Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
पराग गोडबोले भाग – 1 बाबा, थांबा जरा आलेच. भराभर रस्ता ओलांडून समोरच्या दुकानात गेली लेक आणि हातात गुलाबी रंगाचा पुडा मिरवीत आली. मला म्हणाली, “पॅड संपले होते… घेऊन आलेय, ठेवा पिशवीत.” मी बघतच राहिलो कौतुकाने… किती बदललंय जग!! दृश्य दुसरे, चित्रपटगृह. सायकलवर बसून एका माणसाला धुम्रपानाचे धोके आणि सॅनिटरी पॅडचे फायदे समजावून सांगणारा अक्षय कुमार. पूर्वी अत्यंत खासगी समजल्या जाणाऱ्या विषयावर जाहीर उद्बोधन… किती बदललंय जग!! आज एक पुरुष समाजमाध्यमावर या विषयावर लिहू पाहतोय आणि तेही निःसंकोचपणे हेही परिवर्तनच. किती बदललंय जग! थोडंसं मागे जाऊ. 1977-78 साल…. जॉन्सन अँड जॉन्सनने नव्यानेच पॅड्स भारतात आणले होते आणि त्याच्या विपणनाची म्हणजे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 जुलै 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 30 आषाढ शके 1947; तिथि : एकादशी 09:39; नक्षत्र : रोहिणी 21:07 योग : वृद्धी 18:38; करण : कौलव 20:22 सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 कामिका एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. त्याचे खुल्या मनाने आणि उत्साहाने स्वागत करा. साहस आणि…
डॉ. किशोर महाबळ विधि महाविद्यालयाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. काही दिवसांतच एका प्राध्यापकाच्या (Professor) लक्षात आले की, पहिल्या वर्षाचा एक नियमित असणारा विद्यार्थी कोणत्याही चर्चेत सहभागी व्हायला नाखूष असतो किंवा प्रश्नांची उत्तरे देणेही टाळतो. एके दिवशी तो खूप घाबरलेला आणि सतत कशाची तरी भीती वाटत असल्यासारखा दिसत होता. खरंतर, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच ही गोष्ट लक्षात आली होती, मात्र त्यामागचं कारण कोणीही त्याला विचारलं नाही. त्या प्राध्यापकाच्याही ते लक्षात आलं आणि त्याला त्यांनी कारण विचारलं. आधी काहीच बोलायला तयार नसलेला तो विद्यार्थी खूप समजावल्यानंतर म्हणाला, “सर, मला वाटतं की, मी वार्षिक परीक्षेत नापास होणार आहे.” त्याचं हे उत्तर ऐकून…
सुहास गोखले श्रावण महिना सुरू झाला की, सणांची रांगच लागते. बाजारात विविध भाज्यांची रेलचेल असते, त्यामुळे अनेक वेगवेगळे पदार्थ केले जातात. एक चांगला, सर्व गुणसंपन्न पोलीस अधिकारी हाही एक प्रयत्नपूर्वक आणि वेळ घेऊन तयार झालेला पदार्थ आहे. त्यातही व्हेज आणि नॉन व्हेज अशा व्हरायटीज असू शकतात. श्रावण महिना सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिक, कर्तबगार (शाकाहारी) पोलीस अधिकारी बनवण्याची कृती पाहूया. साहित्य : पोलीस या शब्दाचे स्पेलिंग लक्षात ठेवले की, सगळे ingredients लक्षात राहतील. Politeness (नम्रता), Obedience (आज्ञाधारक), Loyalty (ईमानदारी), Intelligence (हुशारी) किंवा Inquisitiveness (चौकसपणा), Compassion (दयाळू) आणि Enthusiasm (उत्साह) हे या रेसिपीचे मुख्य घटक आहेत. कृती : हे सगळे पदार्थ…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष राशी या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेवाईक किंवा मित्रांनी उधार घेतलेले पैसे परत मिळतील. या आठवड्यात मनाप्रमाणे खर्च करू शकाल, पण खर्चाचे नियोजन करा. ज्येष्ठ्यांच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन आव्हानात्मक जबाबदारीची कामे मिळण्याची शक्यता आहे. अमावस्येच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. महिलांना भावंडसौख्य मिळेल. भाऊ, बहिणीबरोबर छान वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षी रहावे, नव्या संधीचे सोने करू शकाल. वृषभ राशी या आठवड्यात कामाचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे. नवीन जबाबदारी आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल, मात्र स्वतः लक्ष देण गरजेचे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. चिडचिड होऊ शकते.