तांदळाची खीर
साहित्य
- तांदूळ – पाव वाटी
- साखर – अर्धी ते पाऊण वाटी
- वेलदोडे – पाच-सहा (किंवा अर्धे जायफळ)
- बदाम – पाच-सहा
- दूध – एक लिटर
- तूप – एक चमचा
कृती
- तांदूळ तुपावर तांबूस होईपर्यंत भाजावे.
- नंतर ते एक ते दोन तास थोड्या दुधात भिजत ठेवावे.
- मग ते मिक्सर किंवा पाट्यावर रवाळ असे वाटावे.
- उरलेले दूध उकळत ठेवावे. दुधाला उकळी आल्यावर वाटलेले तांदूळ त्या दुधाला लावावे गोळी होऊ देऊ नये.
- चांगले शिजल्यावर त्यात वेलचीची पूड करून घालावी अगर पाव जायफळ उगाळून लावावे. तसेच बदामाचे काप करून घालावेत.
- दूध थोडे आटवून घेतल्यास खीर जास्त चांगली लागेल.
हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी
गव्हल्याची खीर
साहित्य
- गव्हले – पाऊण वाटी
- दूध – अर्धा लिटर
- साखर – पाऊण वाटी
- वेलदोडे – पाच ते सहा
- जायफळ – पाव
- तूप – दोन चमचे
कृती
- दोन चमचे तुपावर गव्हले चांगले परतून घ्यावे.
- नंतर परतलेले गव्हले उकळत्या दुधात घालावेत.
- गव्हले चांगले शिजेपर्यंत दूध उकळत ठेवावे.
- त्यात साखर घालावी. तसेच वेलची आणि जायफळ उगाळून वा किसून घालावी.
- नंतर या मिश्रणाला पुन्हा एकदा एक उकळी आणावी.
हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…
दूधभोपळ्याची खीर
साहित्य
- दूध – एक लिटर
- दूधभोपळा – अर्धा किलो
- साखर – एक वाटी
- तांदळाची पिठी अगर कॉर्न फ्लोअर – पाव वाटी
- मीठ – चिमूटभर
- चारोळी – एक चमचा
- तूप – दोन चमचे
- वेलदोडे – सात ते आठ
कृती
- दूधभोपळा किसून, तो तुपावर मऊ होईपर्यंत परतून घ्यावा आणि चवीला किंचित मीठ टाकून, त्यावर दूध घालून, तो कीस दुधात शिजवावा.
- दुधाला उकळी आल्यावर त्याला तांदळाची पिठी अगर कॉर्न फ्लोअर लावावे आणि नंतर थोडे शिजवून, खाली उतरवून, त्यात साखर आणि वेलदोड्याची पूड घालावी आणि चांगले ढवळावे.
- त्यानंतर वर चारोळ्या पसराव्या.
टिप्स
- या खिरीप्रमाणे गाजर, रताळी आणि बटाटे यांचीही खीर करावी.
- दूधभोपळ्याच्या ऐवजी गाजर, रताळी अगर बटाटे घ्यावेत.
- बाकीचे साहित्य आणि कृती दूध-भोपळ्याच्या खिरीप्रमाणेच असेल.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवू शकता, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


