Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आराध्याच्या गुणांची कदर कोणीतरी केली होती!
    ललित

    आराध्याच्या गुणांची कदर कोणीतरी केली होती!

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यJanuary 30, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, आराध्य शर्वायला दिवाकरांचा पाठिंबा, आराध्या शर्वायला गुरुजींचा आशीर्वाद, अमृतसिद्धी योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 10

    आई तिच्याकडे पाहत होती, अशा नजरेनं जणू तिने मुलीला नव्यानं ओळखायला सुरुवात केली होती.

    “कुठे होतीस गं एवढे दिवस?” आईचा आवाज हळू, पण गंभीर होता.

    आराध्या तिच्याजवळ गेली, तिचा हात हातात घेत म्हणाली, “जिथं स्वतःला शोधता आलं… आणि जिथून तुला बाबांना या घरातून बाहेर काढायची ताकद मिळाली.”

    आईचं मन भरून आलं. डोळे पाणावले. पण आता ती कधीच रडणार नव्हती… कारण, तिला समजलं होतं, तिची मुलगी आता कोलमडणारी नाही. आराध्याने डोळे मिटून विचार केला —

    “शिवा… हे तूच केलंस. माझ्या आत मी होती, पण तू मला स्वतःला दाखवलंस. आता मी लढेन… आणि जिंकून दाखवेन.”

    सकाळचं वातावरण थोडं तणावपूर्ण होतं. आराध्या आणि अन्वी दोघींचाही बी.ए. फायनलचा निकाल लागणार होता. काकूने तर रात्रीच ठामपणे सांगून ठेवलं होतं, “अन्वीचा फर्स्ट क्लास येणारच, माझी मुलगी आहे ती!”

    घरात सर्वांची नजर दरवाजाकडे होती, दोघींच्या वाटेकडे!

    प्राजक्ता मात्र शांत होती. ना उत्साही, ना काळजीत… पण तिच्या नजरेत एका आईची खोल आतून येणारी प्रार्थना सतत सुरू होती.

    अन्वीचा पत्ता नव्हता. फोन लागत नव्हता… सगळ्यांना वाटत होतं, ती येईल आणि सगळं कळेल. अचानक दार उघडलं… आराध्या थेट घरात शिरली. चेहऱ्यावर ना हसू, ना तणाव – पण डोळ्यांत चमक होती.

    आई प्राजक्ताने तिला पाहिलं आणि अनाहूतच डोळे भरून आले. ती पटकन धावत गेली, आराध्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले –

    “काय झालं गं?”

    आराध्याने काहीच न बोलता तिच्या हातात एक पेपर दिला…

    कॉलेज – पहिली. युनिव्हर्सिटी – दुसरी.

    क्षणभर शांतता होती… आणि नंतर प्राजक्ताचा संयमाचा बांध मोडला… “माझी आराध्या पहिली आली! पहिली!” ती उचंबळून सगळ्यांना सांगत होती.

    काकू अजूनही अन्वीच्या फोनची वाट पाहात होती.

    तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून एक शेजारीण म्हणाली… “तुमचं बरंय, आराध्या इतकी अभ्यासू… तिच्यासारखी मुलगी मिळणं नशीबच.”

    काकूचा चेहरा उतरलेला होता… अन्वी मात्र, कॉलेजबाहेर एका रेस्टॉरंटमध्ये तिच्या मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करत होती… मोठे गिफ्ट्स, फोटोशूट आणि मोठं बिल… कसला निकाल? कसली जबाबदारी?

    हेही वाचा – आराध्याचा संघर्षाचा निर्णय… सोबत आहे शिवा!

    घरात मात्र त्या दिवशी खरं यश आणि खरं सोनं ओळखलं गेलं होतं… प्राजक्ताच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते… ते अभिमानाचे होते.

    आराध्या मात्र शांत उभी होती. कारण, तिला माहीत होतं, शब्दांपेक्षा जास्त वजन आता तिच्या कृतीचं होतं. हो… अन्वीचं आणि आराध्याचं नातं दिसायला जरी चुलत बहिणींचं असलं, तरी त्यात आपुलकीपेक्षा स्पर्धा आणि हेवेदावे जास्त होते. रुपानं गोरी, बोलकी आणि चकाचक राहणारी अन्वी, सगळ्यांना हवीहवीशी वाटायची. आराध्या मात्र… काळ्या सावळ्या रंगाची, शांत, सौम्य आणि कष्टकरी.

