Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नमस्कार, मी हर्षा गुप्ते अभिनेत्री आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषांमधून काम करत आलेय. 41 वर्षं झाली या क्षेत्रात. बरंच काही घडलं… घडलं नाही… त्यापैकी काही सगळ्यांसोबत शेअर करावंस वाटतंय… 1984पासून नाटकात काम करायला सुरुवात केली. मराठी नाटकं म्हणजे दौरे आले. 10-15 दिवस सहज घराबाहेर राहायला लागायचं. मी आणि इतर बाकीच्या स्त्री कलाकारांना आलेला एक अनुभव… प्रवासात किंवा आऊट-डोअर शूटच्या वेळी स्वच्छ वॉशरूमची सोय नसणे! त्यावर पाणी कमी पिणे किंवा न पिणे हाच उपाय असायचा; जेणेकरून वॉशरूमला जायची गरज लागू नये. वयाने तरुण होते, त्यामुळे या सगळ्यात त्यावेळी शरीराने साथ दिली. पण आता तो सगळा प्रकार अंगाशी येऊ…
मोहिनी घारपुरे देशमुख दररोजची तीच सकाळ, तोच तो दिनक्रम आणि जगाच्या रहाटगाडग्यात अडकलेले आपण सगळेच पोटार्थी… पण असे असले तरीही हीच सकाळ काही जणांसाठी गेली सहा वर्षं अतिशय आनंदाची ठरतेय. याचं कारण आहे, WhatsAppच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला एक आगळावेगळा उपक्रम. मी सुरू केलेला ‘मोहिनी अंताक्षरी’ हा WhatsApp ग्रुप गेली सहा वर्ष सक्रिय आहे. स्वतःची गाण्याची आवड अस्वस्थ करत होती. गायनाच्या क्षेत्रात काही निराळं करावं या हेतूने ही कल्पना सुचली. सुरुवातीला काही ओळखीच्या गानप्रेमींना समुहात सहभागी केले आणि माझ्या या ग्रुपची ‘मोहिनी अंताक्षरी’ नावाने सुरुवात केली. आजवर अनेक सदस्य ग्रुपमध्ये आनंदाने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सदस्याच्या परिचयातूनही काही सदस्यांना वेळोवेळी…
आराधना जोशी साधारणपणे 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली मी दहावीची परीक्षा दिली. शाळा विलेपार्ले येथे होती आणि मला सेंटर आलं होतं दादरला (कारण त्यावेळी रहायला तिथे होतो). पप्पा पोहोचवायला तर, आई घ्यायला येणार, अशी व्यवस्था करण्यात आली. पहिल्या पेपरला जाण्याची तयारी केली, सगळ्या गोष्टी नीट घेतल्या की नाही, याची पालकांकडून चौकशी झाली आणि अचानक पप्पांनी सांगितलं की, बरोबर एकही पुस्तक किंवा गाइड घ्यायचं नाही. मी आधीच टेन्शनमध्ये होते, त्यात हे असं फर्मान काढल्यावर तर, माझं अवसानच गळालं. पण पप्पा त्यांच्या मतावर ठाम होते. त्याचं कारण सांगताना ते म्हणाले, एक संपूर्ण वर्ष तुला याचा अभ्यास करायला मिळालं. तो अभ्यास तू नीट…
मंदार अनंत पाटील तसे बघायला गेले तर, आमच्या घरात कोणालाच पाळीव प्राणी फारसे आवडत नसत. माझ्या मोठ्या भावाला तर कुत्रा अजिबात आवडत नाही. मीच एक प्राणी, पक्षीप्रेमी आहे. अगदी शाळेपासूनच मुक्या जीवांबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. माझ्या प्राणीप्रेमातूनच वन-रुम किचनच्या छोटेखानी घरात पहिले दाखल झाले ते मासे… हनुमान रोडवर मराठे नावाचे एक गृहस्थ घरातूनच गोड्या पाण्यातले मासे विकत असत. त्यांच्याशी विचारविनमय करून आणि व्यवस्थित माहिती घेऊन एक फुटाचा टँक घरी आणला. नवशिका असल्यामुळे सुरुवातीला रंगेबिरंगी गप्पी जातीचे मासे आणले. मराठे काका माशांबरोबरच पक्ष्यांचीही विक्री करत होते. म्हणून हळूहळू माझा कल पक्षी पाळण्याकडे जाऊ लागला. पण घरात फारशी जागा नसल्याने मनाला…
मंदार अनंत पाटील माझे प्राणीप्रेम कधी सुरू झाले ते कळलेच नाही. तसे बघायला गेले तर, आमच्या घरात कोणालाच पाळीव प्राणी फारसे आवडत नसत. आईचा जन्म चौल, रेवदंडा इथला आणि तिथे घराबाहेर कुत्री-मांजरं, बैल होते; पण ते कधी घरात नाही आले. बैलांची देखभाल करायला चांगू नावाचा गडी होता. वडिलांचा जन्म दादरचा. त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली होती. बाबांचे बालपण दादरमध्ये चाळीतच गेले. तिथे प्राणी पाळणे शक्यच नव्हते. माझ्या मोठ्या भावाला तर कुत्रा अजिबात आवडत नाही. मीच एक प्राणी, पक्षीप्रेमी होतो. अगदी शाळेपासूनच मुक्या जीवांबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. येता-जाता कुठेही कुत्र्याचे पिल्लू दिसले तर माझी पावले आपोआप वळत आणि मग त्यांना…
