Author: Team Avaantar

कामिनी व्यवहारे उंधियूचे साहित्य मेथी मुठियाचे साहित्य वाटण मसाला साहित्य मेथी मुठियांची कृती वाटण मसाला कृती उंधियूची कृती एकूण कालावधी – एक तास टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर सकाळी एक महाशय मान दुखतेय म्हणून ओपीडीत आले होते; जनरल केस टेकिंगचा भाग म्हणून त्यांना “तुम्ही काय काम करता?” विचारलं तर त्यांनी “मी गृहस्थ आहे,” असं उत्तर दिलं… मी प्रश्नार्थक नजरेनं बघितलं तेव्हा, “मी काहीच काम करत नाही, घरीच असतो… त्यामुळे गृहस्थ!” असं उत्तर त्यांनी दिलं. वास्तविक, काहीच काम न करणं हेही एक प्रकारचं कामच असतं. म्हणून त्यांना शेड्यूल विचारलं तर, “बायको मेस चालवते अन् अगदी कुणी नसेलच मदतीला तर मी अधूनमधून डबे पोहोचवतो…” असं उत्तर त्यांनी दिलं. या कामात वाकणं, वजन उचलणं, टू-व्हीलर चालवणं… या कामांमुळं मानेच्या स्नायूंवर ताण येत असावा, त्यामुळे त्यांना मसल रिलॅक्संट देत…

Read More

अध्याय आठवा येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेंचि साउली । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ।।138॥ ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥139॥ मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥140॥ जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥141॥ जें दुर्मतीचें मूळ । जें कुमार्गाचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥142॥ जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥143॥ जें काळाचा खिचउशिटा । जें आशेचा…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ असेल. कौटुंबिक जीवन शांती आणि आनंदाने भरलेले असेल. जोडीदाराकडून एखाद्या उपक्रमासाठी उत्तम पाठबळ मिळेल. खूप दिवसांनी जुन्या मित्रांच्या भेटी होण्याचा योग आहे, त्यानिमित्त आठवणींना उजाळा मिळेल. मोठ्या भावंडांकडून एखाद्या निर्णयाबाबत तुम्हाला पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. वृषभ – आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक बाबींबद्दल जास्त वादविवाद टाळा. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. मिथुन – ऑफिस राजकारणापासून दूर रहा. करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. काही जातकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू…

Read More

दिलीप कजगांवकर, पुणे राजने साताऱ्यातील कंपनीची ऑफर ॲक्सेप्ट केली आणि फ्लॅटच्याच भाड्यात प्रशस्त बंगला भाड्याने मिळाल्याने तो आणि नेहा खूश झाले. गेंडामाळ परिसरातील मेन रोडपासून थोड्याशा आत, पण अतिशय शांत आणि हिरव्यागार सोसायटीतील फक्त तीन बंगल्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते; बाकी दहा-बारा बंगल्यांचे बांधकाम अर्धवट स्थितीत होते. पहिला दिवस सामान लावण्यात गेला. संध्याकाळी भरपेट पोहे खाऊन आणि मसाला चहा पिऊन राज आणि नेहाच्या गप्पा रंगल्या. प्रत्येक विकेंडला जवळपासच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायचे, असे दोघांनी एकमताने ठरविले. भयाण शांतता, गार वारा; रात्रीचे बारा वाजले होते तरीही झोप लागत नव्हती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार? “राज, थांब,…

Read More

स्वयंपाक बनवताना गृहिणी आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टिप्स देत आहोत. पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय आठवा अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः । तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥14॥ मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥15॥ जे विषयांसि तीळांजळी देऊनि । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥124॥ परि भोगितया नाराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां । तेथ चक्षुरादिकां । कवण पाडू ॥125॥ ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजसी लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासिती ॥126॥ तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी ॥127॥ पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंतीं धांवां गा धांवां म्हणे ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस यशाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. वडिलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. कोणतेही काम संयमाने करा. जोखीम घेण्याचे टाळा, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थिती चांगली राहील. वृषभ – आजचा दिवस आनंददायी असेल. कौटुंबिक जीवन अधिक चांगले असेल. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. तरीही उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाची परिस्थिती मजबूत होईल. मिथुन – आजचा दिवस फायदेशीर असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. कष्टाचे फळ…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… ‘माणूस एक माती’ नावाच्या एका मराठी सिनेमात मी काम केलं. त्यात सिद्धार्थ जाधवने माझ्या मुलाची भूमिका केली होती. गणेश यादव, स्वप्निल राजशेखर, रुचिता जाधव आणि बरेच मातब्बर कलाकार होते. साधीच कथा होती. सिनेमा खूप छान झाला होता. फार चालला नाही, पण ज्यांनी ज्यांनी बघितला त्या प्रत्येकाचं मत होतं की, सिनेमा छान झालाय. माझं काम पण मस्त झालंय. ऐकून एकदम खूश व्हायला होत होतं. सिनेमा कौटुंबिक होता. सिनेमागृहात रडारड होतच होती… सिनेमाचा प्रीमियर होता. सगळी टीम, पाहुणे, मोठ-मोठे कलाकार हजर होते. त्यात एक नुकताच प्रसिद्ध झालेला पब्लिकचा लाडका ॲक्टर सपत्नीक हजर होता.…

Read More

ॲड. कृष्णा पाटील भाग – 1 तुम्हाला खरं सांगू का? माणसाची नियत कधी बदलेल काही सुद्धा सांगता येत नाही. तुम्ही कितीही विश्वासाने व्यवहार करा, तुम्ही कितीही त्याला प्रेमाने सांभाळा किंवा तुम्ही कितीही त्याला जीव लावा, एकदा का नियत बदलली की, या गोष्टीला काही एक अर्थ राहात नाही. आपण मात्र डोक्याला हात लावून बसतो. मी त्याच्यासाठी इतके केले. मी कदाचित माझ्या बायका-पोरांसाठी सुद्धा इतके केले नव्हते. पण याची ओळख तो विसरला. मग आपणच पश्चाताप करून घ्यायचा. आपणच आपला बीपी वाढवून घ्यायचा. आपणच आपल्याला शुगर सारखा आजार लावून घ्यायचा. माझे मित्र प्रशांत याला भेटायला जाताना मी हाच विचार करीत होतो. शेजारी ड्रायव्हर…

Read More