    घरात अन्वीचं कायम कौतुक व्हायचं –

    “काय दिसते आपली अन्वी… मिस कॉलेज होणार बघा!”

    “आमच्या घरातच सोनं जन्माला आलंय!” काकू तर नेहमीच फुशारक्या मारायची…

    आराध्याचं अस्तित्व जणू केवळ एक सावलीच होतं. तिला कितीही बक्षिसं मिळाली, शिष्यवृत्ती घेऊन आली, कविता, निबंध, वक्तृत्व… तरीही काकूचं एकच वाक्य असे – “पण दिसायला कशी ती?”

    अन्वीला नेहमी हे बोचायचं की, ती दिसण्यात भारी असली तरी, लोक आराध्याच्या बुद्धीला दाद देतात. कॉलेजमध्ये अनेकदा आराध्या तिला मागे टाकायची, तेही केवळ अभ्यासात नाही, तर एकूणच व्यक्तिमत्त्वाने… आणि आता तर निकालानंतर परिस्थिती अधिकच चिघळली होती. आराध्या काँलेजमध्ये पहिली आली आणि युनिव्हर्सिटीमध्ये दुसरी!

    अन्वीच्या अहंकाराला जबर धक्का बसला होता. तिचं बाहेरचं ‘फेक पर्सनॅलिटी’ आणि ‘टाइमपास गँग’ याचं खरं रूप घरात फारसं कोणालाच माहीत नव्हतं. म्हणूनच जेव्हा तिचा निकाल काहीसा मागे पडला आणि आराध्याचा डंका वाजला, तिला हे सहनच झालं नाही. ती उगाच मुद्दाम खोचक बोलायला लागली –

    “रिझल्ट काय आलाय… पण चालणं, बोलणं तरी शिकावं आधी! अरे, पहिली आली म्हणून काय झालं, बघू नंतर कुठे जॉबला लागते ती…”

    आराध्या मात्र शांत होती. कुणी कितीही बोलो… आता ती स्वतःच्या मूल्यांवर ठाम होती. तिच्या डोळ्यांत हलकासा आत्मविश्वास झळकत होता… तो असा की, गोडगोड बोलणाऱ्यांपेक्षा, खरं काम करणारीच खरी ठरते… आणि वेळ आली की, स्वतःची जागा ती स्वतः बनवते!

    त्या दिवशी दुपारच्या वेळी, घराच्या अंगणात  वाळवण पाहात बसलेल्या प्राजक्तासमोर एक टवटवीत, शालीन पण मिश्कील चेहऱ्याची स्त्री उभी होती. सुमित्रा मावशी — त्यांच्या आजीची जुनी मैत्रीण… कपाळावर गंध, केसाचा साधा अंबाडा आणि डोळ्यांत अनुभवी चमक.

    “ओह, किती वर्षांनी पाहते गं तुला, लक्ष्मी! (आजीचं माहेरचं नाव) बदललीच नाहीस!” असं म्हणत तिने आजीला मिठी मारली.

    घरात काही क्षण एक वेगळीच चैतन्याची लाट उसळली. दोन्ही आजींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या… सुमित्रा मावशी वागायला सरळसोट आणि स्पष्ट बोलणाऱ्या होत्या. कोण काय विचारेल याची फिकीर न करता त्या पटेल ते बोलत.

    थोड्याच वेळात अन्वी कुठून बाहेरून आली. फोन कानाला लावून, मस्त ब्रँडेड कपड्यात, अंगभर परफ्यूमचा सुगंध, चेहऱ्यावर गोड हास्य… पण डोळ्यांत एक छुपा तुच्छताभाव अन् श्रीमंतीची ऐट…

    सुमित्रा मावशींनी तिथूनच नजर फिरवली… “ही कोण गं? फारच देखणी आहे, पण अगदी टीव्हीवरच्या मुलींसारखी… हीच का तुझी नात?” त्यांनी आपल्या मैत्रिणीला  म्हणजेच आराध्या, अन्वीच्या आजीला विचारले…

    “हो, आमची अन्वी ना कॉलेजात सगळ्यात पुढे असते…  ब्युटी क्वीन  म्हणतात तिला !” काकू गर्वाने म्हणाली.

    तितक्यात स्वयंपाकघरातून आराध्या बाहेर आली, ओढणीला हात पुसत, साधासा ड्रेस… जरा विस्कटलेली पण चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न तेज…

    “नमस्कार  आजी… बसा. प्यायला पाणी आणते.”

