Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : आहाराच्या वेळा आणि प्रमाण
    आरोग्य

    निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : आहाराच्या वेळा आणि प्रमाण

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेNovember 1, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, आहार विहार, सात्विक आहार, पौष्टिक आहार, संतुलित आहार,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखांत आपण लवकर झोपायला जाणे, सुखनिद्रा घेणे आणि लवकर उठणे या दिनचर्येतील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेतले. या लेखात आपण आहाराच्या वेळा आणि प्रमाण याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत.

    आपले शरीर आहारातून निर्माण झाले आहे, हे ध्यानात घेता आहार आणि शरीर यांतील संबंध सहजी लक्षात येतो.

    आहाराची उद्दिष्ट्ये

    • शरीराची झीज भरून काढणे.
    • शरीराची वाढ करणे.
    • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे.

    हे सर्व साध्य करण्यासाठी आपला आहार संतुलित, सात्त्विक आणि पौष्टिक असायला हवा. आपल्या दिनचर्येत आहाराच्या वेळा तसेच प्रमाण या दोनही बाबींना अतिशय महत्त्व आहे.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची

    आहाराच्या वेळा

    आहार घेण्याची वेळ ठरलेली असावी. त्यात वारंवार बदल करू नये. दिनचर्येत खालील पद्धतीने आहाराच्या वेळेचे नियोजन करावे :

    • न्याहारी / नाश्ता – सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान.
    • दुपारचे जेवण – दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान.
    • मधल्या वेळेचा आहार – दुपारी 4.30 ते 5 च्या दरम्यान.
    • रात्रीचे जेवण – 7.30 ते 8 च्या दरम्यान.

    आहाराचे प्रमाण

    सर्वसाधारणपणे आहाराचे प्रमाण खालील प्रमाणे असावे.

    • सकाळची न्याहारी/नाश्ता – सकाळी उठल्यावर लागणारी भूक शमविण्यासाठी सेवन केलेला आहार दिवसातील महत्त्वाचा आहार आहे. दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळावी म्हणून सकाळचा नाश्ता पोटभर व्यवस्थित असणे आरोग्यास हितकारक आहे.
    • दुपारचे जेवण – यावेळेस पचनक्रिया उत्तम रीतीने कार्यरत असते. त्यामुळे मध्यम प्रमाणात घेतलेला आहार आरोग्यास उत्तम आहे.
    • मधल्या वेळचा आहार – दोन जेवणांच्या मधल्या वेळेत भूक लागल्यास गरजेनुसार अल्प आहार/पेय घ्यावे.
    • रात्रीचे जेवण – रात्रीच्या वेळी शारीरिक हालचाली कमी होतात. म्हणून पचायला सुलभ आणि हलका मिताहार आरोग्यास हितावह आहे.

    आहारासंबंधी सर्वांना माहीत असलेले विधान म्हणजे ‘सकाळचा नाश्ता राजपुत्रासारखा, दुपारचे जेवण राजासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे.’

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रेसाठी निवडक उपयुक्त उपाय

    याबाबतीत लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेला आहार प्रकृतीस हितकारक असतो. आहाराचे प्रमाण ठरवताना चवीपेक्षा आरोग्यास प्राधान्य द्यावे, म्हणजेच, आहार सेवन करताना जिभेचा सल्ला न मानता पोटाचा सल्ला घ्यावा. डाएटबद्दल सांगायचे झाल्यास – Dieting is not about starving. It is changing from tongue conscious food to health conscious food.

    निरामय आरोग्यासाठी आहाराच्या वेळा तथा प्रमाण यांचे नियमित पालन करणे नितांत आवश्यक आहे.

    निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या आहार-विहार आणि मानसिक आरोग्य या पुस्तकांत ‘पौष्टिक, पोषक आणि सात्त्विक आहार’ तसेच ‘आरोग्यदायी सात्त्विक आहार’ या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

    क्रमशः

    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026 आरोग्य

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेMarch 21, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य…

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn