Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : मसाल्याच्या रस्सा भाज्या, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मसाल्याच्या रस्सा भाज्या, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 27, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मसाल्याच्या रस्सेदार भाज्या, कोथिंबरीची चटणी, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग, भाज्या टिकवणे, फ्रीजमधील भाज्या,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मसाल्याच्या रस्सेदार भाज्या, कोथिंबरीची चटणी, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी या टिप्स वापरून पाहा.

    • रस्सा किंवा सांबारावर लालभडक तवंग हवा असेल, पण तिखटपणा कमी हवा असेल तर, तेलाची फोडणी करून त्यात थोडा टोमॅटो सॉस आणि एक चमचा लाल तिखट घालून परतावे. नंतर त्यावर उकळते पाणी ओतावे. तेल कमी घालून तवंग छान येतो.
    • हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची चटणी करताना वेळेवर घरात खोबरे नसेल तर, कच्च्या बटाट्यावरचे साल काढून तो किसावा आणि चटणीत टाकावा. स्वादात फरक पडत नाही. चटणी चांगली लागते आणि वेळवर काम भागते.

    हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…

    • भाजीपाला साफ करून वर्तमानपत्रात गुंडाळून नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावा. दोन आठवडे सहज ताजा राहतो.
    • कोथिंबीर फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत किंवा जाळीच्या डब्यात ठेवली तरी लवकर खराब होते. त्यापेक्षा स्टीलच्या डब्यात खाली-वर वर्तमानपत्राचा कागद दुहेरी करून घातल्यास ती खूप जास्त दिवस टिकते. कारण बाष्पीभवनामुळे सुटणारे पाणी वर्तमानपत्राच्या कागदाने शोषून घेतले जाते. डबा बंद करून ठेवावा.
    • फेब्रुवारीपर्यंत भाज्या स्वस्त असतात. त्या वेळी गाजराचा कीस, कोथिंबीर, हरभऱ्याची कोवळी पानं, कोबी बारीक चिरून, मेथी वाळवून ठेवता येते. तसेच, हिरव्या मिरच्यांवर मिठाचे गरम पाणी ओतून नंतर त्या वाळवल्यास त्याचा नंतरही उपयोग करता येतो.
    • मसाल्याच्या रस्सेदार भाज्यांमध्ये (चना मसाला, मटर मसाला, मटण, चिकन इत्यादी) तीन किंवा चार लवंगा आणि काबुली चण्याएवढ्या जायफळाची बारीक पूड करून कोथिंबिरीबरोबर घालून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाजी पाचक, सुवासिक होते आणि रंग आकर्षक येतो!

    हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स

    • अळूची वडी वाफवून न कापता अशीच दोऱ्याने बांधून फ्रीजमध्ये ठेवली असता 25 ते 30 दिवस टिकते.
    • सॅण्डविच करताना नारळ-पुदिना चटणीऐवजी पालकाची चटणी लावली तर गॅसेस होत नाहीत. पालकाची चटणी भरपूर होते, तसेच पौष्टिकही. ती चार-पाच दिवस फ्रीजमध्ये टिकते. पालकाच्या चटणीत हिरव्या मिरच्या, एक लिंबू, साखर, मीठ, डाळं, जिरे चवीपुरते घाला. यात डाळं घातल्यामुळे ती पौष्टिक होते, टिकते. तसेच, लिंबू आणि जिरे यामुळे पालकाचा उग्रपणा जातो तसेच चटणी हिरवीगार होते.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026 फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 509
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn