Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सायली कान्हेरे रात्री जेवायला काय करू? हा प्रश्न जागतिक आहे, असं मला वाटते. पटकन होणारा आणि टेस्टी लागणार पदार्थ पाहिजे असतो, पण गाडी खिचडीवर अडते. म्हणून आज टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात झटपट होणारा चविष्ट पदार्थ सांगणार आहे… तो आहे कॉर्न पुलाव (Corn Pulao)! हा भाताचाच प्रकार आहे आणि घरच्यांना नक्कीच आवडेल… साहित्य बासमती तांदूळ – 1 वाटी कॉर्न – 1 वाटी कांदा – 1 मध्यम आकाराचा टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा लसूण – 3 पाकळ्या आले – 1 इंच हिरव्या मिरच्या – 2 गरम मसाला – 2 टेबल स्पून हळद – 1/4 चमचा मीठ – चवीनुसार बटर – 2…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥41॥ एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥246॥ असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । जे उजूचि का आडळिजे । जयापरी ॥247॥ तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्य धर्मु जाय । मग आन कांही आहे । पापावांचुनि ॥248॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती । म्हणवूनि व्यभिचार घडती…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 24 श्रावण शके 1947; तिथि : सप्तमी 23:49; नक्षत्र : अश्विनी 07:35, भरणी 30:05; योग : गंड 10:16; करण : विष्टी 12:58 सूर्य : कर्क; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:06 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 जिवंतिका पूजन श्रीकृष्ण जयंती स्वातंत्र्य दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादे काम करून घेण्यासाठी गोड बोलावे लागेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.आज एखादे मोठे काम साध्य करू…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! माझ्या एका मित्राने मला एक सामाजिक जागृतीचा इव्हेन्ट आहे, तिथे गेस्ट म्हणून येशील का? असं विचारलं. मी ‘हो’ म्हटलं. बोरिवलीला नॅशनल पार्कमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होती… कशासाठी? आत्महत्यामुक्त समाजासाठी (Suicide Free society)! मागच्य लेखात मी एका मुलीच्या आत्महत्येबद्दल सांगितलं होतं. आता पुन्हा एक काय अनेक आत्महत्या माझ्यासमोर येऊन उभ्या ठाकल्या होत्या. एका मुलाने नैराश्यातून आत्महत्या केली… आठवड्याभरात त्याच्या गर्लफ्रेंडने पण आत्महत्या केली. जीव देणं म्हणजे काय गम्मत वाटते का? कधीही उठाव अन मरून जावं. 15-20 हे वय काय मरायचं असतं का? अपघाती मृत्यू, आजारी पडून आलेला मृत्यू चटकाच लावून जातो, मग हा…
मधुरा बर्वे सहसा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी किंवा मग आपल्या पाळीव प्राण्याशी आपला ऋणानुबंध जोडलेला असतो. काहीजणांचा ऋणानुबंध त्यांच्या वास्तूशी किंवा त्यांनी लावलेल्या झाडांशी, फुलांशी देखील जुळतो. मात्र कळत-नकळत माझे ऋणानुबंध जुळले ते आकाशात उंच उडणाऱ्या विमानाशी. अगदी माझ्या बालपणापासून ते आज मी वयाची साठी ओलांडेपर्यंत, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या विमानाने मला कायम साथ दिली आहे. आता कसं ते सांगते.. माझा जन्म मुंबईच्या विलेपार्ले उपनगरातला. विलेपार्ले पूर्वेला आमच्या घराच्या अगदी जवळच विमानतळ होतं. त्यामुळे साहाजिकच आकाशात उंच झेपावत जाणारं विमान पहातच मी लहानाची मोठी झाले. विमानांप्रती असलेली माझी ओढ बघून, माझे बाबा मला महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी विमानतळावर फिरायला नेत…
