Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 18 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वितीया 18:29; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 18:07 योग : गंड 23:58; करण : तैतिल 07:52, वणिज 29:04 सूर्य : सिंह; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:46 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 द्वितीया श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जुना मित्र सल्ला देऊ शकतो, तुम्ही तो अमलात आणला तर, धन लाभ होऊ शकतो. स्वत:ची…
प्रदीप केळुस्कर भाग – 1 केशव काकांच्या तेराव्याचे जेवण जेवून शेजारी, नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता… हे केशवरावांचे दोन मुलगे, यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई… मोहन आणि आशा उद्याच मुंबईला जाणार आणि बहीण यशोदाही उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासनू भटजी येणारे नातेवाईक, जेवण… गडबड नुसती! वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता ओट्यावर आणि आशा, यशोदा आत खोलीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी. त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती. ती मनात म्हणत होती. उद्या…
रश्मी परांजपे मागील चार लेखांच्या माध्यमातून आपण शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी या व्यापक विषयासंबंधीत काही निवडक मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी या महत्त्वाच्या विषयाची प्रथम थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. पालकांप्रमाणे शाळेने देखील मुलांच्या प्रती असलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलांची शैक्षणिक प्रगती तसेच सर्वांगीण विकास निश्चितच सुकर होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात बहुतांश संस्था पूर्व-प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा असे शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. (केवळ पूर्व-प्राथमिक शालेय उपक्रम राबविणाऱ्या संस्था असतात, पण त्यांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.) शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ, संस्थेशी निगडीत शाळेच्या विविध समितींच्या सहाय्याने संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत असते. पूर्व-प्राथमिक…
हर्षा गुप्ते कोथिंबीर वडी – प्रकार 1 साहित्य किसलेला कच्चा बटाटा – 1 वाटी चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी तांदळाचे पीठ – 2 मोठे चमचे बेसन – आवश्यकतेनुसार लसूण – 7-8 पाकळ्या आले – 1 इंच हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार धणे – 1 चमचा जिरे – 1 चमचा बडीशेप – 1 चमचा ओवा – अर्धा चमचा तिळ – 1 चमचा तेल – तळणासाठी हिंग – स्वादानुसार पुरवठा संख्या – चार जणांसाठी एकूण कालावधी – अर्धा तास कृती एका मोठ्या वाडग्यात चिरलेली कोथिंबीर, किसलेला कच्चा बटाटा घ्यावा. आले, लसूण, मिरच्या, धणे, जिरे, बडीशेप, ओवा हे सगळं जाडसर खलबत्त्यात कुटून घ्यावे. कुटलेले…
पराग गोडबोले साठे बाई अगदी खुशीत होत्या. एकट्याच निघाल्या होत्या चारधाम यात्रेला, एका प्रसिद्ध प्रवास कंपनीसोबत… तब्बल दहा दिवसांचा प्रवास, तो ही ‘एकटा जीव सदाशिव’ प्रकारचा! नवरा आणि लेक यांच्याशिवाय, ‘एकला चालो रे’ असा मुक्त संचार, देवभूमीचा!! त्या दोघांनाही विनवण्या करकरून थकल्यावर, छानशी सरकारी नोकरी करणाऱ्या बाईंनी ठरवलं, आता पुरे झालं, आपला मार्ग आपणच चोखाळायचा. लगोलग, चौकशी करायला एका प्रसिद्ध यात्रा कंपनीत गेल्या आणि एकाच बैठकीत प्रवासाच्या तारखा ठरवून, अर्धे पैसे भरूनही आल्या! स्वतंत्र खोलीचे जास्त पैसे होते, पण कुठे अनोळखी बाईसोबत तिची तंत्र सांभाळत एकत्र राहाणार? असा विचार करून स्वतंत्र खोलीच घेतली त्यांनी, ‘होऊ दे’ खर्च म्हणत… दुसऱ्याच दिवशी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा श्रीभगवान उवाच : प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥55॥ म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेसी । करीत असे ॥291॥ जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु । परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे ॥292॥ तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥293॥ दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥56॥ नाना दुःखी प्राप्तीं ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 17 भाद्रपद शके 1947; तिथि : प्रतिपदा 21:12; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 20:02 योग : धृती 06:29, शूल 27:19; करण : बालव 10:27 सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ 14:29; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:47 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रतिपदा श्राद्ध ग्रहण करी दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक व्यवस्थेचे अधिक काटेकोरपणे नियमन करा. फायदेशीर संधी वाढतील. विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय व्हाल आणि…
डॉ. अस्मिता हवालदार जसं व्यक्तीचं भाग्य असतं तसच देशाचं सुद्धा भाग्य असतं. आपल्या देशाचं थोर भाग्य काही व्यक्तींनी, काही राजांनी घडवलं आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा राजा कृष्णदेवराय! दक्षिणेत अडीचशे वर्षांहून अधिक काळ भक्कम पाय रोवून उभे असलेल्या विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय. त्याच्या आणि तेनाली रामनच्या कथा प्रसिद्ध आहेत. विजयनगर साम्राज्याबद्दल जी अगदीच जराशी माहिती सांगितली गेली, त्यात या राजाच्या कथा सांगितल्या गेल्या; परंतु याचे व्यक्तिमत्व याहून बरेच उत्तुंग होते. विजयनगराबद्दल अब्दुल रझाक या परदेशी प्रवाशाने लिहून ठेवले आहे, ‘ज्ञानाच्या कानाने ऐकले नाही आणि डोळ्यांच्या बाहुलीने पहिले नाही, असे हे जगातले एकमेव शहर आहे.’ तो पुढे म्हणतो, ‘इथल्या संपत्तीचे खरेखुरे वर्णन…
दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 4 दिवस पुढे पळत होते. शनिवार, रविवार सुट्टी मिळाली की, मी मिरजेला जात असे आणि बाबांना भेटत असे… मी त्यांच्यापुढे उभे राहिलो की, लगेच म्हणायचे, “आओ बेटा…” मी आल्याची चाहूल त्यांना कशी समजत होती, हे मला माहीत नाही! एक आठवड्यानंतर बाबा मला एकदम नवीन कपड्यांमध्ये दिसले… डोळ्यांचे पारणे फिटले. मी त्यांच्याबद्दल घालून दिलेले नियोजन परफेक्ट चालले होते, त्यांना सकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण, रोज आंघोळ मिळत होती… मी तसे दुकानदारांना सांगून ठेवले होते, “तुम्ही पैशांची काही काळजी करू नका.” त्यांच्याजवळ बसणाऱ्या माणसांना मी विचारलं, “ आता बाबा बोलतात का तुमच्याबरोबर…?” “एवढं आमचं नशीब नको का? पण…
यश:श्री जोशी साहित्य भातासाठी तांदूळ – 2 वाट्या (बासमती तांदूळ ऐच्छिक) तेल – 1 टेबलस्पून बटर – 1 टेबलस्पून लसूण – 7 ते 8 पाकळ्या हिरवी मिरची – तिखट असल्यास 1, कमी तिखट असल्यास 2 कांदे – 2 मध्यम आकाराचे सिमला मिरची – 1 लहान स्वीट कॉर्न – 1 कणसाचे दाणे टोमॅटो – 2 मध्यम आकाराचे मिरपूड – 1 टीस्पून ओरिगॅनो – 1 टीस्पून चिली फ्लेक्स – 1 टीस्पून मीठ – चवीनुसार पुरवठा संख्या : 3 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : तांदूळ धुवून भिजवून ठेवायला – अर्धा तास कणीस सोलून दाणे उकडून घ्यायला – 15 मिनिटे भाज्या चिरायला – 15…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 512
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

