Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeआरोग्यHair care :  केसांची अंतर्गत रचना गुंतागुंतीची!

Hair care :  केसांची अंतर्गत रचना गुंतागुंतीची!

आजच्या भागात आपण केसांच्या अंतर्गत रचनेबद्दल थोडी माहिती घेऊ. ही माहिती अशासाठी गरजेची आहे कारण, आपल्या केसांमध्ये काय काय घडत असते, हे आपल्याला समजले पाहिजे. ही माहिती थोडी किचकट वाटू शकते. आपल्या केसांची अंतर्गत रचना खूप गुंतागुंतीची (Complex) आहे. आपण आधीच्या भागात केसांचे स्तर (Layers) पाहिले. त्यातील Cortex मध्ये ही रचना असते. आपल्या केसांमध्ये fibers असतात, ते अमाइनो ॲसिडने (Amino acid) बनलेले असतात. हे amino acid 22 प्रकारचे असते. त्या ॲसिडचा प्रत्येक रेणू (Molecule) हा काही घटकांनी (Elements) बनलेला असतो. हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात. जसे –

  • Carbon 50%
  • Oxygen 21%
  • Nitrogen 18%
  • Hydrogen 7%
  • Sulphur 4%

हेही वाचा – Hair care : केसांची त्रिस्तरीय रचना…

या amino acids च्या chain असतात आणि त्यांनाच प्रथिने (Protein) म्हणतात. आपल्या केसांमध्ये, नखांमध्ये आणि त्वचेमध्ये जो प्राथिनांचा प्रकार असतो, त्याला केरेटिन (Keratin) म्हणतात. या केरेटिनमुळेच आपल्या केसांना, त्वचेला आणि नखांमध्ये लवचीकता मिळते. Cortex मध्ये या Keratin च्या साखळ्या असतात. या साखळ्यांची रचना स्प्रिंगसारखी (spring) असते. या स्प्रिंग एकमेकांना तीन दुव्यांनी जोडलेल्या असतात. ते दुवे आहेत – Sulphur Bond, Salt Bond आणि Hydrogen Bond. त्यातील Salt bond आणि Hydrogen Bond हे कमकुवत असतात. तर, Sulphur Bond हा मजबूत असतो.

जेव्हा आपण केस ओले करतो तेव्हा Salt Bond आणि Hydrogen Bond शिथिल (relax) होतात. ज्यामुळे केसातील ज्या Keratin च्या spring असतात त्याही शिथिल (relax) होतात आणि केस सरळ भासतात… कुरळे असले तरी! जेव्हा केस कोरडे होतात, ते नैसर्गिकरीत्या कोरडे होतील किंवा Dryer च्या मदतीने… तेव्हा Salt Bond आणि Hydrogen Bond हे ज्या नवीन प्रकारे केस वाळले असतील, त्या प्रकारे Set होतात. अर्थात, हा जो बदल असतो तो तात्पुरता असतो. म्हणूनच तुम्ही बघितले असेल की, तुम्ही केस Set केले असतील, Ironing किंवा तात्पुरते Semi- curl किंवा curl केले असतील तर, ते दोन किंवा तीन दिवसच टिकतात. नंतर केस स्वतःच्या नैसर्गिक स्थितीत येतात. केसात हवेतून Moisture शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळेच केस Set केल्यानंतर ते हवेतून Moisture घेतात आणि Set झालेले Bond शिथिल (relax) होत जातात.

हेही वाचा – Hair care :  केसांना नियमितपणे तेल लावण्याची गरज आहे का?

Sulphur Bond हा मजबूत असतो, त्यामुळे त्यावर पाणी, हवेतील Moisture यांनी फरक पडत नाही. या  Bond मध्ये chemical च्या उपयोगानेच बदल घडवून आणता येतो. याबद्दल आपण पुढच्या लेखांमध्ये माहिती बघू.

(क्रमश:)

lee.parulekar@gmail.com

लीना परुळेकर
लीना परुळेकर
I have completed my beauty certification from BUTIC COLLEGE OF BEAUTY OF MAYA PARAJAPYE FROM PUNE. PASSED "CIDESCO EXAMINATION" IN 2003. It is an international examination for Beauty. Worked in BUTIC SALON AS AN OPERATOR AND WORKED AS AN INSTRUCTOR IN BUTIC COLLEGE OF BEAUTY.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!