Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… ‘आठवते का?’… ‘विसरलीस का?’… बरोब्बर आजचा एपिसोड आहे आठवणींचा! आठवणी – बालपणीच्या, तरुणपणातल्या, वाढत्या वयातल्या आणि हळूहळू वार्धक्याकडे प्रयाण करतानाच्या… छोट्या मोठ्या, विस्मरणात गेलेल्या घटना सुद्धा! एका खूप मोठ्या माणसाची आठवण… ते एका मोठ्या पक्षाचे खूप मोठे नेते होते. माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांना दादा आणि त्यांच्या पत्नीना वाहिनी म्हणायचे. दोघेही एवढे मोठे असून सुद्धा खूप साधे… अगदी साधारण म्हटलं तरी चालेल! दादा तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांना नावानिशी ओळखतात. काही काळ मी आणि माझा नवरा त्यांच्या कॉन्टॅकमध्ये बराच काळ होतो. अचानक तीन-चार वर्षे सरली आणि पुन्हा एकदा दादांच्या भेटीला मी गेले.…
यशःश्री जोशी बाजारात सध्या ताजे, रसरशीत आवळे मोठ्या प्रमाणात येत आहेत. थंडीत रात्रीच्या जेवणासाठी याच आवळ्यापासून तयार केलेले गरमागरम रसम आणि भात हा बेत एकदा करून बघा. आवळ्याचे सूप म्हणून देखील या पदार्थाचा आस्वाद घेता येतो. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 20 मिनिटे हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा…
पराग गोडबोले साडेपाचचा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणे तो दहा मिनिटं snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं. पाच चाळीसला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखेपिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून… नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, ‘किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला.’ पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं, पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता… चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना… तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन… हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जया सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥115॥ विपायें अंहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरि मग काय कीजेल । एकलेया ॥116॥ दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥117॥ आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥118॥ इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि…
दर्शन कुलकर्णी सोमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस शुभ आणि सकारात्मक राहील. तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल. आज अनेक संधी मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळू शकतो. वृषभ – करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वाची संधी मिळू शकते. व्यवसायातून चांगला फायदा होईल. राजकारणात सहभागी असलेल्यांना एक महत्त्वाची संधी मिळू शकते. आज काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खाण्यावर नियंत्रण ठेवा, पथ्ये पाळा. मिथुन – दिवस शुभ राहील. नवीन ध्येय साध्य करण्यासाठी…
डॉ. किशोर महाबळ नियमितपणे अभ्यास आणि गृहपाठ न करणे, शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यात उत्साह नसणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, नेहमीच शाळेत तसेच वर्गात उशिरा पोचणे, परीक्षेच्या दिवशी शाळेत अनुपस्थित राहणे, परीक्षांमध्ये सातत्याने कमी गुण मिळणे किंवा नापास होणे, नियमित अभ्यास करून उत्तम गुण मिळविण्याऐवजी परीक्षेत गैरमार्गाने उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणे, आपले हस्ताक्षर सुवाच्य असावे यासाठी कोणतेही प्रयत्न न करणे, वर्गात शक्यतो सर्वात शेवटच्या बाकांवरच बसायचे, शिक्षकांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष करायचे, वर्गात शिकण्याशिवाय अन्य जमेल ते सर्व करायचे, वर्गात मन लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचा, शिक्षकांचेही लक्ष विचलित व्हावे यासाठी मुद्दाम तसे वागायचे, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात पुढाकार न…
शोभा भडके भाग – 1 “आरू… अगं झालं का नाही तुझं? किती उशीर! बस निघून जाईल ना…” राम बाहेरच्या अंगणात बॅग घेऊन उभा राहात तिला आवाज देत होता. “आले रे दाद्या किती जोराने ओरडतो… येतच होते ना!” ती लगबगीने खांद्यावर पर्स अडकवत, पायात सँडल घालत म्हणाली. ही आरु म्हणजे आपल्या कथेची नायिका… म्हणजे आराधना शिंदे… बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारी… तशी घरची परिस्थिती ठीक… घरी पाच एकर शेती… आई, वडील, ती आणि तिचा मोठा भाऊ असं त्यांचं चौकोनी कुटुंब… तसे चुलत काका, काकी, भावंडं वगैरे असा बराच मोठा गोतावळा आहे… पण सगळे वेगवेगळे! आईचं नाव कलावती तर, बाबा सखाराम…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोसा किंवा इडलीचे पीठ उरले तर काय करायचे? तसेच शिळ्या भाताचे काय करायचे, याच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना…. हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥105॥ ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥106॥ ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ॥107॥ तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥108॥ प्रणवाचिवे पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – होप फॉर द बेस्ट! दिनविशेष विज्ञानवादी अभिनेता डॉ. श्रीराम लागू टीम अवांतर आपल्या समर्थ अभिनयाने रंगभूमी, सिनेमा ही माध्यमे गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि नंतर पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयांमधून झाले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्यावरील शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेऊन पुण्यात 5 वर्षे काम केले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते कॅनडा आणि इंग्लंड येथे गेले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच श्रीराम लागू यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांवर लहानपणापासूनच मराठी नाटकांचा…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