    सुमित्रा मावशींनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं… तिच्या डोळ्यांत होता एक ठामपणा!

    “ही दुसरी कोण?”

    “आराध्या… आमच्या धाकट्या सुनबाईची मुलगी…” आजीने  ओळख करून दिली.

    सुमित्रा आजींचा मुक्काम चांगला चार-पाच दिवसांचा होता. आपल्या आजीसोबत आराध्या सुमित्रा आजी सोबतही गप्पा मारायची… त्यांना हवं नको ते सारं पाहायची…

    अन्वीला काही काम सांगितलं तर, ती आराध्यालाच आवाज द्यायची… बघावं तेव्हा आपल्या मोबाइलवर एक तर बोलत असायची नाही तर, टाइप करत असायची… आराध्या मात्र काहीही सांगितलं तरी, करायला तत्पर असायची, जणू नाही म्हणणं तिच्या शब्दकोशात नव्हतं…

    काही दिवसांतच सुमित्रा मावशींच्या लक्षात आलं, अन्वी कामाला हातच लावत नाही, आराध्या मात्र सतत काहीतरी करतच असते. अन्वीचं फोनशिवाय जमत नाही, आराध्या मावशींच्या बोलण्याकडे लक्ष देत होती, काही हवं नको, पाहात होती घरात मदत करत होती…

    संध्याकाळी चहा घेताना त्यानां राहवलं नाही, त्यांनी स्पष्टच विचारलं, “ही गोरीवली, गोडगोड बोलणारी अन्वी फक्त बोलणं चांगलं करते की, काही काम ही करते?”

    काकू तर प्रश्न ऐकूनच गप्प…

    प्राजक्ता मात्र शांतपणे म्हणाली,

    “हो, अन्वी हुशार आहे, पण आराध्या मात्र खूप मेहनती आहे.”

    पण निशाच्या तोंडून आराध्यासाठी एकही कौतुकाचा शब्द निघाला नाही… प्राजक्ता मात्र आपल्या पुतणीचं कौतुक करत होती.. जी मुलगी तिच्याच मुलीला पाण्यात पाहत होती!

    सुमित्रा मावशीला हसू आलं… “बोलणं नाही, मन पाहिलं जातं… आणि खरी रत्न मातीमध्येच सापडतात… तुझ्या या आराध्याला मी लवकरच काहीतरी विशेष सुचवणार आहे… ही मुलगी काहीतरी मोठं करणार हे मी आजच सांगते.”

    सुमित्रा आजींच्या तोंडून आराध्यासाठी आशीर्वाद  आणि कौतुकाचे शब्द ऐकून प्राजक्ता मात्र धन्य झाली… मात्र त्या क्षणी, आराध्याच्या चेहऱ्यावर एक तेज उमटलं, तिच्या गुणांची कदर आज कोणीतरी केली होती — आणि तेही मनापासून! आराध्याच्या आनंदाला तर पारावार उरला नाही… मन करत होतं नाचावं गावं पण आपला आनंद इतक्यातच दाखवण्यासारखं अजून तरी काही घडलं नव्हतं… अजून बराच प्रवास व्हायचा होता…

    हेही वाचा – आराध्या घरी परतली, पण एका निर्धाराने!

    इथे आराध्या आनंदात होती तशीच प्राजक्ताच्याही डोळ्यात आनंदाश्रू भरून आले होते… मात्र त्याच घराच्या एका खोलीत कुणीतरी धुसफूसत होतं… राग राग करत होतं?  आराध्यासाठी अपशब्द बोलत होतं… एकीकडे आनंद होता तर, त्याच क्षणी दुसरीकडे द्वेषातून नवीन संकट विणलं जातं होतं…

    काय असेल ते संकट? कशी तोंड देईल आराध्या त्याला?

    क्रमशः

    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026 ललित

    टिपिकल

    September 22, 2026 ललित

    ललिताची खरेदी

    September 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बिस्किटं… दोन कोटींची!

    By दिलीप कजगांवकरSeptember 22, 2026

    सकाळचा चहा पित घराच्या ओसरीत बसलेले सदानंद आणि सावित्रीबाई एकमेकांकडे पाहात होते. कर्ज काढून शहराच्या…

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026

    जीएसबी गणपतीची भव्यता अन्…

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026

    जीएसबी गणपतीची भव्यता अन्…

    September 22, 2026

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 444
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 593
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 938
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.