Author: Team Avaantar

ॲड. कृष्णा पाटील भाग – 1 तुम्हाला खरं सांगू का? माणसाची नियत कधी बदलेल काही सुद्धा सांगता येत नाही. तुम्ही कितीही विश्वासाने व्यवहार करा, तुम्ही कितीही त्याला प्रेमाने सांभाळा किंवा तुम्ही कितीही त्याला जीव लावा, एकदा का नियत बदलली की, या गोष्टीला काही एक अर्थ राहात नाही. आपण मात्र डोक्याला हात लावून बसतो. मी त्याच्यासाठी इतके केले. मी कदाचित माझ्या बायका-पोरांसाठी सुद्धा इतके केले नव्हते. पण याची ओळख तो विसरला. मग आपणच पश्चाताप करून घ्यायचा. आपणच आपला बीपी वाढवून घ्यायचा. आपणच आपल्याला शुगर सारखा आजार लावून घ्यायचा. माझे मित्र प्रशांत याला भेटायला जाताना मी हाच विचार करीत होतो. शेजारी ड्रायव्हर…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, कोशिंबीर, मिरचीचा ठेचा करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले माझं लग्न आंतरजातीय. म्हणजे, मी अगदी 96 कुळी मराठा आणि माझा नवरा कोकणस्थ ब्राह्मण, चित्पावन. कॉलेजात असताना, नकळत्या वयात अचानकच प्रेमात पडले आणि ‘मी मराठा, तो ब्राह्मण, कसं होईल आपलं…’ वगैरे विचार कधी शिवलेच नाहीत मनाला. प्रेम तसंच तर असतं, आंधळं! दोघांच्या घरी कळल्यावर, सुरुवातीला थोडा विरोध झाला, पण नव्या युगात हे सगळं होतच असतं हे समजून आणि आम्ही ऐकणार नाही हे उमजून, तो मावळलाही पटकन्. भाषा, खाणंपिणं, आचारविचार, सगळंच वेगळं… पण एक मात्र होतं, दोन्ही घरं सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या तोलामोलाची. राहणीमान साधारण सारखंच असणारी, त्यामुळे जमून गेलं सगळं! आता मी लहानपणापासून ‘ते’ सगळं खाणारी, अगदी आवडीने… आईच्या…

Read More

अध्याय आठवा सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च । मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥12॥ परी हें तरीच घडे । जरी संयमाचीं अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती ॥112॥ तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरु न संडी ॥113॥ तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥114॥ तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें । जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ॥115॥ तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । मग लग्नीं जेवीं ॐकारू । बिंबींचि विलसे ॥116॥ ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् । यः प्रयाति त्यजन् देहं…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज योग्य ती ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमच्यात दिसेल. व्यापारात आजचे नफ्याचे प्रमाण बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कामाच्या बाबतीत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपला दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. विद्यार्थी दिवसभर मोबाइलवरच असतील, ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. वृषभ – प्रलंबित देणी आल्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस पाहुणचार घेतला तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुमचा फायदा होईल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि जोडीदारामध्ये काही कारणांनी कुरबुरी  सुरू होत्या त्या आज संपतील. मिथुन – आरोग्याची काळजी घेणे अत्यंत…

Read More

स्नेहा सुतार भाग – 3 बसमध्ये चढल्यावर तिला मीटिंगच्या ठिकाणी पाण्याची बाटली विसरल्याचं आठवलं. पुन्हा बसमधून खाली उतरून तिने बेकरीत जाऊन दहा रुपयांची नोट पुढे केली आणि ‘बिसलेरी’ म्हणून ती तशीच उभी राहिली. काऊंटर पलीकडे कानात बाळी घातलेल्या गोरेल्या पोऱ्याने ‘ठंडा या नॉर्मल मॅडम?’ विचारलं तेव्हा नजर वर करून तिने ‘नॉर्मल’ म्हटलं आणि त्याने नवीन पॅकेजमधली एक बाटली काढून तिला दिली. हातात बॉटल आल्याबरोबर तिने कुणाकडे न बघता सरळ बस गाठली आणि तशीच मागची सीट पकडली. सर्वांपासून अलिप्त. सलीलचा गळा पुन्हा इअरफोनमधून गायला लागला… “बंध मनाचे जुळले…” बस अजून बहुतेकशी रिकामीच. बॅगमधून वेटवाइप्स काढून तिने हात चांगले पुसून घेतले. पिशवीत…

Read More

शोभा भडके भाग – 10 सकाळी नेहमीच्या वेळेत उठून शिवने आपलं आवरलं आणि तयार होऊन ऑफिसला जायला निघाला. त्याने आकाशला कॉल करून आजच्या कामाच्या डिटेल्स मागून मीटिंगची तयारी करायला सांगितली. ब्लेझर अंगावर चढवून, तो हातात वॉच घालत होता, तोच दारावर टकटक झाली… आणि त्यापाठोपाठ सिया आत आली… “दि… ये ना…” शिव तिच्याजवळ जात तिला आत घेऊन आला. खरंतर, त्याला तिच्याशी बोलायचं होतं रात्रीच! पण तिला वेळ द्यायला हवा, असा विचार करून त्याने बोलणं टाळलं होतं. पण आता ती स्वतःहूनच आली होती… तसं तर त्याला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती, पण या वेळेला दीपेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं… “हां बोल ना दि, काही…

Read More

माधवी जोशी माहुलकर मिसळीचे वरण किंवा मिश्र डाळींचे वरण हे महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्याच भागात घरोघरी बनत असेल. तूर, मूग, मसूर, उडीद, चणाडाळ आणि असेल तर चवळीची डाळ असे मिश्रण असलेले खमंग तसेच आले-लसूण पेस्ट, खोबरे, शेंगदाणे, खसखस, तमालपत्र, दालचिनी वापरून केलेले मसालेदार वरण ज्वारीच्या भाकरीसोबत भुरके मारून खाताना किती खातोय ते समजतच नाही. आज मी खूप दिवसांनी हे वरण केले; कारण नागपूरमध्ये सध्या थंडीने परत एकदा जोर पकडला आहे, त्यामुळे अशा वातावरणात हे तडकेदार वरण आहारात असलं तर  सहजच शरीरात उर्जा निर्माण होते. थंडीमध्ये असे गरम पदार्थ चालून जातात. हे वरण थोडे पातळसरच करावे, त्यामुळे तुम्हाला ते बाऊलमध्ये घेऊन सूप…

Read More

अध्याय आठवा यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः । यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥11॥ सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणियेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ॥100॥ चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥ तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तयातें म्हणितलें । अक्षर सहजे ॥102॥ म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ।।103॥ आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि ।…

Read More

दर्शन कुलकर्णी दर्शअमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – दिवाळी पहाट अन् फोन कॉल… दिनविशेष प्रसिद्ध गायक कुंदनलाल सेहगल टीम अवांतर प्रसिद्ध गायक आणि चित्रपट अभिनेते कुंदनलाल सेहगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयातच कुंदनलाल यांच्यावर झाले. गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सेहगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांना घेता आले नाही.…

Read More