Author: Team Avaantar

पराग गोडबोले शनी वक्री असला की, काय होतं याची अनुभूती मी नुकतीच घेतली. असाच रविवारचा दिवस होता. दिवाळी नुकतीच संपली होती. गोडधोड, तेलकट, तुपकट, सगळं मनसोक्त हादडून झालं आणि मग बायकोने फर्मान काढलं. आता पुढचे पंधरा दिवस पोळी, भाजी आणि वरण-भात याशिवाय घरात काहीही शिजणार नाही. खूप पुरवले चोचले जिभेचे, आता सात्विक खा जरा! होय महाराजा, म्हणून मान तुकविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच माझ्याकडे, तरी मी एक क्षीण असा प्रयत्न करून बघितला, पण तिचा नन्नाचा पाढा… मी हताश. रविवार असूनही हे असं? किती तो अन्याय… मी म्हणालो, “काही नाही तर, मस्त आमटी तरी कर की! निदान चरचरीत आमटी-भात तरी खाईन म्हणतोय…”…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसें भक्ती । म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती । तऱ्ही स्वीकाराल कीं ॥14॥ बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी ॥15॥ तैसा मी जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसे बाळमती । तरी तुम्हीं तोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥16॥ आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥17॥ अहो तान्हयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥18॥ म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें ।…

Read More

दर्शन कुलकर्णी गुरू प्रतिपदा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुम्हाला उर्जावान बनवून आत्मविश्वास देणारा आहे ज्यामुळे यशाचा मार्ग खुला होईल. आयुष्यातील उद्देशाबाबत नवी भावना निर्माण होईल. जोखीम घेऊन या उर्जेचा तुमच्या फायद्यासाठी वापर करा. याद्वारे तुम्हाला ध्येयांच्या जवळ जाता येईल. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यामुळे आजच्या दिवसात अशक्य कामेही शक्य होतील. वृषभ – खुल्या मनाने नवीन बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल. तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणे आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यास घाबरू नका. यामुळे तुम्हाला कारकिर्दीत पुढे जाण्यास मदत होईल. आज तुम्हाला अनपेक्षित उत्पन्न मिळेल किंवा एखाद्या फायदेशीर…

Read More

सुधीर करंदीकर गेल्या आठवड्यात प्रभात रोडला बायकोच्या दातांचं दुखणं दाखवायला डेंटिस्टकडे जात होतो. सकाळचे 9-9.30 वाजले असतील. हिवाळा असल्यामुळे, चांगलीच थंडी होती. स्कूटरवर जायचं, म्हणून आम्ही स्कार्फ – स्वेटर अशा तयारीनीच निघालो होतो. सध्या रस्त्यावर ट्रॅफिक इतके फास्ट असते की, बाजूने कोण जातोय, समोरने कोण येतोय, हे बघताच येत नाही आणि बायको मागे बसलेली असेल, तर ‘काही बघण्यासारखं असलं, तरी ते बघता येत नाही’ किंवा ‘मी काहीच बघत नाही’, असंच दाखवावं लागतं. लाल सिग्नल लागल्यामुळे ट्रॅफिक स्लो झालं. एक बाइक थांबली अन् मी पण बाजूलाच थांबलो. बाइकवरील माणसाच्या समोर त्यांचा मुलगा बसला होता. तो कपड्यांमध्ये पूर्ण पॅक होता. फुल पॅन्ट,…

Read More

शोभा भडके भाग – 12 शिव आणि आराधना आंब्याच्या झाडाखाली आले होते. झाडाखाली एक बाज टाकलेली होती. त्यावर शिव बसला तर, आरू तिथेच शेजारी अवघडून उभी होती… तिने हिम्मत करून, “त्याच्याशी बोलायचं आहे, तेही एकट्यात!” असं बोलली तर होती. तसंही तिचा स्वभाव तसाच होता, मनात आलं ते बोलून मोकळी व्हायची… यावेळी तिने तेच केलं होतं. तिला अपेक्षित अशी सगळ्यांची रिॲक्शन बघायला मिळाली होती… आईने तर डोळ्यांनीच दटावलं होतं… बाकीचे लोक पण तिच्या तोंडाकडे पाहू लागले होते. आजपर्यंत गावात कुठल्याच मुलीने असं डायरेक्ट सगळ्यांसमोर मुलाशी एकट्यात बोलायचंय, हे म्हणण्याची हिम्मत केली नव्हती. शिव बाजेवर बसून तिच्याकडेच पाहात होता. तिला एवढं शांत…

