Monday, February 16, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : साबुदाणा, भगर, बटाटा पॅटिस विथ ग्रीन चटणी!

Recipe : साबुदाणा, भगर, बटाटा पॅटिस विथ ग्रीन चटणी!

माधवी जोशी माहुलकर

आज  महाशिवरात्र आहे तर बहुतेक सर्वांचे दोन्ही वेळेस उपवास असतात, अशा वेळेस दोन वेळेस फराळाचे पदार्थ काय करावे, हा मोठ्ठा प्रश्न गृहिणींपुढे असतो. साबुदाणा खिचडी, भगर, आमटी, भाजणीचे थालिपीठ, भगर इडली, शिंगाड्याची शेव, बटाट्याच्या किसाचा चिवडा, शिंगाड्याच्या पीठाचा शिरा… असे नानाविध पदार्थ तिच्या डोळ्यासमोर फेर धरायला लागतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बटाटा, साबुदाणा, भगरीचे पॅटिस विथ ग्रीन चटणी हा पदार्थ मी तुमच्या समोर आणला आहे. एकदम पोटभर, फारसे तेल न लागणारा, चवीला एकदम मस्त आणि अगदी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे. सकाळी भगर, आमटी, बटाट्याची  भाजी, भाजणीचे थालीपीठ असा भरपेट फराळ झाला की, बहुतेक संध्याकाळी साबुदाणा वडे अथवा भगर इडली नाहीतर फ्रुट कस्टर्ड, फराळी चिवडा असा काहीसा फराळाचा मेन्यु बहुतेक घरी फिक्स असतो. त्यामध्ये काहीतरी नावीन्य असावे, म्हणून मी भगर, साबुदाणा आणि बटाट्याची पॅटिस हा पदार्थ करून पाहिला आणि तो यशस्वी पण झाला. कमी वेळात फारशी काथ्याकुट न करता तयार होणारा हा पदार्थ चवीला एकदम मस्त आणि पोटभरीचा आहे.

साहित्य

  • भगर – 1 वाटी
  • साबुदाणा – 1 वाटी
  • शेंगदाणा कूट – अर्धी वाटी
  • आले + हिरवी + मिरची + कोथींबीर पेस्ट
  • उकडलेले बटाटे  – 2
  • मीठ – चवीनुसार
  • जिरे – एक टीस्पून
  • तेल – शॅलोफ्राय करण्याकरिता

हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!


सारणाकरिता साहित्य

  • खोबऱ्याचा किस – 1 वाटी
  • शेंगदाण्याचे कूट – अर्धी वाटी
  • काळीमिरी पावडर – अर्धा टीस्पून
  • मनुका, चारोळी आणि काजुचे तुकडे – प्रत्येकी 10-12
  •  पीठीसाखर – चवीनुसार

कृती

  1. हे सर्व पदार्थ एकत्र करून त्याचे सारण तयार करावे.

पॅटिसची कृती

  1. एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा वेगवेगळे भाजून घ्यावे आणि थंड झाले की, त्याचे मिक्सरमध्ये एकत्र पीठ करुन घ्यावे.
  2. या पीठामधे दोन उकडलेले बटाटे किसून घालावे.
  3. त्यानंतर आले, हिरवी मिरची आणि कोथींबीरीची पेस्ट तसेच, शेंगदाण्याचे कूट, जिरे, काळीमिरी पावडर आणि मीठ घालून सगळे पदार्थ एकजीव करून थोडसे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.
  4. आता घट्ट मळलेल्या मिश्रणाचे गोळे करून त्याला गोलाकार वाटीसारखा आकार द्यावा.
  5. त्यामध्ये खोबऱ्याचा किस, शेंगदाणा कूट, काजूचे तुकडे, मनुका तसेच चारोळी, पीठीसाखरेचे सारण भरावे आणि हाताने हलकेच दाब देत बंद करून (जरा जाडसरच ठेवून) हे पॅटिस तयार करावे.
  6. अशा प्रकारे सर्व पॅटिस तयार करून तेलामध्ये खमंग शॅलोफ्राय करावेत किंवा तळून घ्यावेत.
  7. नंतर ते ग्रीन चटणी बरोबर सर्व्ह करावेत.

हेही वाचा – Recipe :  खारीक आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू!


ग्रीन चटणीकरिता साहित्य

  • दही – अर्धी वाटी
  • 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची पेस्ट
  • मीठ – चवीनुसार
  • शेंगदाण्याचा कूट – एक टेबलस्पून
  • साखर – चवीनुसार

कृती

  1. मिरची, कोथिंबिरीची पेस्ट, जिरे पावडर, शेंगदाण्याचे कूट, मीठ, साखर मिक्सरमधून काढल्यावर ते दह्यात फेटून घ्यावे.

तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!