मनोज आज मी गाण्याबद्दल सांगणार आहे. मला संगीतातलं काही कळतं का? तर नाही! कानांना गोड लागणारं संगीत, भावपूर्ण तसंच अर्थपूर्ण गीत अन् सुमधुर आवाज… बस् इतकेच निकष! मला एवढंच कळतं. त्यात आणखी सांगायचं झालं तर, ‘वा, मस्त’ असं सहजरीत्या तोंडातून निघेल, असं सादरीकरण. मी सांगतोय ते जुन्या चित्रपटगीतांबद्दल अन् गायकांबद्दल! काही नव्या कथित गायकांबद्दल ‘मी का’ बोलू? याचा संदर्भ एवढाच की, 2015 सालच्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील ‘गल्लन गुडियाँ’ या गाण्याबद्दल ऑफिसमधील सहकाऱ्यांशी बोलत होतो. हे गाणं ‘वन टेक’मध्ये ‘शूट’ केलंय. नंतर मी इंटरनेटवर सर्च केलं की, असं ‘वन टेक’मध्ये चित्रित झालेलं पहिलं गाणं कोणतं? ‘आराधना’ चित्रपटातील ‘रुप तेरा मस्ताना…’…
आराधना जोशी अमिताभ बच्चन. सिर्फ नाम ही काफी है. शतकातील महानायक. अमितजींची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते ‘जलसा’ या त्यांच्या बंगल्याबाहेर कायम जमलेले असतात. ज्यांना त्यांचं दर्शन होतं त्यांना प्रत्यक्ष देवच भेटल्याचा आनंद होतो. अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्षात पाहण्याचा योग मला मिळाला तो साधारणपणे 1999 साली. हिंदीतील ज्युबिली कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र कुमार यांचे निधन झाल्यावर मी त्यांच्या निधनाची बातमी कव्हर करायला त्यांच्या बंगल्यावर गेले होते. तिथे अंत्यदर्शनासाठी इतर कलाकारांबरोबर अमिताभ बच्चन, जया आणि अभिषेकसह आले होते. चॅनलच्या कॅमेऱ्यांसमोर येऊन अमितजींनी श्रद्धांजली वाहताना राजेंद्र कुमार यांच्याबरोबरच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर 2000 साली वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलच्या आयव्हीएफ सेंटरच्या…
कविता पाटील अचानक कानावर आलेला हसण्याचा आवाज तिला वेगळाच वाटला. मान उचलून तिने सहज वर पाहिले असता, वय वर्षं 50 असलेला तो पुरुष चक्क लाजत हसत होता. त्याक्षणी त्याच्या डोळ्यामध्ये असलेली चमक ओळखीची वाटत होती. काहीसे बावरून, गोंधळून तिने शेजारी पाहिले तर 30-32 वर्षांची ती तरुणी त्या पुरुषाकडे टक लावून पाहात असल्याचे तिला दिसले. त्या दोघींची नजरानजर होताच, त्या तरुणीचा चेहरा उतरला. तिच्या आतून एक अनामिक भीतीची लहर वेगाने दौडत गेली. खूप अस्वस्थ वाटू लागले. थरथरत्या हाताने तिने पर्समधून पाणी काढून दोन घोट घेतले. विचारायचे म्हणून त्या दोघांना तिने पाणी पिणार का? असे विचारले. पण प्रश्नात जशी औपचारिकता होती तशी…
मानसी देशपांडे “धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे…” प्रत्येक मुलीच्या वडिलांना ही ओळ ऐकताना डोळे पाणावत असतील. कन्यादानाचा क्षण म्हणजे वडिलांच्या डोळ्यासमोर मुलीचे बालपण आणणारा क्षण असतो. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी यावर एक विचार मांडला आहे, “पिता आणि पती, एक रेघ आणि वेलांटी इकडची तिकडे. तरीही वाटतं, पती होणाऱ्या पुरुषाला पिता होणे जमेल का? कन्यादान करताना प्रत्येक पिता हा मुका का होत असावा? कदाचित तो जावयाला सांगू शकत नसेल की बाबा रे, माझ्या मुलीचा तू पतीच आहेस पण तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का?” किती हृदयस्पर्शी विचार आहे ना!! आपल्याकडे नवदाम्पत्याला लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणतात, मुलगी ही तुमची…
दिप्ती चौधरी मांजरीविषयी अनेकांच्या मनात समज-गैरसमज, काही प्रश्न असतात. म्हणूनच त्यांच्याबाबत काहीतरी माहिती मिळावी यासाठी मी माझी कहाणी सांगतो. कारण बहुदा आम्ही दोघं सर्वात जास्त प्रवास केलेले माऊ असू. मुंबईहून बंगलोर आणि तिथून आता आम्ही अमेरिकेत आलो आहोत. केल्याने देशाटन…. या उक्तीप्रमाणे आम्ही आता हुशार वगैरे झालो आहोत आणि आमच्या आई, पप्पा आणि दिदी यांनाही हुशार करून सोडले आहे! तर मी आणि दनू मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये राहत होतो. आमच्या पिढ्या न पिढ्या इथेच मिळेल ते शोधून जगत होत्या. कोणी कधी उरलंसुरलं फेकले तर, तोच आमचा उदरनिर्वाह होता. आमची आजी ही महा खट मांजर होती. तिने दुधाच्या पिशव्या फोडण्याचे कसब आत्मसात…

