Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
माधुरी साने पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचे मिश्रण. आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने पंचामृत बनवले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते तीर्थ म्हणून दिले जाते. आता आपण ढोबळी मिरचीचे पंचामृत कसे बनवले जाते, ते जाणून घेऊया. साहित्य ढोबळी मिरच्या – 2 मध्यम आकाराच्या बटाटे – 2 धणे – पाव वाटी जिरे – पाव वाटी लाल मिरच्या – 4 ते 5 सुके खोबरे किस – अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी भिजवलेले काजू – अर्धी वाटी दालचिनी – 1 इंच काळीमिरी – 4 ते 5 लवंग – 2 ते…
माधवी जोशी माहुलकर भाग – 2 चरायला नेलेल्या गाई-म्हशी संध्याकाळी परत घेऊन येत असताना धनगर दिनूला, बाभळीच्या झाडावर एका माणसाने गळफास घेतल्याचे पाहिले आणि दरदरून घाम फुटला. कसंबसं स्वतःला सावरत काट्याकुट्यातून धावत त्याने गावाकडे धूम ठोकली. दिनूला कशाचेच भान नव्हते. घामाने ओलेचिंब झालेला दिनू धापा टाकत, जोरजोराने ओरडतच सरळ गावच्या सरपंचांच्या घरामध्ये घुसला. सरपंचांच्या घरची मंडळी आणि गावातले काही लोक आधीपासूनच तिथे बसलेले होते… त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. दिनूची आरडाओरड ऐकून सर्व उठून उभेच राहीले. दिनूला कसबसं रामा गड्याने शांत केलं आणि पाण्याचा तांब्या देत “काय झालंय ते नीट सांग…” म्हणून सांगितलं. दिनूने पाण्याचा तांब्या पहिले घटाघटा रीता करून घसा…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥12॥ मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥71॥ तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त । परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥72॥ वाचूंनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥73॥ जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 18 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्थी 19:38; नक्षत्र : कृत्तिका 17:31 योग : सिद्धी 17:41; करण : बव 09:14, कौलव 30:07 सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:21 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:53) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला असेल. काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन उपक्रम सुरू करू…
ॲड. कृष्णा पाटील साधारणपणे दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याचा फोन आला… “सर, प्रवीण बोलतोय. मी आता सुरतला आहे. माझे वडील तुमच्याकडे येणार आहेत. त्यांना कधी भेटाल सांगू?” मी म्हणालो, “उद्या सकाळी नऊ वाजता…” प्रवीणचे वडील आले. बरोबर प्रवीणचे मामा होते, ते सांगू लागले. “काल हे शेतातून घरी येत होते. सायकलवर होते. अचानक समोरून जीप आली. सायकलवर धडकली. हे खाली पडले. गुडघ्याला लागलं. ती पोरं पसार झाली. गावतलीच होती, देसायांची… रात्री आठ वाजता जेवणं झाली. घराबाहेर गलका ऐकायला आला. 10-15 जण आले होते. त्यांनी दारावर लाथा मारल्या. यांना खाली पाडून मारलं. पत्नीलाही मारलं. देसायांच्या घराण्याला धडा शिकवायचा. काय बी होऊ द्या. त्यांना…
दत्तात्रय पांडुरंग मानुगडे वेळ सकाळची होती… त्या दिवशी रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. गेला आठवडाभर अभ्यास करून कंटाळा आला होता. वर्गामध्ये खेळातून झालेली भांडणे… भांडणांमध्ये फुटलेल्या पाट्या. त्याच्यासाठी हातावर खाल्लेल्या दोन दोन छ्डया… या राहून राहून आठवत होत्या. आज रविवार म्हणून आईने गावातील घर सारवण्यासाठी बेत आखला होता. आई मला म्हणाली, “आज शाळेला सुट्टी आहे तर, माझ्याबरोबर आपल्या गावाकडच्या घराकडे चल. मी शिडीवर बसून भिंत सारवून घेते. तू फक्त सारण्याचा कपडा खालून माझ्या हातात दे. मी सारवून घेते…” “अगं आई, मला कसे जमणार?” मी म्हणालो. “तुला न जमाय काय झाले? शाळेला सुट्टी आहे म्हणून तुला काम सांगते. रानात बसून काय…
हर्षा गुप्ते भारतात अळूच्या पानांचा आणि देठांचा उपयोग लज्जतदार अन्नपदार्थांसाठी केला जातो. अळूपासून कर्नाटकाच्या दक्षिण तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात चेंबिला करी आणि गुजरातमध्ये पात्रा असे पदार्थ बनविले जातात. तर, महाराष्ट्रात अळूवडी आणि अळूचे फतफते हे प्रकार प्रसिद्ध आहेत. अळूवडी देखील वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते. आपण पाहूयात भरली अळूवडी. तयारी आणि कृतीचा एकूण कालावधी – सुमारे अर्धा तास पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी साहित्य अळूवडीचा कच्चा उंडा – 1 मध्यम आकाराचे बटाटे – 3 भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी कातलेले खोबरे – अर्धी वाटी हिंग – चिमुटभर मोहरी – 1 लहान चमचा मीठ – चवीनुसार चिली फ्लेक्स – पसंतीनुसार तेल…
सतीश बर्वे माझे ऑपरेशन एकदाचे व्यवस्थित पार पडले अन् माझ्यासकट राहुल, अभिषेक, सुमेध आणि ऋषिकेश सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. गेले कित्येक दिवस सगळेजण माझ्यासाठी खूप धावपळ करत होते, कारण माझे घरचे असे कोणीच नव्हते इथे येण्यासारखे. ऑपेरेशनच्या आदल्या दिवशी मात्र सगळेच मनातून घाबरलेले होते. माझ्या खोलीतील वातावरण भावूक झाले होते. प्रत्येकाची समजूत काढणे मला खरोखरच कठीण गेले होते… पण माझा देवावर, डॉक्टरांवर आणि स्वतःवर विश्वास होता. मला खात्री होती यातून मी सहलीसलामत बाहेर येईन! कारण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. माझ्यात सुधारणा झपाट्याने होत होती आणि कदाचित आठवड्यानंतर मला घरी जायची परवानगी मिळणार होती. आधी आम्ही ठरल्याप्रमाणे ऑपरेशननंतर अभिषेकने चैतन्यला अमेरिकेत…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥9॥ माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥ तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥ 59॥ वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥10॥ एर्हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 17 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 22:54; नक्षत्र : भरणी 20:02 योग : वज्र 21:32; करण : वणिज 12:37 सूर्य : कन्या; चंद्र : मेष 25:23; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:22 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे आनंद मिळेल. व्यावसायिकांना लहान प्रवासाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 248
- अवांतर 175
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