ॲड. कृष्णा पाटील “आपल्याला आता आपली केस थांबवायची आहे साहेब. मला काय इथून पुढं तारखेला यायचं होणार नाही. पाण्याचे दोन थेंब टाकून देवापुढं ठेवायचा म्हटलं तर रुपाया खिशात नाही. त्यामुळे मी पुढं केस चालवू शकणार नाही. आपण इथंच थांबूया.” नाटेकर वकिलांनी हातातली कागदपत्रांची फाईल बाजूला ठेवली. मान वर करून नामदेव दादांकडे आश्चर्याने पाहिले. नेहमीप्रमाणेच नामदेव दादांनी कपाळावर मोठा गंधाचा उभा नाम लावला होता. त्यावर दोन ठिकाणी अष्टगंध आणि आबिर बुक्क्याची काळी टिकली लावली होती. कानाच्या पाळीवर आणि नरड्याच्या गोटीवर एक एक चंदनाचा पिवळा टिळा लावला होता. डोक्यावर पांढरी शुभ्र परीट घडीची टोपी होती. गुळगुळीत दाढी करून तलवार कट मिशा कोरल्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला तुजसीं अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल । तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥234॥ म्हणवूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥235॥ यद्यप्यते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । कुलक्षयकृत दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥38॥ कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥39॥ हे अभिमानमदें भुलले । जरी पां संग्रामा आले । तर्ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 23 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:07; नक्षत्र : रेवती 09:05 योग : शूल 13:11; करण : गरज 15:15 सूर्य : कर्क; चंद्र : मीन 09:05; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:07 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायात एखादी मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते, ज्यामुळे नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळतील. त्याचबरोबर समाजात…
अजित गोगटे बातमीदारीसाठी बाहेरगावच्या अनेक दिवसांच्या प्रायोजित दौऱ्यावर नेण्यात येते तेव्हा, आपल्या कामाच्या स्वरूपाबद्दल डोक्यात हवा गेलेले पत्रकार, त्यांच्या वर्तनाने स्वतःसोबतच त्यांच्या व्यवसायाचीही कशी लाज घालवतात, याविषयीच्या एका घटनेसंबंधी लिहून आज मी या ‘आत्मनिंदे’च्या मालिकेला पूर्णविराम देणार आहे. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीस असताना 1990च्या दशकाच्या सुरुवातीस मी अनुभवलेला हा प्रसंग आहे. भारत सरकारच्या ‘पत्र सूचना कार्यालया’तर्फे (PIB) मुंबईतील पत्रकारांचा नाशिक जिल्ह्याचा चार दिवसांचा दौरा आयोजित केला गेला होता. विविध उद्योग-व्यवसायांना अर्थसाह्य करून नाशिक जिल्ह्याच्या विकासात कसे भरीव योगदान दिले आहे, हे दाखविण्यासाठी हा दौरा होता. नाशिक जिल्ह्याची त्यावेळी ‘लीड बँक’ असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ समन्वयक होती. एका विशेष बसने 20-22 पत्रकारांना…
सुनील शिरवाडकर गोलू आज खूप खुशीत होता. सकाळपासूनच त्याला वेध लागले होते… नाशिकला जाण्याचे. त्याच्या ‘बा’ने कबूल केले होते, यावर्षी त्याला रथयात्रा दाखवण्याचे. दुपारीच तो आणि त्याचा बा निघाले. अवघ्या तास-दोन तासाच्या अंतरावर नाशिक. ते दोघे सीबीएसला पोहोचले, तेव्हा सायंकाळचे सहा वाजत आले होते. चालत चालत ते गंगेच्या दिशेने निघाले. सात-आठ वर्षांचा गोलू आज प्रथमच नाशकात येत होता. ती गर्दी… रहदारी, वाहतुकीचे सिग्नल… बघून तो हरखून गेला. रेडक्रॉस सिग्नलपासूनच यात्रेचा माहोल जाणवायला लागला. पोलीस आजूबाजूच्या लेनस् बॅरिकेटस् टाकून बंद करत होते. चांदवडकर लेन, दहिपूल भागांतील रस्ते स्वच्छ झाडून त्यावर मोठ्या, मोठ्या रांगोळ्या काढण्याची तयारी सुरू होती. गोलू हे सगळं अनिमिष…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

