Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेMarch 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, त्याची मैत्री, मित्रांच्या वयातील फरक, लाघवी व्यक्तिमत्व, आयुष्याचा टवटवीतपणा, पूर्वपुण्याईचे मित्र, मैत्रिची दिवाळी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि टवटवीत ठेवायला मदत करत असतो. जसं घराला देण्यात येणारा रंग किंवा कपड्यांच्या रंगाबाबत आपण बोलतो की, या रंगासोबत हा रंग खुलून दिसेल किंवा हा रंग या रंगाबरोबर चांगला दिसतो वगैरे… तसंच आपल्या माणसांचं पण असतं, असं मला वाटतं. काही माणसं त्यांच्या स्वभावामुळे, वागण्याबोलण्यामुळे आपलं लक्ष चटकन् वेधून घेतात. त्यांच्या सहवासात घालवलेला वेळ दीर्घकाळ आपल्या स्मरणात रहातो. त्यांच्यासोबत काही गोष्टी गंमत म्हणून करून बघायची हिंमत आपण करतो!

    तोही असाच आहे. एका वेगळ्या वळणावर मला भेटलेला… मनमोकळ्या स्वभावाचा, मिश्किल आणि आमच्यातील वयाचं भलं मोठं अंतर विसरून सतत खोड्या काढत मला पोट दुखेस्तोवर हसवणारा! पण तितकाच माझी काळजी घेणारा… खरंच, गतजन्मीची पुण्याई म्हणूनच अशी माणसं अचानक तुमच्या आयुष्यात येतात, या गोष्टीवरचा माझा विश्वास ठाम झाला, जेव्हा सहा वर्षांपूर्वी हा भेटला मला अचानक! एकमेकांना समजून घेताना आमच्यात कुरबुरी आणि भांडण जरूर झाली. पण आज मात्र आमची मैत्री इतकी छान आहे की, त्याला जवळून बारकाव्यासहीत ओळखणारे त्याचे तरूण मित्र “काका, तुम्ही कसं काय ॲडजस्ट केलंत याच्याबरोबर?” असं म्हणून माझंच कौतुक करतात.

    पण ते काही असो. परमेश्वराने आपल्या आयुष्यात काही माणसांची एंट्री सहेतूक केलेली असते, एवढं मात्र नक्की!

    तो आज सकाळी व्यावसायिक कामानिमित्त मुंबईबाहेर जायचा होता, भल्या पहाटेच्या विमानाने. आजकाल विमानतळावर दोन-तीन तास तरी आधी पोहोचावे लागते. मी विमानतळाजवळ रहात असल्याने त्याला काल दुपारी मेसेज केला होता की, माझ्या घरी मुक्कामाला येणार असल्यास कळव. त्यांचं उत्तर आलं, ‘बायकोला विचारून कळवतो.’ यावर मी चिडवलं तर, मिश्कीलपणे मला म्हणाला, ‘काका, तुम्हाला माहीत नाही दहशत असते ती लग्न झाल्यावर. काय काय सहन करावं लागतं विचारा तुमच्या लग्न झालेल्या मित्रांना!’ अर्थात, याचा एकंदरीत स्वभाव बघता हा काही सहन करत असेल, यावर कोणाचाही किंचितही विश्वास बसणार नाही हेही तितकंच खरं…

    हेही वाचा – गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले…

    संध्याकाळी जणू काही लढाईच जिंकल्यासारखा त्याचा मेसेज आला, “परवानगी दिली बायकोने पण मी जेवून निघेन तुमच्याकडे यायला…”

    तो रात्री 12.30 ला आला आणि पहाटे 3.30 ला गेला. तो आल्यावर जेमतेम 15 मिनिटे आम्ही गप्पा मारत बसलो आणि नंतर झोपलो. तो निघताना त्याच्या हातावर चिमूटभर साखर ठेवली (तो दही खात नाही म्हणून) आणि म्हणालो, “येत जा असाच अधूनमधून. खूप बरं वाटलं मला तू आलास म्हणून.”

    हेही वाचा – आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…

    पण 15 मिनिटांच्या त्या गप्पा मला भरभरुन आनंद आणि समाधान देऊन गेल्या. तो आनंद आणि ते समाधान मला आजपासून पुढे कित्येक दिवस टवटवीत ठेवेल एवढं निश्चित.

    काही व्यक्तींचा तो सहवास
    वाटे मज असावा बारमास
    आयुष्याच्या दरवाजावरची
    नात्यांच्या दिव्यांची आरास…

    आनंदी अन् समाधानी अशी
    जीवनाची ती व्हावी दिवाळी
    शेवटच्या श्वासापर्यंत टिकावी
    अशी अतूट मैत्रीची रांगोळी…

    प्रेमाचा आणि आपुलकीचा
    खायला मिळावा सदैव फराळ
    घट्ट आधाराचा देखणा कंदील
    उंच टांगलेला तो सर्वकाळ…

    फुटू दे फटाके अधूनमधून
    मतभेदाचे अन् भांडणाचे
    पण गोडी वाढवती मैत्रीची
    लावलेले ते अनार समजुतीचे…

    अशीच असू दे अविस्मरणीय
    कायम दिवाळी आमच्या मैत्रीची
    त्या प्रवासातच होऊ दे माझ्या
    कधीतरी ती इतिश्री जीवनाची…


     

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    By पराग गोडबोलेMarch 23, 2026

    शनिवारची सकाळ. नेहेमीप्रमाणेच लताबाई आली घरकामाला. ती आली आणि केर काढू लागली की, माझी नुसती…

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 359
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn