Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गाडी थांबवून शिवने आरूचे तोंड दाबून धरलं…
    ललित

    गाडी थांबवून शिवने आरूचे तोंड दाबून धरलं…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 23, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, लग्नाची खरेदी, आरूचे रडणे, रामचे आरूला समजावणे, सिया आरूची मैत्री, आरू आणि सिया,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शोभा भडके

    भाग – 15

    दागिन्यांची खरेदी तर झाली होती. आता त्यांचे कपडे खरेदी करायचे होते. निदान आता तरी रामने यावं, असं सियाला वाटत होतं. ती तिच्याच विचारात होती तर, इकडे शिव आणि आरू त्यांच्या त्यांच्या…

    “मी काय म्हणते तू जावईबापूंना बोलावून घे आणि तुम्ही चौघे कपड्यांची खरेदी करा. मी घरी जाते, घरी बाकीची पण तयारी करायची आहे.” सुधा यांनी आपल्या मुलीच्या मनातलं ओळखल होतं जणू! म्हणून त्या लग्नाआधी या चौघांना देखील पुन्हा एकदा बोलता यावं, यासाठी त्या तसं म्हणाल्या.

    “नाही मॉम, त्याची काही गरज नाही. मी पण तुझ्यासोबत घरीच येते. नियाला सांगेन माझे कपडे घरीच घेऊन यायला. मी घरीच सिलेक्ट करेन. शिव तू आणि आरू तुम्ही करा तुमची खरेदी… आणि राम पण बिझी असेल…” ती उदासपणे म्हणाली आणि पुढे निघून गेली.

    सगळ्यांनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात सुस्कारा सोडला. सुधा यांच्या डोळ्यांत पाणी आलं… एक आई म्हणून त्या आपल्या मुलीसाठी कधीच काही बोलू शकल्या नव्हत्या.

    “काकू, तुम्ही रडू नका. एकदा का लग्न होऊन वहिनी आमच्या घरी आल्या ना, माझा दादा कधीच त्यांना उदास होऊ देणार नाही!” आरू त्यांचे डोळे पुसत म्हणाली.

    हेही वाचा – रामने सियाच्या घटस्फोटाबद्दल सांगितले अन्…

    “हो गं, माहितीय! लग्नानंतर खूप सुखी राहील ती. तिचं प्रेम तिला मिळतंय… पण बाळ तू काकू नाही म्हणायचं मला… शिव आणि सिया मला मॉम म्हणतात, तूही तेच म्हणायचं कळलं?” त्या हसत तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या.

    “मॉम… दि घरी गेली. मी डिझायनरला कॉल करून सांगतो. घरीच पाठवतील ड्रेसेस. आपण पण निघू या,” शिवला सियाचा उदास चेहरा पाहून वाईट वाटत होतं… त्याने किती आणि काय काय करून हे सगळं जुळवून आणलं होतं. पण तरीही त्याच्या बहिणीच्या चेहऱ्यावर पाहिजे तो आनंद दिसत नव्हता. त्याचमुळे त्याला रामचा देखील राग येत होता… पण त्याला कोण सांगणार? त्याच्यासाठी पण त्याची बहीण सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे… या सगळ्यांत ती भरडली जात आहे, असंच त्याला वाटत होत आणि त्याचमुळे ठरवूनही त्याला आनंदी राहता येत नव्हतं!

    “अजिबात नाही. तू आरूला घेऊन तुमच्या दोघांची शॉपिंग करा… आणि आकाश तू मला आणि भावनाला घरी सोड चल… तुला चालेल ना भावना?” त्या म्हणाल्या. त्यावर शिवला काहीच म्हणता आलं नाही.

    ते ऐकून आरुच्या पोटात गोळाच आला… ‘त्यांच्यासोबत एकटीने जायचं खरेदीला?’ तिला तर हे ऐकून आईचाच विचार आला डोक्यात, तिला तर अजिबात आवडणार नाही हे… भावनाही असाच काहीसा विचार करत होती.

    “अं… काकू… नाही मॉम… ते आई आणि भाऊंना नाही आवडणार असं. म्हणजे…” जे मनात आलं ते लगेच बोलून दाखवलं, पण भीतीमुळे शब्द अडखळत होते.

    “अं… हो… ते म्हणजे आमच्याकडे असं… म्हणजे मामी ओरडेल.” भावना पण म्हणाली.

    “काही ओरडणार नाही, त्यांना काय सांगायच ते मी सांगेन. मी येतेय तुझ्यासोबत घरी… चला निघूया!” त्या जरबयुक्त आवाजात म्हणाल्या… आणि शिवकडे पाहून नजरेनेच ‘घेऊन जा’ असं म्हणाल्या… आणि भावनाला घेऊन पुढे निघून गेल्या.

    “चल  ब्रो, एन्जॉय युवर फस्ट डेट विथ आरू वहिनी!” आकाश त्याला डोळा मारत हसत म्हणाला.

    शिवने वैतागून त्याच्याकडे पाहिलं… काही बोलणार तर तो निघून गेला होता.

