Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसें चेष्टे सूत्राधीन | दारुयंत्र ।।81।। तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ।।82।। तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हें तुज बोलावें नलगे कांहीं ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 10 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी अहोरात्र; नक्षत्र : स्वाती 27:39 योग : शुभ 29:29; करण : विष्टी 18:09 सूर्य : कर्क; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दुर्गाष्टमी जरा जिवंतिका पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. एखादे काम बराच काळ प्रलंबित असेल तर ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे मानसिक…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो की, एक ॲक्टर म्हणून तुम्ही इमोशनल सीनमध्ये कसे काय रडता? होय, सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट… डोळ्यात ग्लिसरीन घातलं की, येतं डोळ्यात पाणी. माझा मात्र प्रॉब्लेम व्हायचा. डोळ्यात ग्लिसरीन घातलं की, डोळ्यांची खूप आग होऊन कितीतरी वेळ डोळे उघडायचेच नाहीत. खूप त्रास व्हायचा मला आणि माझ्यामुळे बाकीच्या लोकांना सुद्धा! अशातच एका नाटकात काम करण्यासंबंधी माझ्याकडे विचारणा झाली. नाटकाचं नाव होतं, ‘मांगल्याचं लेणं’. त्या नाटकात फक्त खूप साऱ्या बायकाच होत्या. महाराष्ट्रामधले सण आणि संस्कृती हा विषय होता, त्या नाटकाचा. घरातली सगळ्यात मुख्य बाई, ‘आजी’ ही भूमिका मी करत होते.…
वेद बर्वे एखाद्या पुरुषाचा ‘इगो’ खूपच ‘फर्जाइल’ असतो, असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर आपल्या परिचयातील दुसरा एखादा पुरुष कुठल्याही बाबतीत आपल्यापेक्षा जरा उजवा आहे, हे कळलं की पहिल्या बाप्याचा इगो दुखावलाच म्हणून समजा. अनेक ठिकाणी वडील-मुलाच्या नात्यातही हाच ‘मेल इगो’ आडवा येतो. आपल्या मुलाने प्रगती करावी, आपल्यापेक्षा मोठं व्हावं, नाव कमवावं, चार पैसे जास्त कमवावेत असं एखाद्या वडिलांना आतून कितीही वाटत असलं, तरी नेमकं भांडणाच्यावेळी ‘आता दोन पैसे काय कमावायला लागलास, तर मला अक्कल शिकवणार का…’ हे वाक्य हमखास ऐकायला मिळतं. याचा अर्थ, ते वडील आपल्या मुलाचं वाईट चिंततात असं अजिबात नाही, पण एकतर त्यांचा मेल इगो थोडासा दुखावलेला असतो…
ॲड. कृष्णा पाटील भाग – 1 सगळं सामान घेऊन आशिष रेल्वे फलाटावर आला. अजून गाडी यायला दीड तास लागणार होता. एकवीस नंबरच्या फलाटावर त्याने सामान उतरवले. अवघडलेले खांदे थोडे सैल केले. “आता सोन्या-चांदीच्या दुकानात काही राम उरला नाही. मी आपला सरळ गावी जातो. गावाकडे कालव्याचे पाणी आले आहे. थोडी जमीन विकत घेऊन शेती करायला सुरुवात करतो,” तो त्याला सोडायला आलेल्या नायरला म्हणाला. हातातल्या दोन पिशव्या खाली ठेवत नायर म्हणाला, “खरं म्हणजे, इथंच दुसरा उद्योग केला असता तरी चाललं असतं. आम्ही काय महिन्याच्या महिन्याला भाडं दे असं बोललो नसतो.” एवढ्यातच रेल्वे आली. फलाटावर एकच गोंधळ उडाला. आशिषने आणि नायरने सर्व बॅगा…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ||62|| हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभु सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ।।