Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
उमा सुहास काळे आजकाल नात्यांमधील ओढ कमी होत चालली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. उलट, अनेक नात्यांमध्ये एक विचित्र मालकीची भावना दिसून येते. “तो माझाच आहे”, “तो, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही”, “मी त्यांच्यासाठी खूप केलं आहे, म्हणून त्यांनी माझे ऐकलच पाहिजे!” — अशी वाक्यं ऐकायला मिळतात. पण हे खरंच प्रेम आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. माणसं आपली आहेत, याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रत्येकवेळी आपल्याच अपेक्षा पूर्ण कराव्यात. प्रेम हे मोकळं असावं लागतं. स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या अस्तित्वाने जगू देणारे असते, हे आपण सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे त्याला आपल्या ताब्यात ठेवणं नव्हे, तर त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं.…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 9 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 30 मे 2025 वार : शुक्रवार तिथि : चतुर्थी 21:22 नक्षत्र : पुनर्वसु 21:28 योग : गंड 12:56 करण : वणिज 10:14 सूर्य : वृषभ चंद्र : मिथुन 15:42 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा जन्म 30 मे…
अजित गोगटे काल (29 मे 2025) मी ‘आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ’ या शीर्षकाच्या लिखाणाने माझी वडिलांकडील आजी आणि तिच्या भाटिया हॉस्पिटलमधील आजोळाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. आजचे माझे स्मृतिरंजन माझ्या दुसऱ्या म्हणजे आईकडील आजोळासंबंधी आहे. माझ्या या दोन आजोळांमध्ये कमालीचा विरोधाभास होता. मुंबईच्या आजीकडचे आजोळ संपूर्ण शहरी राहणीमानाचे आणि आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असे होते. याउलट, आईकडील आजोळ म्हणजे जेथे वीज नाही आणि नऊ मैल पायी जाण्याशिवाय पर्याय नाही, असे तळ कोकणातील एक दुर्गम परंतु नितांत सुंदर खेडेगाव. मात्र हा विरोधाभास केवळ भौतिक गोष्टींपुरताच मर्यादित होता. दोन्ही आजोळी ‘दुधावरच्या साई’ला म्हणजे आम्हा नातवंडांना तेवढेच नितांत, निखळ प्रेम मिळायचे. माझे हे दुसरे…
अजित गोगटे माझ्या वयाच्या म्हणजे सत्तरीकडे झुकलेल्या कोणाच्याही बालपणीच्या स्मृतिरंजनात ‘आजी’ हा अविभाज्य घटक असणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी लहान असताना मांडीवर घेऊन झोपविताना आणि थोडे मोठे झाल्यावर आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपताना, तिने सांगितलेल्या रामायण-महाभारतामधील गोष्टी, चातुर्मासातील विविध कहाण्या आणि असंख्य श्लोक तसेच स्तोत्रे हे बालपणीच्या कौटुंबिक संस्कारांचे मोठे संचित असते. माझ्याही बालपणात ‘आजी’ हा एक प्रभावी घटक नक्कीच होता, पण इतरांसारखे माझ्या वाट्याला मात्र आजीकडून हे संस्काराचे संचित आले नाही. हिंदीमध्ये वडिलांच्या आई-वडिलांना ‘दादी’ आणि ‘दादा’ तसेच आईच्या आई-वडिलांना ‘नानी’ आणि ‘नाना’ असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आजोळ म्हटले की ‘ननिहाल’ असे गृहित धरले जाते. मराठीत मात्र…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 8 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 29 मे 2025 वार : गुरुवार तिथि : तृतीया 23:18 नक्षत्र : आर्द्रा 22:38 योग : शूल 15:46 करण : तैतील 12:32 सूर्य : वृषभ चंद्र : मिथुन सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 महाराणा प्रताप जयंती (तिथीनुसार) रंभा व्रत वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 7 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 28 मे 2025 वार : बुधवार तिथि : द्वितीया 25:54 नक्षत्र : मृगशीर्ष 24:29 योग : धृती 19:08 करण : बालव 15:25 सूर्य : वृषभ चंद्र : वृषभ 13:36 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:10 पक्ष : शुक्ल पक्ष मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त,…
चंद्रशेखर माधव मध्यान्ह उलटून बराच वेळ झाला होता. नदीकाठी वाळवंटात एक लहान मुलगी एकटीच, एकटक वाहत्या पाण्याकडे पाहात बसली होती, विमनस्क अवस्थेत. किती वेळ बसली होती कुणास ठाऊक! कदाचित, तिलाही माहीत नव्हतं. अशाच एकटेपणात अजून थोडा वेळ गेला. दुपार सरता-सरता अचानकच कुठूनशी एक नाव आली. लांबूनच नावाड्याने त्या मुलीला पाहिले आणि नाव किनाऱ्याच्या दिशेने वळवली. ती मुलगीही उठून नदीकाठाकडे धावत गेली. “मलाही घेऊन चला. मला यायचं आहे तुमच्याबरोबर…” नावाड्याला ती म्हणाली. “कुठे जायचं आहे तुला?” त्याने विचारलं. “नाही माहीत, पण मला इथे नाही थांबायचं!” ती म्हणाली. नावाडी क्षणभर विचारात पडला अन् म्हणाला, “ठीक आहे, बस.” तो असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 6 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 27 मे 2025 वार : मंगळवार तिथि : अमावस्या 08:32 नक्षत्र : रोहिणी 26:50 योग : सुकर्मा 22:54 करण : किंस्तुघ्न 18:46 सूर्य : वृषभ चंद्र : वृषभ सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:10 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 गंगा दशहरा प्रारंभ ज्येष्ठ मास आरंभ 08.32 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते आणि स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचे निर्माते पंडित जवाहरलाल…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) अनेकदा राजकीय पक्षांच्या वादात आपण एखाद्याची नार्को टेस्ट करावी, असा उल्लेख ऐकतो, वाचतो. याच पॉलीग्राफ आणि Narco Analysis Test बद्दल थोडी प्राथमिक माहिती आज पाहुया. आरोपी पकडल्यावर त्याच्याकडे पुरावे शोधण्याच्या चौकशीत पोलिसांच्या कुप्रसिद्ध थर्ड डिग्री मेथडला पर्याय म्हणून या टेस्ट योग्य ठरतात; मात्र कायद्यानेही या टेस्टना मर्यादा आहेत. यात मुख्य तीन प्रकारच्या टेस्ट असतात – Polygraph test Narco analysis Brain Electro Oscillatory Signature Profile यातील नार्को ॲनलिसीस टेस्ट ही वैद्यकीय देखरेखीखालीच पार पडते; कारण यात व्यक्तीच्या शरीरात सोडियम पेंटोथल नावाचे नार्कोटिक ड्रग टोचतात. या ड्रगचा मेंदूवर परिणाम झाला की, ती व्यक्ती…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 5 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 26 मे 2025 वार : सोमवार तिथि : चतुर्दशी 12:12 नक्षत्र : भरणी 08:23 योग : शोभन 07:01 करण : चतुष्पाद 22:22 सूर्य : वृषभ चंद्र : मेष 13:41 सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:10 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 दर्श अमावस्या सोमवती अमावस्या शनैश्चर जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी श्रेष्ठ नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांचा…

