Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 06 नोव्हेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 06 नोव्हेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 06 नोव्हेंबर 2025; वार : गुरुवार
  • भारतीय सौर : 15 कार्तिक शके 1947; तिथि : प्रतिपदा 14:55; नक्षत्र : कृत्तिका 27:27
  • योग : व्यतिपात 07:04, वरियान 26:41; करण : तैतिल 24:59
  • सूर्य : तुळ; चंद्र : मेष 11:47; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – सध्या नकारात्मक काळ सुरू आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने केलेले प्रयत्न नकारात्मक परिणाम देणारे असतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. सुरू असणारे काम काळजीपूर्वक हाताळा.

वृषभ – ध्येय साध्य करण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास फायदा होईल. मात्र कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अडकून पडू नका. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कालच्या मेहनतीचे फळ आज मिळेल. आळस सोडून द्या. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य उदयास येईल. मित्रांसोबत सहकार्य केल्यास नफा होईल.

मिथुन – जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. उत्पन्न आणि खर्च स्थिर राहील. कामातील अडथळे दूर होतील. कार्यालयातील सहकारी आणि कुटुंबीय यांचा सातत्याने पाठिंबा मिळेल. तथापि, गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कर्क – व्यवसाय, उद्योगधंद्याकडे लक्ष दिल्याने यश मिळेल. नोकरदार जातकांनी नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. शैक्षणिक काम सहजतेने पूर्ण होत राहील. परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.

सिंह – व्यवसायात प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी मात्र कनिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळणार नाही. शैक्षणिकदृष्ट्या आज प्रगती अतिशय संथ असेल. जोडीदार आणि मुलांकडून पाठिंबा मिळेल. याशिवाय कुटुंबातील इतर व्यक्तीही तुम्हाला पाठिंबा देतील. चांगल्या आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करा. खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या.

हेही वाचा – …असंही घडू शकतं!

कन्या – आज घरात एखाद्या शुभकार्याचे आयोजन करण्यात येईल. आजच्या दिवशी एखादी चांगली बातमी मिळेल. थोडा उशिरा आर्थिक नफा मिळू शकेल. याआधीची नियोजित कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. कोणाचेही ऐकून काम करू नका, त्याने तुमचेच नुकसान होईल. एखादे फायदेशीर कार्य करण्यासाठी सक्रिय असाल.

तुळ – हा काळ काहीसा नकारात्मक आहे. सध्या व्यवसायाशी निगडीत प्रवासाचे बेत पुढे ढकला. सौदेबाजी करून कामाच्या वाटाघाटी करणे अंगलट येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. सुरू असलेले काम काळजीपूर्वक हाताळा.

वृश्चिक – वादाचा प्रसंग किंवा भांडणे होण्याची शक्यता आहे, रागावर नियंत्रण ठेवा. कामाचा ताण वाढेल. अशा परिस्थितीत कामात चालढकल करण्याचा प्रयत्न करणे, योग्य नाही. हा काळ नकारात्मक परिणामांचा आहे. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात अडथळे येतील, कुटुंबातील ज्येष्ठांशी मतभेद होतील.

धनु – वाढत्या तोट्यात काही प्रमाणात घट होईल. त्यामुळे आर्थिक चिंताही कमी होतील. नियोजित कामातून नफा मिळू लागेल. कुटुंबातील सदस्यही मदत करतील. त्यामुळे आर्थिक अडचणींमधून जरा आराम मिळेल. हातात असलेल्या वेळेचा चांगला योग्य प्रकारे वापर करा. संपत्ती आणि सुखसोयींनीयुक्त अशा भरपूर संधी उपलब्ध होतील.

मकर – अनावश्यक धावपळ टाळणेच चांगले. अपूर्ण राहिलेल्या कामांपैकी काही कामे पूर्ण होतील. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले. आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी योग्य सल्ला आणि योग्य व्यक्तींचा पाठिंबा मिळेल.

कुंभ – प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत. काल केलेल्या कठोर परिश्रमाचे आज फायदे होतील. आशा आणि उत्साहाने कामे केली तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे भेट मिळू शकतात. श्रद्धेने एखादे काम पूर्ण कराल. आनंदाचा काळ  सुरू होणार आहे.

हेही वाचा – कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा

मीन – काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ होईल. फायदेशीर कामे साध्य करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील. केलेल्या मेहनतीच्या फलश्रुतीमुळे आनंद होईल. मनोरंजनासाठी खर्च करू शकता. आध्यात्मिक आवड निर्माण होईल.


दिनविशेष

मास्टर शेफ तरला दलाल

टीम अवांतर

देशातील पहिल्या मास्टर शेफ तरला दलाल यांचा जन्म 3 जून 1936 रोजी पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी 1957 साली अर्थशास्त्रातून पदवी शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्या मुंबईत आल्या आणि 1966 साली त्यांनी आपल्या राहत्या घरातून कुकिंग क्लासेसची सुरुवात केली. अत्यंत कमी काळात त्यांच्या कुकिंग क्लासचे नाव लोकप्रिय झाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. कमीतकमी तेल वापरून केलेल्या पाककृती, पारंपरिक खाद्यपदार्थांबरोबरच सहज उपलब्ध होतील, अशा पदार्थांपासून विविध देशी-विदेशी पाककृती बनवण्यासाठी तरला दलाल ओळखल्या जात होत्या. जवळपास 17 हजार पाककृती त्यांनी बनवल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बनवलेल्या या सगळ्या पाककृती शाकाहारी आहेत. जगातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या पाच पाककलाशास्त्र लेखकांमध्ये त्यांची ओळख होती. त्यांनी पाकशास्त्रावरील 170 पुस्तकांचे लेखन केले आहे. टीव्हीसारखे प्रसार माध्यम नसतानादेखील जगभरात पाककृतीमध्ये प्रसिद्धी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पुढे टीव्हीचा प्रसार झाल्यानंतर आणि खासगी वाहिन्यांचा भारतात प्रवेश झाल्यानंतर विविध वाहिन्यांवरील त्यांचे कुकिंग शो तुफान लोकप्रिय झाले. सोनी वाहिनीवर त्यांचा ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ हा कार्यक्रम सुमारे तीन वर्षे चालला. इंडियन मर्चंट चेंबरने त्यांना 2005मध्ये ‘वुमन ऑफ द इयर’ पुरस्कार दिला, तर भारत सरकारने 2007मध्ये ‘पद्मश्री’ देऊन त्यांना सन्मानित केले होते. दलाल यांचे सर्व लिखाण इंग्रजीत असले तरी, त्यांच्या बहुतांश पुस्तकांचे भारताच्या इतर‌ भाषांमध्ये तसेच, रशियन, डच भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. 6 नोव्हेंबर 2013 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे‌ मुंबईत निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!