दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 05 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 14 श्रावण शके 1947; तिथि : एकादशी 13:11; नक्षत्र : ज्येष्ठा 11:22
योग : ऐंद्र 07:23; करण : बव 25:44
सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 11.22; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
मंगळागौरी पूजन
पुत्रदा एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. हे बदल सरकार किंवा व्यवस्थेकडून केले जातील, ज्यामुळे समस्यांमध्ये भर पडेल. अशा परिस्थितीत मानसिक ताण देखील येऊ शकतो. या स्थितीत धोकादायक निर्णय घेणे टाळावे.
वृषभ – कामाच्या ठिकाणी ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. यामुळे कामात अधिक व्यग्र राहू शकता. व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कौटुंबिक पातळीवर दिवस सामान्य राहील.
मिथुन – व्यवसायात छोटासा नफा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित काही समस्या येत असतील तर, त्या दूर होऊ शकतात. कठोर परिश्रम आणि समर्पणाने लहान व्यवसायही मोठा करू शकाल. संध्याकाळी मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवू शकाल.
कर्क – सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांचा दिवस चांगला जाणार आहे. प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात आणि कामात यश देखील मिळेल. कामाच्या ठिकाणी लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांचा दिवसही चांगला जाईल.
सिंह – कामाच्या ठिकाणी आतापर्यंत घेतलेले कष्ट आता फायदेशीर ठरतील. आर्थिक फायदे मिळू लागतील आणि यामुळे आर्थिक स्तर सुधारेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवल्याचा फायदा होऊ शकतो. कौटुंबिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.
कन्या – कामे पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. वेळेचा योग्य वापर केल्यास फायदे मिळू शकतात. तसेच, व्यवसाय पुढे नेण्याबद्दल सखोल विचार करा. यामुळे परिस्थिती अनुकूल होईल आणि नफा मिळविण्याच्या संधी देखील उपलब्ध होतील.
हेही वाचा – Ayurveda : आदान काल आणि विसर्ग काल
तुळ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची अपूर्ण कामे स्वतःच्या मेहनतीने पूर्ण करावी लागतील. एखाद्यावर अवलंबून राहिल्याने महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात. घाईघाईने निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळा, अन्यथा काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर, त्यासाठीही तयारी करावी लागेल. व्यावसायिक बाबींमध्ये योजनेनुसार काम करणे योग्य राहील. वैयक्तिक आयुष्यात, काही भावनिक घटनांचा सामना करावा लागेल.
धनु – व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रलंबित महत्त्वाची कामे आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील. यामुळे नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील आणि भविष्यात याचा फायदाही होईल.
मकर – व्यवसायात अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असू शकतो. सहलीला जात असाल तर सावधगिरी बाळगा, कारण वाहनात ऐनवेळी बिघाड होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणे चांगले राहील.
कुंभ – व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही मन अस्वस्थ असेल. अशा परिस्थितीत शांत राहून संयम राखावा लागेल. ध्येय साध्य करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. मात्र त्यात नक्कीच यश मिळेल. वैयक्तिक जीवनातही नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
मीन – व्यवसायात अनुभवी किंवा वरिष्ठ व्यक्तीच्या सहकार्याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे एक नवीन दिशा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम चुकले तरी शांतपणे आणि गांभीर्याने निर्णय घ्यावे लागतील. व्यवसायातही सकारात्मक बदल दिसून येतील.
हेही वाचा – Ayurveda : शिशिर ऋतुचर्या
दिनविशेष
इतिहाससंशोधक दत्तो वामन पोतदार
टीम अवांतर
थोर इतिहाससंशोधक, मराठी लेखक तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते दत्तो वामन पोतदार यांचा जन्म 5 ऑगस्ट 1890 रोजी कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील बिरवाडी गावी झाला. 1910मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (सर परशुरामभाऊ कॉलेज) इतिहास आणि मराठी या विषयांचे अध्यापन केले. त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे 1948 साली त्यांना केंद्र सरकारने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली. हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यांनी डि.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. 1939मध्ये अहमदनगर येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच 1943मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. 1946 ते 1950 या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 1948मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. नंतर 1960 ते 1963 या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यांचा इतिहासाचा व्यासंग मोठा होता. 1918 ते 1947 या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि नंतर 1973३पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते. त्यांनी 1935 साली मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस या संस्थेची स्थापना केली. अलाहाबाद येथील अधिवेशनात तिचे नाव इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. याशिवाय, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेची स्थापनाही त्यांनी केली. 1922 साली त्यांनी मराठी गद्याचा इंग्रजी अवतार हा ग्रंथ उल्लेखनीय आहे. 1810-74 या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे. त्यांनी संपादिलेल्या लहानमोठ्या ग्रंथांतील देवदासकृत संतमालिका (1913) आणि श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप (1934) हे विशेष उल्लेखनीय होत. भाषिक प्रश्नासंबंधीचे त्यांचे लेख भारताची भाषासमस्या (1968) या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. 06 ऑक्टोबर 1979 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.