Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    झाले मोकळे आकाश…

    April 7, 2026

    Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…

    April 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 5, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, उकडपेंडी, उकरपेंडी, उकडपेंडीची रेसिपी, उकरपेंडीची रेसिपी, विदर्भ स्पेशल उकडपेंडी, विदर्भ स्पेशल उकरपेंडी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    विदर्भात बहुतेक वेळेस सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्याकरिता बनवला जाणारा पोटभरीचा पदार्थ म्हणजे उकडपेंडी (उकरपेंडी)! गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून तयार केला जाणारा चविष्ट असा हा पदार्थ आहे. खूपजण उकडपेंडी ही एकतर फक्त गव्हाच्या पिठाची करतात किंवा फक्त ज्वारीचे पीठ वापरून करतात, परंतु मी मात्र दोन्ही पिठं मिक्स करून उकडपेंडी करते. करायला सोपा आणि फारशी तयारी न करता चटकन होणारा हा पदार्थ आहे. रव्याचा उपमा नाश्त्याचा अविभाज्य अंग झालेला आहे, परंतु कधीतरी थोडाबहुत उपम्यासारखाच परंतु वेगळ्या पिठांचा आणि चवीला वेगळा असा उकडपेंडी हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. संध्याकाळी पोळ्या करायचा कंटाळा आला अथवा कुठून थकून-भागून आलात तर ही उकडपेंडी लगेच तयार करून मस्तपैकी आंब्याच्या किंवा लिंबाच्या लोणच्या सोबत घेऊन क्षुधाशांती करता येते.

    साहित्य

    • गव्हाचे पीठ – 2 वाट्या
    • ज्वारीचे पीठ – 1 वाटी
    • मोठा कांदा – 1
    • हिरव्या मिरच्या – 4
    • कढीपत्ता – 5-6 पाने
    • शेंगदाणे – मुठभर
    • तेल – एक ते दीड पळी
    • मोहरी – एक टीस्पून
    • जिरे – एक टीस्पून
    • हिंग – अर्धा चमचा
    • तिखट – दोन चमचे
    • हळद – एक चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार (ऐच्छिक)
    • दही – दोन लहान चमचे
    • कोथिंबीर – मुठभर
    • मोठा कांदा – वरून घ्यायला बारीक चिरलेला (ऐच्छिक)

    हेही वाचा – Recipe : पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते

    कृती

    1. गव्हाचे तसेच ज्वारीचे पीठ एकत्र करून कढईमध्ये मंद आचेवर कोरडेच गुलाबीसर भाजून घ्यावे.
    2. पीठ भाजून झाले की, त्याच कढईत तेल गरम करून जिरं आणि मोहरी टाकावी. मोहरी आणि जिरं फुटल्यावर अर्धा चमचा हिंग टाकावा.
    3. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकावा. पाठोपाठ त्यात कांदा टाकून तो थोडा ट्रान्सपरन्ट झाला की, शेंगदाणे टाकावेत.
    4. शेंगदाणे गुलाबीसर झाले की, एक चमचा हळद, दोन चमचे तिखट, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर, दोन लहान चमचे दही टाकावे आणि एकजीव करावे.
    5. त्यानंतर आधी भाजून ठेवलेली पिठं टाकून एकदा परत सगळं मिश्रण परतून घ्यावे.
    6. त्यामध्ये अंदाजानुसार गरम पाणी टाकत जावे. लक्षात असू द्या की, पिठाचा चिकट गोळा होता कामा नये. हळूहळू पाणी टाकत पीठ ओलसर करावे आणि ढवळत राहावे. उकडपेंडी करताना हा भाग खूप महत्त्वाचा आहे.
    7. पिठात पाणी टाकले की, कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर एक दणदणीत वाफ काढावी.
    8. उकडपेंडी कोरडी झाली आहे, असं वाटलं तर परत पाण्याचा एक हबका मारावा किंवा ताटलीवर पाणी ठेवून पुन्हा एकदा वाफ द्यावी आणि साधारण तीनएक मिनिटे झाकण ठेवून  ही उकडपेंडी परत एकदा छान परतून घ्यावी.
    9. गॅस बंद केल्यानंतर कढईवर ताटली ठेवून पाचएक मिनिटे वाफ दबू द्यावी.

    हेही वाचा – Recipe : साबुदाणा, भगर, बटाटा पॅटिस विथ ग्रीन चटणी!

    टीप्स

    • अशा प्रकारे तयार झालेली गरमागरम उकडपेंडी प्लेटमध्ये घ्यावी, त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथींबीर घालावी.
    • लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे अथवा दह्यासोबत उकडपेंडीचा आनंद घ्यावा.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    By Team AvaantarApril 3, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    झाले मोकळे आकाश…

    April 7, 2026

    Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…

    April 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 260
    • अवांतर 182
    • आरोग्य 97
    • पंचांग आणि भविष्य 376
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 191
    • मैत्रीण 17
    • ललित 537
    • शैक्षणिक 76

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    झाले मोकळे आकाश…

    April 7, 2026

    Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…

    April 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026
    Most Popular

    झाले मोकळे आकाश…

    April 7, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.