Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः । आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । श्रुत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥29॥ एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥ एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥173॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले । एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥174॥ जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत । परी माघौते न समात…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 ऑगस्ट 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 08 भाद्रपद शके 1947; तिथि : सप्तमी 22:45; नक्षत्र : विशाखा 14:36 योग : ऐंद्र 15:08; करण : गरज 09:34 सूर्य : सिंह; चंद्र : तुळ 07:52; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:55 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस अनुकूल असेल. पैशांशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र कोणत्याही प्रकारची मोठी जोखीम घेण्याचे…

Read More

प्रणाली वैद्य भाग – 2 गूढ अशा या चंदन नगरचा ट्रेक कम कॅम्पला आज निघायचं होतं… श्लोकच्या स्टडीप्रमाणे पौर्णिमेच्याच दिवशी तिथे लोकांना वेगवेगळे अनुभव आले होते. आपल्यालाही एक अभ्यास म्हणून असे अनुभव येतात का, हे पाहण्यासाठी पौर्णिमेचाच दिवस योग्य राहील, असं सगळ्यांचं मत होतं आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे उद्याच पौर्णिमा होती… आजचा दिवस प्रवासात जाईल आणि उद्या तेथील ठिकाणांना आपल्याला जाता येईल, असा सर्व कार्यक्रम श्लोकने सर्वांसमोर मांडला होता… श्लोकचा हा अभ्यासपूर्ण कार्यक्रम सगळ्यांनी उचलून धरला होता… ठरल्याप्रमाणे सर्वच्या सर्व 36 जण अगदी वेळेवर हजर होते… प्रवासाकरिता ठरवलेली बसही वेळेत हजर होती! दोन-तीन दिवसांसाठी जेवणाकरिता लागणारे जिन्नस आणि सर्व…

Read More

अस्मिता हवालदार कोकणातल्या एका लहानशा, आडवळणी असलेल्या, करंबवणे नावाच्या खेड्यात राहणाऱ्या मालती केतकर या स्त्रीची ही कथा आहे. मागच्या शतकात स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्था सुरू केली. तो काळ या कथानकात नोंदला गेला आहे. बालविधवांचे कारुण्यमय जीवन, त्यांच्यावर होणारे अत्याचार, अविवाहित स्त्रीची मानसिक आंदोलने, परित्यक्ता स्त्रीचे हाल या कथेत वाचून स्त्रियांची स्थिती किती बदलली हे लक्षात येते. आपल्या समाजधुरिणांनी अत्यंत प्रतिकूल काळात स्त्रियांना शिक्षण देऊन क्रांती केली आहे. केतकर वहिनींचं हे चरित्र उमा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. उमाताई आपल्याला त्यांनी केलेल्या असंख्य अनुवादित पुस्तकांमुळे माहीत आहेत. हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. मालतीबाई आपली कथा…

Read More

मनीषा गोगटे साटोरीमध्ये दोन भाग असतात, एक असते पारी (वरचे कव्हर) आणि दुसरे असते सारण. पारीसाठी साहित्य मैदा – 2 वाट्या एकदम बारीक रवा – 1 वाटी साजूक तूप अथवा तेल – दोन ते अडीच टेबलस्पून मीठ – चवीनुसार दूध – पारी किंवा कणीक भिजण्यासाठी सारणासाठी साहित्य खवा – 200 ग्रॅम एकदम बारीक रवा – 100 ग्रॅम पिठीसाखर –दीड ते पावणेदोन वाटी (आवडीनुसार / हवं तेवढ्या गोडीनुसार) भाजलेली खसखस – 2 ते अडीच टेबलस्पून वेलची पावडर – एक टीस्पून साजूक तूप – 2 टेबलस्पून साटोरी भाजायला किंवा तळण्यासाठी तूप पुरवठा संख्या : 20 ते 22 नग हेही वाचा – Recipe :…

