Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, March 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेMarch 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, निरामय शारीरिक आरोग्य, प्राणायाम प्रकार, योगाभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायाम अभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायामाचे लाभ, प्राणायामाचे आरोग्य लाभ, भ्रामरी प्राणायाम, भ्रामरी प्राणायामाचे लाभ, भ्रामरी प्राणायाम पद्धत,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा आणि या अभ्यासातून मिळणारे आरोग्यलाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्याबाबत जाणून घेणार आहोत.

    भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय?

    भ्रमर म्हणजे भुंगा. हा प्राणायाम करताना निर्माण झालेला ध्वनी भुंग्याच्या हुंकारयुक्त गुणगुणणार्‍या आवाजासारखा वाटतो.

    भ्रामरी प्राणायाम कसा करावा?

    दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज काढत ओंकारातील ‘म’कारासारखे गुंजन करावे.

    हा प्राणायाम करताना विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. उदाहरणार्थ, डोक्यावर हातांचे तळवे ठेवणे, दोन्ही कानात तर्जनी घालणे, मिटलेल्या डोळ्यांवर हातांची बोटे ठेवणे इत्यादी. असे केल्याने या प्राणायामामुळे शरीरात होणारी स्पंदने जाणवतात.

    भ्रामरी रेचक करण्यास सोपा आहे आणि भ्रमर पूरक जरा अवघड वाटतो. परंतु सरावाने भ्रमर पूरक जमू शकतो.

    मागील लेखातील प्राणायामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन भ्रामरी प्राणायाम अभ्यास करावा.

    हेही वाचा – योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    भ्रामरी प्राणायामाचे मानसिक आरोग्य लाभ

    • मानसिक शांतता लाभते
    • मनाची एकाग्रता वाढते.
    • मानसिक ताणतणाव कमी होण्यास साहाय्य होते.
    • साधकास आनंदी आणि उत्साही वाटते.
    • मन अंतर्मुख झाल्याचे जाणवते.
    • भ्रामरी प्राणायाम निद्रानाशावर उपयुक्त आहे.

    प्राणायाम अभ्यासातील अनुलोम-विलोम प्राणायाम तथा भ्रामरी प्राणायाम निरामय आरोग्यासाठी खरोखरच उपयुक्त आहेत.

    हेही वाचा – अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    दैनंदिन योगाभ्यासात भ्रामरी प्राणायामाचा आवर्जून समावेश करावा. भ्रामरी प्राणायामाचा नियमित सराव मानसिक आरोग्यास खचितच लाभदायी आहे. दैनंदिन योग साधना करताना अनुलोम-विलोम प्राणायामाचा अभ्यास झाल्यावर भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करावा.

    लेखानंतर दिलेल्या व्हीडिओच्या लिंकवर क्लिक केल्यावर इतर प्राणायाम प्रकारांबरोबर भ्रामरी प्राणायामाची कृती आणि फायदे जाणून घेता येतील.

    योगाभ्यासातील विविध प्राणायाम प्रकार, कृती व फायदे तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    आपण पुढील लेखात योगाभ्यासातील अशाच एका अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर  🙏/👌/👍 /  👏 / तत्सम चिन्हाने व्हाटसॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…

    March 28, 2026 आरोग्य

    Ayurveda : आहारातील चुका, वसंत ऋतूत काय खाणे टाळावे?

    March 27, 2026 आरोग्य

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…

    By डॉ. श्रीकांत राजेMarch 28, 2026

    आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक असले पाहिजे. सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट…

    Ayurveda : आहारातील चुका, वसंत ऋतूत काय खाणे टाळावे?

    March 27, 2026

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    March 28, 2026

    आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…

    March 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 250
    • अवांतर 177
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 364
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 187
    • मैत्रीण 17
    • ललित 517
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn