Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा येर्हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥52॥ पैं विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोर्लाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥53॥ आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरुनिया निघावें । या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥54॥ कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यत् श्रेयः स्यान्-निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 30 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 12:44; नक्षत्र : पुष्य 24:08 योग : व्यतिपात 16:13; करण : विष्टी 24:16 सूर्य : सिंह; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:02 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 बृहस्पती पूजन गुरुपुष्यामृत योग (सकाळी 06:23 पासून उत्तर रात्री 00.08 पर्यंत) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मानसिक ताणतणावापासून मुक्त असाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक खर्चाचा भविष्यावर नकारात्मक…
दत्तात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 1 सर्वसाधारणपणे 1985ची ही कथा आहे. त्यावेळी मी रेल्वेमध्ये काम करत असताना कराड रेल्वे स्टेशनला होतो. कधी कधी वेळ मिळेल तसे मी मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्याला भेट देत असे. हा दर्गा फार प्रसिद्ध आहे. तिथे बरीच लोक नवस करतात, स्वतःची गाऱ्हाणी मीरा साहेबाला सांगतात आणि मीरा साब त्यांचा नवस पूर्ण करतो, अशी एक आख्यायिका ऐकावयास मिळत होती. आपले जर काम व्हायचे असेल तर दर्ग्याच्या पाठीमागे एका भिंतीवर पैसे चिकटवून ठेवतात, पैसे जर नाही चिकटले तर काम होणार नाही, असाही समज आहे. मीरा साब म्हणजे नवनाथांपैकी एक अवतार असे मी ऐकून होतो. त्या दर्ग्यामध्ये कायमच माणसांची गर्दी…
सुनील शिरवाडकर तरुण स्वामींचं प्रवचन संपलं. काही श्रोते जवळ येऊन पाया पडू लागले. थोड्या वेळाने तीही गर्दी कमी झाली. सुरुवातीला तरुण स्वामींना खूप संकोच वाटायचा. हे असं कोणी पाया पडायला लागलं तर… पण नंतर त्याचीही सवय झाली आणि आता तर असं झालंय की, कोणी पाया पडायला आलं नाही तर, त्यांनाच चुकचुकायला होतं. तरुण स्वामींची पन्नाशी आता जवळ आली होती. बरीच वर्षे त्यांचं हे असं प्रवचन करत गावोगावी हिंडणं सुरू होतं. सध्या त्यांचा मुक्काम नाशकात होता. त्यांच्या गुरुंनी जेव्हा त्यांना नाशिकला जाण्याची आज्ञा दिली, तेव्हा त्यांचं मन जरा सैरभैर झालं. बायको… मुलगा… संसार… या सगळ्यांचा त्याग करून आता बारा वर्षे झाली.…
अनिता बाळकृष्ण वैरागडे आधीच्या लेखामध्ये काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया. ताडासन ताडाचे झाड त्याच्या उंचीकरीता प्रसिद्ध आहे. या आसनात शरीराची अंतिम स्थिती ही ताडाच्या झाडाप्रमाणे उंच भासते, म्हणूनच या आसनाला ‘ताडासन’ असे नाव आहे. दोन्ही पाय एका रेषेमध्ये जवळ घ्या. म्हणजे, दोन्ही पायांचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ करून सरळ उभे रहावे. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. आपली नजर डोळ्यासमोरील कुठल्याही काल्पनिक स्थिर बिंदूवर केंद्रित करावी. श्वास घेत हळूहळू दोन्ही हात शरीरासमोरून सरळ रेषेत डोक्याच्या वर न्यायचे. पायाच्या टाचाही त्याच लयीत जमिनीपासून वर उचलाव्यात, पायाच्या चवड्यावर उभे राहायचे. शरीर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥ हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥40॥ वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥ स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥42॥ हा कारुण्याची…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 29 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 13:58; नक्षत्र : पुनर्वसू 24:26 योग : सिद्धी 18:13; करण : गरज 25:18 सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन 18:35; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:03 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. व्यवसायासंदर्भात प्रवास करावा लागेल, त्यातून काही किरकोळ लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास प्रवासाचा बेत सध्यासाठी पुढे…
अस्मिता हवालदार अनेकांनी या कादंबरीवर लिहिले आहे. मीही एकटेपणाबद्दल लिहिताना याच कादंबरीचा उल्लेख करते. गोनीदा म्हणजेच गो. नी. दांडेकर यांच्या ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘पडघवली’, ‘दास डोंगरी राहतो’ यासारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, पण ‘माचीवरला बुधाची’ बात ही कुछ और है! कड्यावर काटकुळा मुंडासे बांधलेला बुधा उभा असल्याचे चित्र मुखपृष्ठावर आहे. कड्याच्या टोकापर्यंत आला आहे… समोर सरळसोट दरी आहे… बरोबर कुत्रा आहे… त्याने एक पाऊल पुढे टाकले की स्वर्गप्राप्तीच होणार आहे! पण त्याला फिकीर नाही. लढवय्याच्या आवेशात तो उभा आहे. समोर धबधबा कोसळतोय… पाऊस पडतोय… वीज लखाखते… जणू कादंबरीचं सार या चित्रात आहे. निसर्गाशी मैत्री, निसर्गातल्या आव्हानांचा निडर होऊन सामना करणे, त्यांच्यावर सुद्धा…
सतीश बर्वे भाग – 2 दोन्ही देवळांत छानपैकी दर्शन झालं. मन प्रसन्न झालं. अजून थोडावेळ मंदिराच्या परिसरात बसायचं होतं मला खरं. मी सौरभला तसं बोलणार इतक्यात सौरभला अचानक फोन आला. तो मला हातानेच थांब म्हणाला. पण पुढे पाच-दहा-पंधरा मिनिटं झाली तरी फोनवरचं बोलणं सुरूच होते. माझी चुळबुळ तिथल्या एका फुलांच्या स्टॉलवाल्याच्या लक्षात आली. त्याने मला खुणेनेच बोलवून तिथल्या एका खुर्चीवर बसायला सांगितले. अगदी देवासारखा धावून आला होता तो. मी त्या सुगंधी जागेजवळ जाऊन बसले ते बरंच झालं, कारण सौरभचा फोन बंद होण्याची चिन्हं दिसत नव्हती. फुलवाल्याशी गप्पा मारत असताना अचानक सावंतवाडीचा विषय निघाला आणि माझं मन बालपणात जाऊन बसले. “अरे,…
आराधना जोशी साहित्य पिवळी मूगडाळ – 1 वाटी उडदाची डाळ – 2 टेबलस्पून मीठ – चवीनुसार हिंग पावडर – पाव छोटा चमचा बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी हिरवी मिरची – 2 नग उकडून घेतलेले स्वीट कॉर्न – अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी किसलेले गाजर – अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो – पाऊण वाटी जिरं – 1 लहान चमचा हळद – अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा किंवा इनो – 1 टी-स्पून आलं – 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी बटर किंवा तेल – आवश्यकतेनुसार पुरवठा संख्या (Servings) : मध्यम आकाराचे 5 मूंगलेट तयारीस…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 510
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

