Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चुकले वाट रे…
    ललित

    चुकले वाट रे…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, श्रीरंगचे प्रेम, तिची बेचैनी, नातेवाईकांचे कौन्सिलिंग, चुकले वाट रे, श्रीरंगने केले आश्वस्त, श्रीरंगाची लग्नाची तयारी, तिची भीती, श्रीरंगचा धीर
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मयुरेश गोखले

    आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं… फोनवर तिचा सारखा एकच विषय सुरू होता… “श्री सांग ना रे, आपलं काही चुकत तर नाहीये ना?  तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ! श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?”

    त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. फोनवर प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. “मी तुझ्यासोबत वाट तर चुकत नाहीये ना!” याचीच आवर्तन सुरू होती. शेवटी श्रीरंगने तिला संध्याकाळी त्यांच्या नेहमीच्या जागी भेटायला बोलावले.

    संध्याकाळ झाली, दोघे भेटले. वातावरण ढगाळ आणि हवेत चांगलाच गारठा होता. समोर टेबलवर ठेवलेला चहाचा वाफाळलेला एक कप उचलून श्री तिच्याकडे एकटक बघत होता आणि तिला त्याच्या अशा बघण्याने काहीच सुचत नव्हते. श्रीला हसायला येत होते. शेवटी श्रीरंगने शांततेचा भंग करत तिला बेचैन असण्याचे कारण विचारले.

    हेही वाचा – मी मज हरपून बसले गं…

    ती म्हणाली की, काल तिची एक नातलग तिला भेटली, त्या नातलग बाईने खूप कौन्सलिंग केलं. तू खूप मोठी चूक करतेय… असं गुंतत नको जाऊ… इतक्या कमी वेळात इतकं प्रेम कधी होऊच शकत नाही… तुझं भविष्य तुलाच घडवायचं आहे… घरच्यांचा विचार कर… वगैरे वगैरे वगैरे वगैरे…

    श्रीला तिच्या बेचैनीचे कारण आता नीट समजले होते. नातलग बाई काय बोलली, हे पुराण अजून संपलेच नव्हते आणि त्या बाईच्या सांगण्यामुळे तिला काय वाटले, ही बडबड सुरूच होती. पण आता श्रीचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तिच्या डोळ्यातले क्षणाक्षणाला बदलणारे भाव पाहून त्याला खूप मजा येत होती. मधेच तिची एक बट तिच्या गालावर येत होती, श्री त्या बटेकडे पाहत होता. तिच्या ओठांच्या हालचाली तो पाहत होता…

    हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…

    श्रीने आजूबाजूला पाहिले, हॉटेलमध्ये फक्त ते दोघेच बसले होते. त्याने आपला चहाचा कप अगदी तिच्या कपला चिटकून ठेवला आणि खुर्चीवरून उठून तो तिच्याजवळ आला… तिचे बोलणे आता बंद झाले होते… ती त्याच्याकडे पाहत होती. त्याने हात धरून तिला उठवले आणि काही कळायच्या आत तिला एक घट्ट मिठी मारून हळूच तिच्या कानात सांगितले की,  तो उद्या आई, बाबांना घेऊन तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला येणार आहे!

    श्रीचे वाक्य पूर्ण झाले, पण ओठ काही कानाजवळून दूर झाले नाहीत आणि मिठी पण काही क्षण तशीच राहिली. त्या काही क्षणांत तिला तिचे उत्तर मिळाले होते!

    “मी कशी तुझ्यासवे, चुकले वाट रे!!!”

    काही चुकत नाहीये माझं… ही मिठी मला अशीच आयुष्यभर हवी आहे…


    मोबाइल – 9423100151


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 10, 2026

    “ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए…

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.