Read More

माधवी जोशी माहुलकर तूप, साखर किंवा गूळ न वापरता हे खारीक – खोबऱ्याचे पौष्टिक लाडू करता येतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकतात. माझी मुलं 24-25 वर्षांची झाली तरी त्यांना हे लाडू आवडतात. पौष्टिक असल्याने लहान मुलांना सकाळी दुधासोबत हा एक लाडू दिला तर, ते त्यांच्या चांगलेच अंगी लागेल. डिंकाच्या लाडवासारखे हे लाडू फक्त हिवाळ्यातच करायला हवे असे काही नाही, बाराही महिने हे खारीक – खोबऱ्याचे लाडू करता येतात. महागड्या प्रोटिन पावडरचे डबे खरेदी करण्यापेक्षा हा लाडू शरीरात ऊर्जा तर निर्माण करतोच, शिवाय तुमचे आरोग्यही उत्तम ठेवतो. साहित्य हेही वाचा – Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!…

Read More

मेष या आठवड्यात सगळी कामे वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. काम करवून घेताना वाद होण्याची शक्यता आहे, तथापि, कामासाठी सहकार्य मिळेल. व्यावसायिक वर्गाचे हाताखालच्या लोकांशी वाद होऊ शकतात. बोलताना आवाज वाढवावा लागेल, स्वतःचे वर्चस्व सिद्ध करावे लागेल. महिलांना घरात नजीकचे लोक भेटायला येतील; आनंदी राहाल. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट पूर्ण करता येईल. मित्र–मैत्रिणी मदत करतील आणि तुम्हीही इतरांना मदत कराल. वृषभ या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. आराम करा. नोकरदारांनी कामाचा जास्त ताण घेऊ नये. शक्य तेवढे काम पूर्ण करून विश्रांती घ्या. सहकारी मदत करतील. व्यावसायिक वर्गाकडे नवीन प्रस्ताव येतील. त्यांचा नीट अभ्यास करून तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा.…

Read More

अध्याय नववा तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होइजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥1॥ परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥2॥ कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ॥3॥ तुमचेया दिठिवेयाचिये वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥4॥ प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावों लाहों । येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ॥5॥ नातरी बालक बोबडां…

Read More

दर्शन कुलकर्णी माघस्नान समाप्ती पौर्णिमा समाप्ती – उत्तर रात्री 03:38 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – कडकलक्ष्मी… समाजातील एक अभागिनी! दिनविशेष मराठी कोशसाहित्यकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव टीम अवांतर महाराष्ट्रातील व्यासंगी प्राच्यविद्यापंडित आणि मराठी कोशसाहित्यकार म्हणून ओळख असणाऱ्या सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1894 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या पुणे येथील संस्कृत पाठशाळेमध्ये झाले. पुढे डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची 1921 मध्ये नियुक्ती झाली. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी 1928 साली संपूर्ण ऋक्‌संहितेचे मराठी भाषांतर पहिल्यांदाच प्रकाशित केले. भारतीय चरित्रकोश मंडळ या…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ माणूस म्हटलं की, वर्तनातील बदल हे आलेच. मुलांच्या वर्तनातील बदल, हा चिंतेचा विषय असतो; कारण त्याची जबाबदारी पालकांवर असते. मुलांच्या वर्तनातील बदल हा खूप पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे, आता फक्त त्याबाबत जागृती झाली आहे इतकंच! लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत, प्रत्येक वयोगटात वर्तनातील बदल वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. काही बदल हे वयाशी संबंधित असतात, तर काही बदलांकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे असते. हे बदल वेळीच ओळखल्यास योग्य काळजी आणि मार्गदर्शनामुळे मुलांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते. वर्तनातील बदल म्हणजे काय? मुलांच्या नेहमीच्या सवयी, भावनिक प्रतिक्रिया, बोलण्याची पद्धत, झोप, खाणे, अभ्यास किंवा इतरांशी वागण्यामध्ये…

Read More