    आता त्या शॉपमध्ये दोघेच होते. आरू तर खाली मान घालूनच उभी होती आणि ओढणीचं टोक हातात धरून बोटाला गुंडाळत होती… अस्वस्थ वाटत होत तिला. असं कधीच कुठल्या मुलासोबत एकटी कुठे गेली नव्हती. नेहमी तिचा दादाच सोबत असायचा तिच्या…

    शिवने तिच्याकडे पाहिलं… पाहूनच लक्षात येत होतं की, ती घाबरलीय. त्याला तो दिवस आठवला, जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्या दिवशी किती बिंधास्त बोलत होती न अडखळता… जे मनात आलं ते धाडधाड बोलून मोकळी झाली होती आणि आता… नुसती घाबरत होती. बोलताना पण अडखळत होती… आणि जरा शांत शांत पण वाटत होती.

    “या सगळ्यात विनाकारण हिला त्रास झालाय. खरंच हिची काय चूक? माझ्या स्वार्थासाठी हिचा वापर केलाय. किती निरागस आहे ही…  पण झाला तो झाला त्रास… या पुढे कसलाही त्रास नाही होऊ देणार मी! आणि ही गोष्ट राम जिजूंनाही पटवून द्यावी लागणार वाटतं… त्याशिवाय ते दिचा विचार करणार नाहीत…” तो तिच्याकडे पाहात विचार करत होता.

    इकडे  राम आणि पवनने सगळं व्यवस्थित आहे की, नाही ते चेक केलं आणि तिथेच हॉलवर एका ठिकाणी खुर्चीवर बसले. पवनने दोघांसाठी चहा आणि नाश्ता मागवला. कारण, सकाळपासून दोघांनी काहीच खाल्लं नव्हतं.

    “दादा बास आता, तू काहीही काम करणार नाहीस! तुझं पण लग्न आहे, हे विसरू नकोस. आता बाकीची तयारी आम्ही करू… ” पवन.

    पण रामचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं.

    “दादा…,” त्याने पुन्हा आवाज दिला.

    “हं… काय… काय झालं?” राम त्याच्या विचारातून बाहेर येत म्हणाला.

    “तेच विचारतोय… कसला विचार करतोयस?” पवन

    “काही नाही, असंच…” राम स्वत:ला सावरत म्हणाला. तोवर चहा आणि नाश्ता आला. मग दोघांनी थोडंस खाल्लं.

    खाऊन झाल्यावर पवनने परत त्याला विचारलं, “कसला विचार करतोयस?”

    “अं… अजून किती वेळ थांबायचं इथे?” बराच वेळापासून खाली बघून, ओढणीचं टोक बोटाला गुंडाळून गुंडाळून तिला आता कंटाळा आला होता. तरीही, शिवची काहीच प्रतिक्रिया येत कशी नाही, ते पाहण्यासाठी हळूच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच एकटक पाहात होता. त्याच्या असं पाहण्याने तिला अवघडून आलं होतं. पण तो आहे की, नजर हटवायच नाव घेईना…

    “हं… काय?” भानावर येत शिव म्हणाला. कारण, त्याचं लक्षच नव्हतं, ती काय म्हणाली त्याकडे!

    “अं, जायचं का? उशीर होतोय…” ती पुन्हा म्हणाली.

    “अं… हो चल…” तो पुढे चालत म्हणाला.

    मग तीही त्याच्या मागे बाहेर आली. बाहेर आल्यावर तिची नजर जीवनवर गेली. (असं तर तिला कधी कोणाचे चेहरे लक्षात राहात नाहीत, असं तीच म्हणत असते… पण या जीवनचा चेहरा कसा लक्षात आहे? तिचं तीच जाणो…)

    “अरे, तुम्ही अजून इथेच आहात! बरं झालं आहात… मला सांगा ना ते पिल्लू कसं आहे?” ती परत त्याच्याजवळ जात म्हणाली… जीवन परत गडबडला आणि घाबरून त्याची नजर शिववर गेली. पण त्याने बघितलं की, शिव वैतागून आरूकडे असा पाहतो की, जणू काही त्या पिल्लाची खुशाली जर कळली नाही, तिला जेवणच जाणार नाही!

    “अहो बोला ना?” आरू पुन्हा जरा मोठ्याने म्हणाली. त्याचं काहीच उत्तर येत नाही, ते पाहून…

    “ओके आहे ते पपी,” शिवच म्हणाला!

    “तुम्हाला काय माहिती? तुम्हाला काहीच माहीत नाही… तुम्हाला माहितीय, यांनी ना, यांच्या गाडीने एका…” ती सांगत होती, तोच शिव म्हणाला,

    “माहीत आहे मला… आणि ते पपी पण ठीक आहे… चल आता लेट होतोय. जीवन तू दुसऱ्या गाडीत बसून ये, मी ही गाडी घेऊन जातो.”

    तिला गाडीच दार उघडून गाडीत बसायला सांगून तो जीवनला म्हणाला आणि दुसऱ्या बाजूने ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. आरू मात्र गोंधळून त्याच्याकडे बघत होती…

    “तुम्हाला कसं महिती? आणि तुम्ही ओळखता का त्यांना?” आरू विचारत होती. पण तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत त्याने समोर गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं.