…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 जुलै 2025; वार : रविवार भारतीय सौर : 29 आषाढ शके 1947; तिथि : दशमी 12:13; नक्षत्र : कृत्तिका 22:53 योग : गंड 21:47; करण : बव 22:56 सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गायिका गीता दत्त टीम अवांतर अल्पायुषी जीवनात आपल्या मधाळ आवाजाने हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गीता घोष रॉय चौधरी अर्थात गीता दत्त यांचा…
डॉ. प्रिया गुमास्ते मागील भागात आपण आयुर्वेद (Ayurveda) ऋतुचर्या म्हणजे काय, हे समजून घेतले. आता ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायचे आणि ते का करायचे, ते पाहू. सूर्याच्या स्थितीनुसार वर्षाचे दोन भाग (काल) केले जातात. आदान काल (उत्तरायण) आणि विसर्ग काल (दक्षिणायन). आदान म्हणजे शोषणे किंवा काढून घेणे आणि विसर्ग म्हणजे देणे. आदान काळ आदान काळ म्हणजे सूर्याचा उत्तरायण काळ. सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे सरकतो. आदान काळात, शिशिर (Winter), वसंत (Spring) आणि ग्रीष्म (Summer) या तीन ऋतूंचा समावेश होतो. तत्र रविर्भाभिरादानो जगतः स्नेहं वायवस्तीवृक्षाश्चोपशोषयन्तः शिशिरवसन्तग्रीष्मेषुक्रमं रौक्ष्यमुत्पादयन्तो रुक्षां रसांस्तिकषायकटंशचाभिवर्धयन्तो नृणां दौर्बल्यमावहन्ति ||6|| अर्थ : आदानकालात सूर्य त्याच्या उष्ण किरणांसह वातावरणातील…
रविंद्र परांजपे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची त्यात भर पडलेली आहे. आपले आरोग्य निरामय रहायला हवे, असे प्रत्येकालाच वाटत असते. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. आता आपण निरामय आरोग्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊ या. शरीराची कोणतीही तक्रार नसणे किंवा आजारी नसणे म्हणजे चांगले आरोग्य असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. वास्तविक, आयुर्वेदाने स्वस्थ आरोग्याची समर्पक शब्दांत व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, स्वस्थ आरोग्याची सोप्या…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 जुलै 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 28 आषाढ शके 1947; तिथि : नवमी 14:42; नक्षत्र : भरणी 24:37 योग : शूल 24:54; करण : वणिज 25:28 सूर्य : कर्क; चंद्र : मेष 30:11; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. नोकरदारांना काही कामे करवून घेण्यासाठी संयम आणि हुशारी दाखवावी लागेल.…
लीना जोशी परुळेकर लेखाच्या या भागात आपण कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरावीत, हे पाहणार आहोत. त्याआधी आपण आपल्या त्वचेचा pH म्हणजे काय ते पाहू. pH ची माहिती अशासाठी गरजेची आहे की, कोणत्या प्रकारची उत्पादने कोणत्या प्रकारच्या त्वचेवर वापरल्यानंतर त्वचेच्या pH चा समतोल राखला जातो, हे कळावे म्हणून. pH Scale ही 0 ते 14 या rangeमध्ये असते. त्यात 7 ही neutral (समतोल) range असते. 7 पेक्षा कमी range असेल तर ते acid मानले जाते आणि 7 पेक्षा जास्त range असेल तर ते alkali किंवा non-acid मानले जाते. आपल्या त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती नैसर्गिकरित्या acidic असते, तिची pH range ही 4.5…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