Read More

चंद्रशेखर माधव लहानपणी आमच्या घरी घरकामाकरिता वाघ नावाची एक मध्यमवयीन महिला येत असे. आम्ही त्यांना ‘मावशी’च म्हणायचो. वाघ मावशी पूर्णपणे निरक्षर होत्या. बहुदा त्या शाळेत गेलेल्याच नव्हत्या. तरीही व्यवहाराला एकदम प्रामाणिक होत्या. म्हणतात ना ‘शिक्षण आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी असतात’… व्यक्ती अशिक्षित आहे म्हणजे तो अज्ञानीच असेल असं नसतं. प्रामाणिकपणा हा वाघ मावशींचा महत्त्वाचा गुण! त्या अनेक वर्षे आमच्याकडे येत होत्या. त्यामुळे जेव्हा त्यांना लग्नाकरिता किंवा इतर काही कारणांसाठी मोठ्या रकमेची गरज भासत असे, तेव्हा वेळोवेळी आमच्या वडिलांनी त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याकरिता मदत केली होती. साहजिकच, दर महिना कर्जाचा हप्ता त्या आमच्या बाबांकडे आणून देत असत. कर्जाच्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।  तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥ उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥159॥ ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥160॥ महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥ तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 07 भाद्रपद शके 1947; तिथि : षष्ठी 20:20; नक्षत्र : स्वाती 11:37 योग : ब्रह्मा 14:11; करण : कौलव 07:08 सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सूर्यषष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – स्वभावामुळे अनेकांशी सहज जुळवून घ्याल, मात्र याचा इतरांकडून फायदा घेतला जाईल. कामात निष्काळपणा टाळा. वागण्यात नम्र राहिल्यास काम सहज करुन घेता येईल.…

Read More

ॲड. कृष्णा पाटील “आरं, होय म्हणंल, न्हायतर न्हाय म्हणंल, शेवटी किती केलं तरी, तुझी भैनच हाय ना. जाऊन ये जा पटदिशी,” आईच्या या बोलण्यावर त्याने त्याच्या जुनाट मोडकळीस आलेल्या स्प्लेंडर गाडीला किक मारली.‌ रस्ता अरुंद होता. खाचखळग्यामुळे हादरे बसत होते. पावसाच्या भुरभुरीने चिखल मातला होता. शिरगाव ते मोराळे रस्ता फारच कच्चा होता. मोराळ्यात मीनाक्षीच्या घरी पोहोचेपर्यंत दुपारचा एक तरी वाजणार होता. एका वळणावर महेशने मोटरसायकल रस्त्याच्या अगदी बाजूला घेऊन थांबवली. “पाच मिनिटांत आलो. थांब इथंच.” “काय झालं?” “झालं काय नाही रे. आबांच्या समाधीचं दर्शन घेऊन येतो.” महेशने रस्त्याकडेची दोन-चार फुले खूडली.‌ ओंजळीत फुले घेऊन त्याने रस्ता ओलांडला. खाली शेतात थोड्या…

Read More

प्रदीप केळूस्कर भाग – 1 कंपनीचा लंचटाइम झाला तशी अंजली आपला डबा घेऊन कॅन्टीनमध्ये आली, तिच्या आधी बराच स्टाफ कॅन्टीनमध्ये येऊन लंच घेत होता, कुठले टेबल रिकामे आहे, हे पहात असताना तिच्या लक्षात आले, स्मिताताई एकट्याच बसल्यात, त्यांच्यासमोरची खुर्ची रिकामी आहे, त्याबरोबर अंजली स्मिताताई समोर जाऊन बसली. “स्मिताताई इथे बसू का?” “अगं बस ना, माझी परवानगी कशाला हवी?” “तसं नव्हे, कुणी टेबल राखून ठेवलं असेल तर?” “कोणी नाही, माझ्या म्हातारी समोर कोण टेबल राखून ठेवणार गं? कोण तरुण देखणी मुलगी असती तर, कुणीतरी राखून ठेवलं असतं…” “पण स्मिताताई, तुम्ही तरुण नसाल, पण देखण्या आहात बरं का?” “हो, ते मला माहीत…

Read More