अतुल गोखले
फणसाची भाजी
साहित्य
कच्चा फणस (चिरलेला) – 500 ग्रॅम
तेल – 2 टेबलस्पून
मोहरी – 1 चमचा
हळद – ½ चमचा
लाल तिखट – 1 चमचा
गोडा मसाला – 1 चमचा
जिरे – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर
पुरवठा संख्या (Servings) : चौघांसाठी
तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 30 मिनिटे
एकूण वेळ : 45 मिनिटे
कृती
- कच्चा फणस सोलून, चिरून उकडून घ्या.
- कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे घाला.
- हळद, तिखट, मसाला घालून परता.
- उकडलेला फणस त्यात घालून चांगलं मिसळा.
- मीठ घालून झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवा.
- नंतर वरून खोबरं आणि कोथिंबीर घाला.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, फायबरयुक्त, ग्लूटेन-मुक्त
विशेष सूचना
- फणसाची साल व्यवस्थित सोलावी.
- गोडा मसाल्याऐवजी गरम मसालाही वापरू शकता.
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
कांदा भजी
साहित्य
मध्यम कांदे – 3 (पातळ चिरलेले)
बेसन – 1 कप
तांदळाचं पीठ – 2 टेबलस्पून
हळद – ½ चमचा
लाल तिखट – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
थोडी कोथिंबीर
तेल (तळण्यासाठी)
पुरवठा संख्या (Servings) : चौघांसाठी
तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 15 मिनिटे
एकूण वेळ : 25 मिनिटे
कृती
- कांदे चिरून थोडे मीठ लावून 5 मिनिटं ठेवा.
- नंतर त्यात बेसन, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, कोथिंबीर घालून मिक्स करा.
- पाणी न घालता कांद्याच्या रसात मिश्रण तयार करा.
- गरम तेलात थोडे थोडे करून भजी सोडा.
- खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
- सॉस किंवा चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, ग्लूटेन-फ्री नाही
टीप
- अधिक कुरकुरीतपणा हवे असल्यास तांदळाचं पीठ वाढवा.
- हवे असल्यास हिंग किंवा ओवा घालू शकता.
हेही वाचा – Recipe : भाजणीचे वडे…. मंगळागौर विशेष
(लेखक नामांकित शेफ आहेत)
संपर्क : atulgokhale67@gmail.com
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.