Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, March 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, लज्जतदार पुलाव, व्हेज पुलाव, फ्राइड राइस, मुगाचे फोडणीचे वरण, चटपटीत काबुली चणे, काबुली चण्याची भाजी, छोले भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मुगाचे फोडणीचे वरण, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.

    • मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी जर मोड आलेले संबंध मूग वापरले तर खिचडी अतिशय चविष्ट होऊन तिची पौष्टिकताही वाढते.
    • बहुतेक घरात मुगाचे फोडणीचे वरण खाण्यास मुले कुरकुर कररतात. याचे कारण म्हणजे, मुगाला जो उग्र वास येतो, तो मुलांना आवडत नाही. हल्ली मेथीची भाजी मुबलक मिळते आणि आपण नेहमी करतोही. हीच मेथीची भाजी जरा अर्धी वाटी पाणी टाकून करावी आणि भाजी शिजल्यावर त्यातील पाणी निथळून काढून घेऊन भाजी परत फडफडीत परतावी. भाजीतून काढून घेतलेले पाणी (मेथीचे) वरण फोडणीला टाकताना मुगाच्या डाळीत घातल्यास वरणाला सुंदर चव येते आणि मुगाचा उग्र वास अजिबात येत नाही. मुले आनंदाने हे मेथीच्या वासाचे फोडणीचे वरण खातात.

    हेही वाचा – Kitchen Tips : अशा प्रकारे पालक परोठे अन् कोबीची थालिपीठ भाजी करून पाहा…

    • आपण नेहमी काबुली चण्याची उसळ करतो. जे चणे थोड्या मोठ्या आकाराचे आणि भुरकट असतात, अशा चण्यांचीही उसळ केली जाते. परंतु कधी कधी या उसळीचा रस्सा जास्त खाल्ला जातो आणि चणे जसेच्या तसे राहतात किंवा उसळ उरते. तेव्हा त्यातील काबुली चणे काढून घ्यावेत आणि ते वाळू द्यावेत. इतका वेळ वाळू द्यावेत, की आपण सहजपणे प्रत्येक चण्याला हातात घेऊन दाबू शकू. हाताने ते चपटे करावेत. त्यानंतर ते तळून घ्यावेत. नंतर त्या चण्यांवर जिरेपूड, तिखट, मीठ, आमसूल पावडर, मिरीपूड, थोडी बारीक साखर आणि चाट मसाला घालावा. आमसूल पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चणे खूप चटपटीत लागतात.
    • दुपारचा किंवा आदल्या दिवशीचा भात राहिला असेल तर, तो भात तसा खाण्याऐवजी ताज्या भातात कुस्करून घालावा. त्यामुळे ताज़ा भात लवकर शिजतो. पाणी नेहमीइतकेच घालावे. दुपारचे वरण आणि भात (उरलेला) खाण्याचा तसेच वेगळे गरम करण्याचा कंटाळा येतो, पण वरणाच्या डाळीत, राहिलेले वरण आणि तांदळात भात घातल्यास ताजा भात आणि ताजे वरण खाल्ल्याचे समाधान मिळते. शिळा आणि दुपारचा भात किंवा दुपारचे शिळे वरण या ताज्या भातात मिसळले आहे, हे कोणालाही कळत नाही.

    हेही वाचा – Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…

    • पुलावासाठी किंवा फ्राइड रइससाठी केलेल्या भाताची शितं मोडू नयेत म्हणून भात काटा चमच्याने ढवळावा.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    March 26, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026 फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    By Team AvaantarMarch 26, 2026

    बहुरंगी खीर बनविण्याचे साहित्य दूध – एक लिटर बारीक रवा – अर्धी वाटी मैदा -…

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    March 28, 2026

    आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…

    March 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 250
    • अवांतर 177
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 364
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 187
    • मैत्रीण 17
    • ललित 517
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn