ग्रॅम इंधन वायू मिळविता येत होता. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. कर्वे यांना ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची स्थापना करण्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्रात अशा 1 हजारपेक्षा अधिक संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. या संयंत्रातून मिळणारा मिथेन वायू अन्न शिजविण्यासाठी तसेच पेट्रोल आणि डीझेल इंजिने तसेच विद्युत् जनित्रे चालविण्यासाठी वापरता येतो. याच काळात जैवखाद्यापासून जैवइंधन आणि शेतीतील कचऱ्यापासून कांडी कोळसा तयार करण्याची पद्धत डॉ. कर्वे यांनी विकसित केली. तंदूर, बार्बेक्यू किंवा घरगुती कोळशाच्या शेगडीत तसेच लोहारकामासाठी हा कोळसा वापरता येतो. हा कोळसा जळताना फारसा धूर येत नसल्याने वायुप्रदूषण होत नाही. डॉ. कर्वे यांनी आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक संशोधन प्रकल्प राबविले. त्यांनी सुमारे 125 संशोधनपर निबंध आणि 125 शास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.