63॥ जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 जुलै 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 09 श्रावण शके 1947; तिथि : सप्तमी 28:58; नक्षत्र : चित्रा 24:40 योग : साध्य 28:31; करण : गरज 15:47 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या 11:14; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शीतला सप्तमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला जाईल. व्यवसायाच्या बाबतीत, काही मोठ्या आणि विशेष करारांना अंतिम रूप दिले जाऊ शकते. समाजात तुमच्याबद्दचा आदर वाढेल, भौतिक…
अजित गोगटे पत्रकाराने व्यावसायिक नीतिमूल्यांचे कठोरतेने पालन न करण्याची अनेक करणे असू शकतात. पत्रकारिता हे क्षेत्रच असे आहे की, ज्यात मूल्यांशी तडजोड करण्याच्या अनिवार मोहाचे क्षण वारंवार येतात. निस्सीम आत्मनिष्ठा आणि अतूट आत्मप्रामाणिकता या जोरावरच अशा मोहांवर मात केली जाऊ शकते. कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी निरनिराळी असल्याने, कितीही मनात असले तरी, प्रत्येकाला अशी आदर्शवत पत्रकारिता करणे शक्य होत नाही. पत्रकारांना मोहात टाकून वश करण्यातच ज्यांचा निहित स्वार्थ असतो, असे विविध समाजघटक हे काम नानाप्रकारे करत असतात. पत्रकारांना सरकारी कोट्यातून घरे देणे, हा असाच एक मोहाचा राजमार्ग आहे. मुळात पत्रकारांना आणि विशेषतः नोकरदार पत्रकारांना सरकारने घरे का द्यावीत, या प्रश्नाचे…
मनोज जोशी दोनच दिवसांपूर्वी अर्धांगिनी आराधनाबरोबर सुपर मार्केटमध्ये गेलो होतो. तिनं नेहमीप्रमाणे सुरुवातीला धान्य आणि स्वयंपाकघरातील इतर सामग्री घेण्याकडे मोर्चा वळवला. मी पाठोपाठ ट्रॉली घेऊन होतोच… एक-एक वस्तू ट्रॉलीत पडत होत्या… ही खरेदी झाल्यानंतर आम्ही पॅक्ड फूडच्या सेक्शनमध्ये गेलो. अर्थात, मलाच जास्त खादडीची सवय असल्याने फटाफट एकापाठोपाठ एक पॅकेट्स ट्रॉलीत घेत चाललो होतो. त्यानंतर सेक्शन आला तो सरबतांचा! त्या सेक्शनमध्ये एवढे फ्लेवर्स आणि विविध आकाराच्या आकर्षक बाटल्या होत्या की, सर्वच घेण्याचा मोह झाला. पण काही निवडक फ्लेवरची सरबतं घेऊन बिलिंग काऊंटरवर गेलो. वास्तविक, चहा आणि सरबत हा माझा फेव्हरिट विषय म्हणा, विक पॉइंट म्हणा किंवा अन्य काहीही म्हणा…. पण घरात…
अनिता बाळकृष्ण वैरागडे माझ्या मागील लेखात प्राणायामचे प्रकार आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे बघितले होते. आता या लेखामध्ये आसन, विशेषत: पोटावर तसेच पाठीवर झोपून करायची आसने पाहणार आहोत. ही आसने शरीराला विश्रांती देतात आणि आपल्या अंतर्गत अवयवांना सशक्त बनवतात. भुजंगासन पोटावर झोपून दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवावे. नंतर दीर्घ श्वास घेऊन छाती वर उचलावी लागते. काही क्षण थांबून श्वास सोडत छाती पुन्हा जमिनीवर टेकवायची असते. याचे फायदे – पाठीचा कणा मजबूत होतो. लवचिकता वाढते आणि फुफ्फुसे मजबूत होतात. धनुरासन नावावरूनच लक्षात येते की, हे धनुष्याच्या आकाराशी संबंधित हे आसन आहे. पोटावर झोपायचे. पाय मागून वर उचलल्यावर छाती वर उचलून…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- वास्तू आणि वेध 361
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