    “अहो बोला की…” तो काहीच बोलत नाही, हे पाहून ती वैतागून म्हणाली.

    “आय थिंक… तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं… आल्या आल्या असंच म्हणाली होतीस!” समोर पाहातच तो थंडपणे म्हणाला.

    “मी असं क…” ती बोलणारच होती की, तिला आठवलं… आल्या आल्या ती त्याच्यावर चिडली होती. आई आणि भाऊंना सांगू नको म्हणून सांगितलं तरी, त्याने त्यांना सियाबद्दल सांगितलं होतं.

    “ते… ते मला तुमचा राग आला होता म्हणून…” ती गाल फुगवून म्हणाली.

    त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा गाल फुगवलेला चेहरा त्याला खूपच क्यूट वाटला… आणि काही क्षण त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. तिची पण नजर त्याच्याकडे गेली. त्याची ती एकटक नजर पाहून तिला लाजल्यासारखं झालं आणि तिने खाली बघितलं. त्याच्याही लक्षात आलं आणि ओशाळून त्याने नजर वळवून सामोर पाहिलं.

    ती खिडकीतून बाहेर पाहू लागली आणि तो समोर बघून गाडी चालवू लागला… गाडीत एकदम शांतता पसरली.

    “का राग आला होता तुला?” थोड्या वेळाने शांतता भंग करत शिवने विचारलं.

    “हां…” तिचं लक्ष नसल्यामुळे तो काय म्हणाला ते तिला ऐकायला आलं नव्हतं, म्हणून गोंधळून म्हणाली.

    “मी म्हणालो… का राग आला होता तुला?” त्याने परत एकदा विचारल

    “ते होय… हां ते तुम्ही… काही नाही जाऊद्या… मी नाही सांगत…”  तिला परत आठवलं, रागवायचं आहे म्हणून…

    “ओके… फाइन… नको सांगू… ” ॲटिट्यूड  दाखवत शिव म्हणाला.

    ‘अरे, हे तर गप्प बसले… परत परत विचारायचं ना, काय झाल म्हणून! त्या स्नेहाचा नवरा तर, ती रागावली की, किती मस्का लावतो… मी पण काय तिचं ऐकून मूर्खपणा करतेय! आमची कुठं एवढी ओळख झाली की, ते माझा राग काढत बसतील…’ ती विचार करत होती.

    “उतर…” तो गाडी थांबवत म्हणाला.

    “हां…” असं म्हणत तिने बाहेर डोकावून पाहिलं तर, तिला आसपास कुठेच कपड्यांचं दुकान दिसलं नाही.

    “इथं का? ओ तुम्ही मला इथं सोडून तर जाणार नाही ना?… मी चिडून बोलले म्हणून तुम्हाला राग आला का? हे बघा, म… मला माफ करा, मी तर असंच… मला जर इथं सोडलं तर मी घरी कशी जाणार? माझ्याकडे फोन पण नाही. मी दादाला फोन केला असता तर… नाही… नाही… मी नाही उतरणार खाली!” ती बडबडतच होती आणि अचानक आवाज बंद झाला तिचा आणि घाबरून डोळे मोठे झाले होते…

    हेही वाचा – आरूबरोबर दागिन्यांची खरेदी करताना सियाचं लक्ष दरवाजाकडे होते…

    कारण त्याने पुढे होऊन हाताने तिचं तोंड दाबून धरलं होतं… एक हात मागून तिच्या मानेत घातला होता आणि दुसऱ्या हाताने समोरून तिचं तोंड दाबून धरलं होतं. या सगळ्यात तो तिच्या एकदम जवळ आला होता… पूर्णपणे तिच्या अंगावर झुकला होता!

    “किती बोलतेस? आजी म्हणते तसं तुझं तोंड जर खापराचं असतं तर फुटून गेलं असतं! बडबड बडबड… नुसती बडबड… समोरच्याला पण बोलायची संधी देत  जा ना!” तो तसाच तिच्या तोंडावर हात ठेवून बोलत होता… ती मात्र एकटक डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहात होती.

    “आता बोल ना… गप्प का आहेस?” .. तो चिडून म्हणाला. पण ती काय बोलणार? तिला ऐकायलाच येत नव्हतं काही! फ्रीज झाली होती… एकदम सुन्न… फक्त त्याच्या ओठांची हालचाल जाणवत होती .. आणि ऐकू येत होती ती हृदयाची धडधड… त्याच्या की तिच्या हृदयाची हे माहीत नाही… त्याच्या स्पर्शाने करंट लागल्यासारखं तिला वाटत होतं. यापूर्वी कधीच असं तिला जाणवलं नव्हतं… कसं जाणवणार? आजपर्यंत कुठल्याच परपुरुषाचा स्पर्श तिला झाला नव्हता असा! पवनने तिला स्पर्श केला होता… मिठी मारली होती… पण तेव्हा हे असं वेगळं काहीच वाटलं नव्हतं… खरंतर तिच्यासाठी खूपच विचित्र होतं हे! पण छानही वाटत होतं…

    क्रमशः

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 10, 2026

    “ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए…

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.